मागोवा

होळीविशेषांक ’हास्यगाऽऽरवा २०१२’चे प्रकाशन!

Submitted by प्रमोद देव on 7 March, 2012 - 00:36

मंडळी ज्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहात होता तो आपला होळी विशेषांक ’हास्यगाऽऽरवा २०१२’ आज होळीच्या दिवशी आम्ही प्रकाशित करत आहोत. विनोदी लेखन ...त्यातूनही ठरवून विनोदी लिहायचे म्हटले की भलीभली सिद्धहस्त मंडळी माघार घेतात ह्याचा अनुभव ह्यावर्षीही आम्हाला आलाय. त्यामुळे हा अंक तसा अगदीच छोटेखानी झालाय ह्याची आम्हाला कल्पना आहे...तरीही हे निश्चित की जे काही आम्ही आपणासमोर सादर करणार आहोत त्यामुळे आपले निखळ मनोरंजन होईल ही खात्री आहे...तेव्हा करा सुरुवात वाचायला...आणि जमल्यास प्रतिसादही द्या.

अंकाचा दुवा:

http://holivisheshank2012.blogspot.in/

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

धाकल्या राजाची आठवण- काशीनाथ घाणेकर स्म्रुती दिन

Submitted by मोहन की मीरा on 2 March, 2012 - 05:29

आज काशीनाथ घाणेकरांची पुण्यतिथी.
काशीनाथ घाणेकर म्हंटलं की आठवतात संभाजी राजे. डेक्कन वरील संभाजी राज्यां चा पुतळा बनवताना डॉ. घाणेकरांचा फोटो समोर ठेवला होता, अशी अख्यायीका आहे.

अतिशय उत्कट, कधी कधी लाऊड वाटणारा अभीनय, प्रंचंड इन्टेन्सीटी, दाहक नजर, रुबाबदार व्यक्तिमत्व असे घाणेकर. लोकांनी खुप प्रेम केलेला कलाकार. खुप टाळ्या घेतलेला नट. गॅलरी साठी अभिनय करणारा कलाकार. अप्रतिम स्वगतांचा मालक. त्याच्या भुमिका त्याच्या होत्या. त्या इतरांनी करायच धाडस केलं नाही. ज्यांनी केलं त्यांना प्रेक्षकांनी स्वीकारलं नाही. या सम हा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

स्नेहसंमेलन

Submitted by खमंग चिवडा on 23 February, 2012 - 01:27

स्नेह संमेलनाचे आकर्षण सगळ्यांनाच असते, लहान वयापासुन मोठ्यापर्यंत स्नेहसंमेलन भरत असतात.
आठवणीत राहतात रे शाळा कॊलेजचे स्नेहसंमेलन. तारीख घोषीत झाल्यापासुन किंबुहूना काही मुंलाना अगोदरच कुणकुण लागली असते त्यामुळे तयारी जोरात सुरु होते..

माझ्या भावाने पण तयारी केलेली आहे, उद्या त्याच्या मुलीचे स्नेहसंमेलन, त्याने सर्व प्रथम ऒफ़िसला सुट्टी टाकली, मुलीचा कॉस्चुम आणला, नातेवाईकाना सांगीतले, घरी सराव करुन घेतला. वेळेवर काय करेल तिचे तिलाच माहीत.

गुलमोहर: 

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?

Submitted by शशिकांत ओक on 21 February, 2012 - 13:55

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?
मित्र हो,
आपण कडेगावच्या भानामतीची केस - प्रकरण 1 मधे वाचलीत. ती वाचून प्राचार्य अद्वयानंद गळतगे कोण? हे लिखाण का करत आहेत? असा प्रश्न साहजिक निर्माण होतो. त्यासाठी आपण विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे? याची भूमिका काय? ते वाचावे म्हणजे आपल्याला काही गोष्टींचा उलगडा व्हायला मदत होईल.
भूमिका

मोरा-अंगी असोसे। पिसे असती डोळसे।।

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

काही वृत्तपत्रांचे ग्रंथ समीक्षकांचे व्यक्त अभिप्राय

Submitted by शशिकांत ओक on 21 February, 2012 - 13:42

अभिप्राय
विज्ञान आणि अंधश्रद्धा आणि विज्ञान आणि बुद्धिवाद या ग्रंथांविषयी काही वृत्तपत्रांचे ग्रंथ समीक्षक आणि महाराष्ट्रातील इतर काही मान्यवरांचे व्यक्त अभिप्राय

दैनिक पुढारी -

...विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन व विज्ञान आणि बुद्धिवाद हे ग्रंथ मी वाचले आणि थक्क झालो. अनेक अभ्यासपुर्ण संदर्भ आणि वास्तववादी उदाहरणे देऊन लेखकाने दैवी चमत्कार व दैवी अथांगपणा उलगडून दाखवला आहे. ..

गुलमोहर: 

कर्नाटक सरकारचा भानामतीचा 'बुद्धिवादी शास्त्रीय शोध' प्रकरण ८

Submitted by शशिकांत ओक on 17 February, 2012 - 06:44

मित्र हो,
अनेकदा लोक करणी / भानामतीवरील त्यांना आलेला विलक्षण अनुभव मानो याना मानो अश्या तऱ्हेने सादर करतात.त्यानंतर अनेकांना आपापल्या अनुभवांची त्यात भर घालायला सुरसुरी येते. त्यावर नेहमीप्रमाणे उलटसुलट प्रतिक्रिया येतात.काही त्यांना सुचवतात, “आपण करणी वा भानामती खरी असते असे न बिचकता खणखणीतपणे म्हणा व त्यावर चर्चा करायला टाका”. काही म्हणतात, “भानामती /करणीचा तर स्वतःला अनुभव नाही पण लोकांचे किस्से जबरदस्त बुचकळ्यात पाडतात”.
लोक आपले अनुभव सांगायला का बिचकतात यावर ज्ञान तपस्वी प्राचार्य अद्वयानंद गळतगे एके ठिकाणी म्हणतात –

गुलमोहर: 

लोकसाहित्य आणि लोकपरंपरा

Submitted by विनीता देशपांडे on 12 February, 2012 - 02:14

"अहिराणी लोकपरंपरा"
लेखक- डॉ. सुधीर देवरे
प्रकाशक-ग्रंथाली प्रकाशन, मुंबई

भारत अनेक लोकपरंपरेनी नटलेला देश आहे. पिढी दर पिढी या परंपरा काळासोबत पुढे चालत रहातात. या प्रवासात कधी सोयीनुसार बदल केले जातात तर कधी परिस्थितीमुळे नकळत घडत असतात. अशीच एक लोकपरंपरा जपण्याचे आणि ती सगळ्यांपर्यन्त पोहचवण्याचे कार्य डॉ. सुधीर देवरे यांनी "अहिराणी लोकपरंपरा" या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.

गुलमोहर: 

ईश्वरवाद्यांची ‘अंधश्रद्धा’ आणि बुद्धिवाद्यांचा ‘डोळसपणा’ - प्रकरण 7

Submitted by शशिकांत ओक on 11 February, 2012 - 11:18

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन - प्रकरण 7
ईश्वरवाद्यांची ‘अंधश्रद्धा’ आणि बुद्धिवाद्यांचा ‘डोळसपणा’
ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे ब्लॉग वरून
बुद्धिवाद्यांच्या दृष्टीने कोणत्याही गोष्टीवर पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धा ठरते. पुराव्याशिवाय केले जाणारे सर्व व्यवहार हेही बुद्दिवाद्यांच्या दृष्टीने अंधश्रद्धेत मोडतात, हे अर्थातच निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. स्वाभाविकच बुद्धिवादी कोणताही व्यवहार पुराव्याशिवाय करीत नाहीत, असे मानणे चुकीचे ठरणार नाही.

गुलमोहर: 

कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण 1. ---

Submitted by शशिकांत ओक on 9 February, 2012 - 06:40

मित्र हो,
नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा.विचार करावा.
खालील अभिप्राय बोलका आहे.

गुलमोहर: 

दहावी/बारावी मनःस्थिती निरिक्षण/उपाय

Submitted by अशोक. on 9 February, 2012 - 01:53

शैक्षणिक विश्वात नित्यनेमाने होत असलेला तसेच केवळ संबंधित विद्यार्थीच नव्हे तर त्या त्या पालकांच्या दृष्टीनेही अतिशय संवेदनशील असलेला विषय म्हणजे 'दहावी' आणि 'बारावी' परीक्षा. गेल्या काही वर्षापासून सीईटीला आलेले महत्व विचारात घेऊनही असे म्हणावे लागेल की या दोन परीक्षांच्या चाळणीतून यशस्वीरित्या पार पडल्याशिवाय मुलगा/मुलगी आपले शैक्षणिक भवितव्य निश्चित करू शकत नाही. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीच्या परीक्षा होणार आहेत. तर १ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना प्रारंभ होणार आहे.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मागोवा