१७ सप्टेंबर - मराठवाडा मुक्ती संग्रामदिन

Submitted by विप्रा on 17 September, 2011 - 03:59

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.
१७ सप्टेंबर , आज ६३ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस.
स्वतंत्र भारतात सामिल होण्यास विरोध करणार्‍या निझामाने १९४८ साली ह्या दिवशी शरणागती पत्करली.
स्टेट काँग्रेस , कम्युनिस्ट , समाजवादी आणी आर्यसमाजी नेतेमंडळी ह्या लढ्यात सामील होत्या.
सरदार वल्लभभाई पटेलांनी सोलापुरमार्गे सैन्य हैदराबादला पाठवुन अ‍ॅक्शन यशस्वी केली.
आपला स्वातंत्र्य लढा अहिंसात्मक होता पण मराठवाडा मुक्ती संग्राम मात्र सशस्त्र होता.
रझाकाराच्या अत्त्याचाराला त्रस्त जनतेला स्वातंत्र्य १३ महिन्यांनंतर मिळाले.
स्वामी रामानंद तिर्थ ह्या लढ्याचे सर्वोच्च नेते , लढ्यात सामील इतर काही नावं. गोविंदभाई श्रॉफ , पि व्ही नरसिंहराव , शंकरराव चव्हाण , कॉ. चंद्रगुप्त चौधरी , कॉ व्हि डि देशपांडे , गंगाप्रसादजी अग्रवाल , विनायकराव चारठाणकर , बाबासाहेब परांजपे , नारायणराव लोहारकर , भगवानराव देशपांडे व इतर नेतेमंडळी.
जाणकार मंडळीनी माहितीत भर घालावी , हि विनंती.

गुलमोहर: 

आमची बँक स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ही निझामाची बँक .
१५ ऑगस्ट १९४८ ला संघटनेनी बँकेत ध्वजारोहण करायचे असे ठरवले, पण परवानगी नाकारण्यात आली. संघटनेचा उद्देश लक्षात घेऊन बँकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी बी. राजय्या आदल्या दिवशी रात्रीपासुन एका झाडावर लपुन बसला व त्याने सकाळी सुर्योदयाला ध्वज फडकावला.
त्याची व तत्कालीन संघटनेची नेतेमंडळी ह्यांची निष्ठा व देशप्रेम याची आठवण आम्हाला आजही करुन दिली जाते.
आजच्या दिवशी त्या लोकांच स्मरण करणे फार आवश्यक आहे.

हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाचा आज अमृत महोत्सव. ह्या लढ्याला आज ७५ वर्ष पूर्ण होत आहे. हैद्राबाद संस्थान निझाम राजवटीपासून मुक्त करण्यासाठी अनेकांनी कडवी झुंज देत प्राणांची आहुती दिली. त्या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली.