आमच्या क्लास मध्ये या वर्षी प्रत्येक ग्रुप ला एक एक हटके प्रोजेक्ट दिलेलं आहे, कोणाला महाभारत, कोणाला कृष्णविवर, कोणाला धारावीतल्या लोकांवर डॉकुमेंतरी वगेरे वगेरे
पण आमच्या ग्रुप ला टाइम मशीन हा विषय दिलाय, गुगलून बघितले पण विशेष हाती काही लागत नाहीये, मला काही मदत मिळू शकेल काय?
मला मिळालेली माहिती अशी कि (डिस्कवरी वर परवा रात्री एक शोव लागलेला, ) जर माणूस प्रकाशाच्या वेगाला बीट करू शकला तर तो भविष्यात जाऊ शकेल
आणि प्रकशाचा वेग म्हणजे , एक ट्रेन पृथ्वीला एका सेकंदात ७ प्रदक्षिणा मारू शकेल एवढा असतो...
माणसाला एवढा वेग प्राप्त करणे अजून जमलेले नाही वगेरे वगेरे....
पुर्वी सांगितल्याप्रमाणे, खान्देश हा महाराष्ट्राच्या उत्तर सिमेवरचा परगणा. याला एका बाजुला गुजरात राज्याची सीमा तर दुसरीकडे मध्यप्रदेशची सीमा आहे त्यामुळे एकूणच खान्देशी जीवनशैलीवर या तीन्ही राज्यांचा मिश्र प्रभाव दिसतो. खान्देशी भाषा ही मराठी + हिन्दी + गुजराती अशी बनलेली आहे. जवळच सातपुडा डोंगररांगात भिल्ल ही आदिवासी जमात आहे.खान्देशी नृत्यात त्यांचीही थोडी शैली दिसुन येते. तसेच महाराष्ट्र-म.प्र. सीमेवरील बु-हाणपुर हे गाव आधी गुजरातचा राजा अहमद याची राजधानी होते. त्यामुळे थोडा मुसलमानी पगडा दिसतो.
*****************************************************
*****************************************************
नाव : ओसामा बिन लादेन. जन्म : १९५७ . सौदी अरेबिया. उंची : अदमासे साडेसहा फूट. शेरा : लादेन हा
' अल कायदा ' नामक अतिरेकी संघटनेचा नेता. तो डावखुरा होता आणि चालताना त्याच्या हातात वेताची काठी असायची. ' एफबीआय ' च्या दफ्तरी असलेला लादेनचा हा ' बायोडेटा '. त्यात त्याच्या व्यवसायाची कुठलीही नोंद नाही. पण त्याचे महाभयंकर ‘ उद्योग ’ चांगलेच परिचित आहेत. इमारतींवर विमाने धडकावून हजारोंचे बळी घेणे... बॉम्बस्फोट घडवणे... इस्लामविरोधकांना धडा शिकवणे. काही वर्षांपूर्वी, लादेनवर एक पुस्तक आलं होतं. त्याचं नाव होतं ‘ मॅड मसिहा ’ . लादेनची कारकीर्द पाहिली तर हे शीर्षक अगदी समर्पक ठरतं.
आर्धा आर्धा तास चालणारे उखाणे असायचे म्हणे आधी. अजुनही काही खोडं अशी रेलगाडीछाप काव्यधारा लग्नातून ऐकवत फिरतात. त्याना खास त्यासाठीच लग्नाची पत्रिका आवर्जून दिली जाते. पण नव्या पिढीने ही प्रथा नाकारल्याचे चित्र दिसते आहे. गोड, गमतीची मजेदार प्रथा आहे आपली. उगा का अव्हेरावी? घेत जा हो, नाव घेत जा!
आमच्या कानी आलेले उखाने आम्ही इथे देतोय. जमेल त्याने मराठमोळ्या परंपरेला समृध्द करावे ही विनंती. कच्च्या बच्च्यांची सोय होईल. पुस्तकांचा खर्च वाचेल. कुरवल्यांना फुश्यारक्या मारत मिरवता येईल. नाही का?
डाबर लाल बाई डाबर लाल
यशवंतरावांची मोराची चाल
दोघांचा वाडा, दोघांचा सोपा
‘‘अपहरणानंतर माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. मी आयुष्याकडे जरा जास्त संवेदनशीलतेने पाहू लागलो. आजचं समोर आलेलं आयुष्य समरसून जगायचं आणि नंतर जे काही सामोरं येईल त्याला सामोरं जायचं, हे मी, माझे कुटुंबीय सगळेच शिकलो. त्या घटनेने माझ्या मनावर खोल परिणाम केला. त्यामुळे छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधला आनंदही घ्यायला मी शिकलो.’’ .. नक्षलवाद्यांनी गेल्या महिन्यात अपहरण केलेले सनदी अधिकारी व्हिनिल कृष्ण यांच्याशी ‘प्रहार’नं संवाद साधला, त्यातून उलगडलेलं त्यांचं मनोगत..
तळटीप: आज तळाला टाकायची टिपण्णी मी सुरुवातीलाच टाकतोय, तेंव्हा वाचकांनी ती "तळटीप" मानून वाचावी.
सर्व उपस्थित मंडळी: डॉक, भुंगा, स्मितहास्य, कणखर, किश्या, मंदार जोशी आणि आशुचँप
टांगारू: सखीराधा, आर्या, गिरिकंद, प्रसादपंत आणि समस्त पुणेरी गगोकर्स.
सर्व फोटो- सौजन्यः स्मितहास्य (अमोघ शिंगोर्णीकर)
****************************************************
नवा गडी नवं राज्य -- एक खुसखुशीत नाट्क
काल "नवा गडी नवं राज्य" हे नाटक बघितलं. त्याच हे परी़क्षण......
कलाकारः- उमेश कामत, प्रिया बापट, हेमन्त ढोमे आणी गिरिजा दातार.
पडदा वर जातो आणी नउवारी वर rain coat नेसलेली अम्रुता (प्रिया बापट) रंगमंचावर येते. तिच्याकडे पाहता पाहता आपलं लक्ष जातं ते SET कडे. अतिशय सुरेख असणारा सेट आणी त्याहुन सुरेख दिसणारी अमु.
अमु: लहानपणीचं बालपण हरवल्यामुळे लग्नानंतर पण अगदी बालीश वागणारी, लहान लहान गोष्टींनी आनंदुन जाणारी एक तुफान मुलगी.
२४ फेब्रुवारीक कोकन महोत्सवाचा उद्घाटन झाला.त्याचदिवशी मी गजालीकर आणि काही मायबोलीकरांका समस धाडलय '२६ फेब्रुवारीक माझो कोकण महोत्सवाक हजेरी लावच्हो बेत आसा,तुमका त्या दिवशी जमात काय येवक? म्हणुन'. शनीवर्कर मायबोलीकरांनी आधीच हात वर करुन जमणार नाय म्हणुन कळवल्यान. एका मायबोलीकरणीन तर माका काय कोकण महोत्सवात इन्टरेस्ट नाय म्हणुन रीप्लाय धाडलो. ( कसो होतलो अशानं कोकणचो कॅलिफोर्निया? ) हो नाय करता करता शेवटी मी आणि नीलुच रवलो आणि आम्ही दोघांच महोत्सवाक जावन ईलव.महोत्सवाक योगेश२४ भेटलो.
कोकण महोत्सवाची ही चित्रमय झलक.
शंख आणि कवड्या-शिंपल्या म्हणजे दळभदद्रीपणाची लक्षणे, हा जुना समज आता इतिहासात गडप झालाय. कारण, कधीकाळी कवडीचेसुद्धा मोल नसलेल्या या वस्तूना आता अमोल भाव येतोय... सिंधुदुर्गच्या समुद्र किनारी भागात सापडणार्या शंख-शिंपल्यांसारख्या समुद्री वस्तूंनी पर्यटकांना भुरळ घातली आहे. किनारी भागातील शेकडो कुटुंबांच्या हातात या वस्तूंमुळे पैसा खेळू लागला आहे. यामुळेच, गोड्या पाण्यात मोत्यांचे भौतिक संवर्धन करण्याच्या नव्या व्यवसायाची स्वप्ने श्रमाचं मोल ओळखलेल्या सिंधुदुर्गाला पडतायत...