मागोवा

कानबाई- खान्देशातील एक प्रथा!

Submitted by मी_आर्या on 3 October, 2011 - 02:08

श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो.

गुलमोहर: 

घनश्यामजी

Submitted by आशयगुणे on 26 September, 2011 - 01:38

'शिक्षण' ही समाजाची गरज आहे हे खरे आहे! पण 'शिक्षण' कशाला म्हणावे हे मात्र समाजाला अजून कळले नाही असं कधी-कधी वाटतं. चार पुस्तकं वाचण्याला समाज शिक्षण म्हणत आला आहे. परंतु हे पुस्तकांचे 'शिक्षण' किती फसवे असते असे आज-कालच्या....नव्हे आजच्या शिक्षकांकडे बघून प्रकर्षाने जाणवते. आम्ही ज्या पिल्लै कॉलेज मध्ये शिकलो त्यात अश्या शिक्षकांचे प्रतिनिधित्व काही लोकांनी स्वखुशीने केले होते! त्याच 'हिटलरशाही' मध्ये आम्ही काही गोष्टी शिकायचा प्रयत्न केला पण थोड्या दिवसांनी तो नाद सोडून दिला! पण आम्ही पडलो विद्यार्थी! त्यामुळे आम्ही ३ वर्षांनी आनंदाने ह्या कारभाराला राम राम ठोकला!

गुलमोहर: 

ऑपरेशन ट्वीस्ट : अमेरिकेचा नवीन आर्थिक उपचार

Submitted by AmitRahalkar on 25 September, 2011 - 07:52

’चाल’कत्व!

Submitted by प्रमोद देव on 20 September, 2011 - 11:05

२०११च्या मायबोली वर्षाविहारला ह्यावेळी हजेरी लावली आणि त्यामुळे मित्रमंडळाचं वर्तूळ अजून मोठं झालं. खरं तर गेले जवळपास पाच वर्ष सदस्य असूनही मी मायबोलीवर फारसा सक्रिय कधीच नव्हतो. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक मला आणि मी त्यांना नावाने ओळखत होतो..त्यातही एक/दोन जणांनाच मी प्रत्यक्ष भेटलो होतो....मात्र वविच्या आधी टी-शर्ट नोंदणी आणि टी-शर्ट वाटप निमित्ताने दोन वेळा शिवाजीपार्कच्या कट्ट्यावर हजेरी लावली आणि अजून किमान दहा-बारा जणांना प्रत्यक्ष भेटलो...त्यातले बहुसंख्य लोक मला आधी नावानिशी माहीतही नव्हते...असो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

१७ सप्टेंबर - मराठवाडा मुक्ती संग्रामदिन

Submitted by विप्रा on 17 September, 2011 - 03:59

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.
१७ सप्टेंबर , आज ६३ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस.
स्वतंत्र भारतात सामिल होण्यास विरोध करणार्‍या निझामाने १९४८ साली ह्या दिवशी शरणागती पत्करली.
स्टेट काँग्रेस , कम्युनिस्ट , समाजवादी आणी आर्यसमाजी नेतेमंडळी ह्या लढ्यात सामील होत्या.
सरदार वल्लभभाई पटेलांनी सोलापुरमार्गे सैन्य हैदराबादला पाठवुन अ‍ॅक्शन यशस्वी केली.
आपला स्वातंत्र्य लढा अहिंसात्मक होता पण मराठवाडा मुक्ती संग्राम मात्र सशस्त्र होता.
रझाकाराच्या अत्त्याचाराला त्रस्त जनतेला स्वातंत्र्य १३ महिन्यांनंतर मिळाले.

गुलमोहर: 

मैत्र जिवांचे : गणेशोत्सवातील उपक्रम

Submitted by ह.बा. on 7 September, 2011 - 03:47

हाले डुले आभाळाचे झुंबर माथ्याला
भगताच्या देव्हार्‍यात गणराज आला
मोर्‍या मोर्‍या म्हणे कुणी उधळी गुलाल
पावसाच्या गाण्यावर धरणीचा ताल......

गुलमोहर: 

बिच्चारे मंत्री महोदय

Submitted by sunil patkar on 5 September, 2011 - 13:06

हे तुम्हाला पटतं का ?
पंतप्रधानांच्या सुचनेनुसार केंद्रीय व राज्यमंत्र्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा सादर केला आहे .
यातील अत्यंत गरिब मंत्री एम विरप्पा मोहली १३ लाख मालमत्ता , ए.के.अंटनी यांच्याकडे केवळ १ लाख ८२ हजार रुपये आहेत त्यांच्या पत्नीची परिस्थिती बरी आहे तिच्याकडे ३७ लाख १८ हजार रु.ची मालमत्ता आहे.सुदीप बंदोपाद्याय यांच्याकडे ५६ लाखाची मालमत्ता आहे.आपले शरद पवार १२ कोटी मालमत्तेचे धनी आहेत .पंतप्रधानांकडे ५ कोटीची मालमत्ता आणि हसु नका मारुती ८०० गाडी आहे.सर्वाधिक मालमत्ता कमलनाथ २५० कोटी आणि प्रफुल पटेल १०३ कोटी .

गुलमोहर: 

पसायदान

Submitted by झुलेलाल on 4 September, 2011 - 09:57

मला आलेला एक ई-मेल उघडला, फॉन्ट करप्ट होते. म्हणून इथे कॉपी पेस्ट केला...
----------------

पसायदान
आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचें ॥
दुरीतांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जे वांछीलं तो ते लाहों । प्राणिजात ॥
वर्षत सकळमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु या भूतां ॥
चलां कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषांचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

गुलमोहर: 

गटग वृत्तांत...रविवार ब्रेकफास्ट गटग, पुणे!

Submitted by अविकुमार on 26 August, 2011 - 04:47

गटग वृत्तांत...रविवार ब्रेकफास्ट गटग, पुणे!

----------------------------------------

टीप: खालील वृत्तांतात कुणाचा उल्लेख राहून गेल्यास तो अनुल्लेखाचा प्रयत्न नसून मा.बु.दो.स.
कार्यबाहुल्यामुळे वृत्तांत लिखाणास अक्षम्य उशिर झाला आहे याची मला जाणीव आहे. तरिही 'आपलेच' मायबोलीकर समजून घेतील अशी आशा.
---------------------------------------------

गुलमोहर: 

श्रीदेवी अथर्वशीर्ष

Submitted by रविनित on 26 August, 2011 - 04:05

सर्व देवता मिळोन, पुसती देवी लागोन, महादेवी, तवस्वरूपपूर्ण विषद आम्हा तू करी,
देवी म्हणे मी शून्य, निराकार निर्गुण, आदीअंतरहितपूर्ण ब्रम्हसनातन मी असे,
प्रकृती मी पुरुषोत्त, आनंद मी अनानंद मी, विज्ञान मी, अज्ञान मी, ऐसे जाणा रूप माझे,
हे दृश्य जे चराचर, मीच नटले साचार, मजविन अणुमात्र, सृष्टीकाही असेना,
पूर्व पश्चिम, दक्षिणोत्तर, उर्ध्व अधर दिशा समग्र, सर्वत्र मी साचार, भरोनी राही सर्वदा,
मीच एकादशरुद्र, अष्टवसू मी दिगंतर, विश्वदेवद्वादशआदित्य, मीच सारे नटलेसे,
त्वष्टा कुशा आणि सोम, ब्रम्हा विष्णू महेश जाण, प्रजापती भगावित्रावरून, मीच सारे नटलेसे,

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मागोवा