मागोवा

मा exchange - episode 16 फेब्रुवारी

Submitted by चाणक्य. on 16 February, 2011 - 11:27

आजचा एपिसोड पाहुन मला जबरदस्त धक्का बसला. लहान मुलाशी कोणी असेहि वागु शकते ? मी जास्ती काहि लिहित नाहि, एपिसोड पहा. मग येथे चर्चा करु.

गुलमोहर: 

सोशल नेटवर्किंगची कमाल!

Submitted by झुलेलाल on 13 February, 2011 - 22:59

जानेवारी २००६ ते जून २००९ या जवळपास साडेतीन वर्षांच्या कालावद्यीत ट्युनिशियामधील अमेरिकेच्या दूतावासाने वॉशिंग्टनला काही गुप्त संदेश पुरवले. असंख्य गुपिते फोडून जगभरातील सत्ताद्यीशांना घाम फोडणा-या आणि अनेक मुखवट्यांआडचे खरे चेहरे जगासमोर आणणार्‍या विकीलिक्सच्या हाती या संदेशांच्या दहा फाईल्स सापडल्या, आणि गेल्या नोव्हेंबरच्या आसपास ट्यूनिशियातील अराजकाच्या परिस्थितीची भयानक जाणीव तेथील जनतेला झाली.

गुलमोहर: 

संत नामदेवांच्या गुरुमुखी अभंगांमधील चमत्कार प्रसंग

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 3 February, 2011 - 11:51

ग्रंथसाहिबातील गुरुमुखीमध्ये लिखित व पंजाबी भाषेत रचलेल्या ''शबद'' रचनांचे वाचन करत असताना ईश्वराच्या अगाध लीलांचे वर्णन करणार्‍या संत नामदेव रचित सुंदर रचना वाचणे हा खरोखर प्रासादिक अनुभव आहे. एरवी हरीभक्तीबरोबरच समाजातील अंधश्रद्धा, भोंदूगिरी व पाखंडीपणावर आपल्या अभंगांमधून शब्दांचे आसूड उगारून खरमरीत टीका करणार्‍या संत नामदेवांच्या या एकूण ६१ रचनांमध्ये त्यांच्या आयुष्यातील काही चमत्कारांचे त्यांनी काव्यरूपात केलेले वर्णनही आगळे व अभ्यास करण्याजोगे आहे. नवरसांमधील अद्भुतरसाला, विस्मयाला जागृत करणार्‍या या रचनांमधील शब्दप्रयोग काहीवेळा मराठी धाटणीचेही आहेत.

गुलमोहर: 

मृत्युंजय

Submitted by छायाचित्रकार on 2 February, 2011 - 02:54

शेवटी सावरकराना मृत्यु म्हणाला "किती पळवाल.... दमलो ओ आता फ्रांस ,अंदमान,रत्नागिरी, सगळ्या शिक्षा तुरुंगवास मानसिक छळ
किती उपाय केले...लोक हसतील ना ओ मला .. जरा दया करा...मी हरलो. ... नाही जिंकु शकलो तुम्हाला...
शेवटी तात्यारावना त्याची दया आली...सगळ्यात जवळचा मित्र तोच होता ना....ते म्हणाले...थांब मित्रा मीच येतो तुझ्या हातात हात घालून...
या राजकारणी,फसव्या लोकांपेक्षा तुच एक "खरा " आहेस....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सावली दीवलीचा खेळ

Submitted by छायाचित्रकार on 29 January, 2011 - 03:39

छाया आणि प्रकाश या युगुलान्च तसं आहे.वस्तुतहा दोघं मिळून एकाच आहेत.एकाच वस्तूची दोन अंग आहेत. पण मौज कशी ती पहा,कधी ती दोघं एकमेकांपासून कोशावधि दूर उभी राहतात.कधी एकमेकात अशी मिसळून जातात ,की वेगळी करण कठीण होउन बसतं.

या दोघांचं हुबेहुब प्रति-चित्र उमटवण, हाच छायाचित्राचा विषय आहे.

गुलमोहर: 

माझी छायाचित्रणकला २

Submitted by छायाचित्रकार on 29 January, 2011 - 03:00

माझी छायाचित्रणकला २

अनेकदा लोक मला विचारतात तुला कसा दिसता रे .. म्हणजे ही frame आम्हाला नाही दिसत...मी म्हणतो.. त्यात अवघड काहीच नाही... जरा आपल्या आजुबाजुला बघा.डोळे उघडे ठेवून...आत...तुम्हाला पण सापडेल. मला ही अजुन सापडतेच आहे. आता एक नविन गोष्ट लक्षात यायला लागली आहे ती तुम्हाला सांगतो....आपण जो प्रत्येक फोटो काढतो तो दर वेळेला अर्थ पूर्ण असेलच असा नाही...
माझा एक मित्र. त्याने काही गगनबावडा घाटात काढलेले काही फोटो बघत होतो. सहज एका ढाब्यावर काढलेले .त्यातला एक फोटो खुप आवडला..होता.. एका tyre मधून एक wire बाहेर येत होती.

गुलमोहर: 

माझी छायाचित्रणकला....

Submitted by छायाचित्रकार on 29 January, 2011 - 00:48

फोटोग्राफी इतका सोपे माध्यम कुठलेच नसेल.माझी फोटोग्राफी ही अशीच सुरु झाली. एकदम. मी गेलो होतो ट्रेक ला घरातला digital कैमेरा घेउन गेलो. सहजच. एखादा फोटो चांगला आला असेल. पण नंतर १०० फोटो काढत गेलो,१००० काढले.. घरातले,बाहेरचे.वेगवेगळ्या विषयांचे. मग लक्षात आले की ४ लोकांपेक्षा आपल्याला काही तरी वेगळे दिसतेय,जाणवते मग आता हा छंद आयुष्यभर सुटणार नाही.
गो.ने.दांडेकर यांनी याला सुंदर नाव दिले आहे. ' सावली दिवलीचा खेळ'. मग अचानक आठवला मी पहिल्यांदा काढलेला फोटो. घरातले ६ माणसे पण त्यांच्या माना नुसत्या दिसत आहेत. कारण मुंडकी मी

गुलमोहर: 

आजी आणि बटाट्याची भाजी .

Submitted by छायाचित्रकार on 28 January, 2011 - 13:46

हे शीर्षक वाचून कदाचित तुम्हाला हसायला येईल. पण हो घटनाच अशी घडली होती.मला एकदा ट्रेकला जायचे होते, 'हरिचंद्रगड' चा ट्रेक होता. आणि मी शनिवार पेठेत आजीकडे
रहायला गेलो होतो. दुसरया दिवशीची तयारी सुरु होती. आजीने विचारले "डबा देऊ का?" मी म्हंटले "दे". ( भाजी पोळी दुसरा काय ?) आजी ने सांगितले." बटाट्याची भाजी देते." मी म्हणालो "चालेल."
सकाळी उठून तयार होत होतो, आजी नेहमी प्रमाणे बटाटयाच्या काचऱ्या, कांदा ( स्वस्त होता हो तेंव्हा !) कापत होती. तेल गरम होत होते,भाजी बनवणार तेवढ्यात लाइट गेले.पहाटे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझी पाली यात्रा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 January, 2011 - 06:07

रविवार सकाळीच ह्यांच्या मित्राचा फोन आला. गाडी नविन घेतली आहे म्हणून पहिला पालीला न्यायची आहे. तुम्ही दोघ पण चला आमच्याबरोबर. आयत्या वेळी असल्याने मी हो-नाही करत होते. कारण घरात कामेही काढलीहोती आठवड्याची. पण मग म्हटल जाऊदे नाही सांगितल तर भाव खातो म्हणून पुढच्यावेळी विचारणार नाही ह्या भितीने आम्ही दोघांनी येतो म्हणून सांगितल :स्मित:. १२ वाजेपर्यंत भराभर कामे आटपुन निघालो. गाडी छानच होती. चालवायलाही दुसरा मित्रच होता. गाडीत गाडीचे मालक नवरा-बायको, मुलगा होता. गाडीत बसल्यावर चर्चेत कळल की आज नॉनव्हेजच खायचे म्हणून दर्शन घेतल्यावर जेउ.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

समर्थ रामदास स्वामींचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव; भारत इतिहास संशोधक मंडळाचे सपशेल दूर्लक्ष!

Submitted by shailesh vasant... on 18 January, 2011 - 23:54

AANAND VAN BHUVAN Swayanbhu Shivthaghal.jpg
'सकळ देवांचिये साक्षी।गुप्त उदंड भूवने।
सौख्यासि पावणे जाणे। आनंदवनभुवनी॥'
समर्थ रामदास स्वामींची असंख्य गुप्त भुवने असताना त्यांनी श्रीसमर्थ दासबोधादी ग्रंथांची निर्मिती केली ती शिवथरप्रांतातील घळ सध्या अस्तित्वात असलेली आहे अथवा कोणती? याबाबत संशोधन करणारे सद्गुरू सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थान आळंदीचे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी
'वेदशास्त्र धर्मचर्चा। पुराणे माहात्मे किती।
कवित्व नूतने जीर्णे। आनंदवनभुवनी॥'

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मागोवा