काल ३१ जानेवारी २०१२ रोजी कवीवर्य कै. गंगाधर महाम्बरे ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी लिहिलेल्या काही राग गीतांवर 'सूर शब्द लहरी' हा कार्यक्रम सुमनांजली तर्फे सादर करण्यात आला.

ह्या कार्यक्रमातील गीते पूर्व पश्चिम ह्या पुस्तकात गंगाधर महाम्बरे ह्यांनी लिहिलेली आहेत. पुस्तकात एकूण ५८ अशी गीते आहेत त्यातील निवडक गीते सादर केली गेले.
एकीकडे देखण्या बॉसिणीच्या लग्नाचा गम विसरण्यासाठी........आपलं सॉरी.......खुशी मनवत मान खाली घालून काम करत असताना आणि दुसरीकडे अर्थातच इमानेइतबारे मायबोलीवर गप्पागोष्टींवर टीपी करत असताना दक्षिणाचा फ्रायडे द थर्टीन्थला संध्याकाळी साडेआठ वाजता कसलंसं गटग असल्याचा लघुसंदेश आला आणि अस्मादिकांची तंद्री भंग पावली. संदेश नीट वाचताच दिनेशदांना भेटण्यासाठी गटग असल्याचं समजलं आणि आनंद गगनात मावेना. कारण मागच्या वेळी गटगला उपस्थित राहू न शकल्याने दिनेशदांची भेट झाली नव्हती .
'राब' ही अनंत मनोहर यांची कादंबरी. मराठी साहित्याचा एक मानदंड ठरावा अशी. पण दुर्दैवाने आतापर्यंत उपेक्षित राहिलेली. "मराठी साहित्य तोकडे / थिटे / कमअस्सल आहे का?" या सदाबहार विषयावर इरेसरीने चर्चा करताना जे अपवाद झळाळून डोळे दिपवतात त्यापैकी एक.
कथानक तसे सरळधोट आहे.
लोगो भाषा ही एक संगणकभाषेच्या शिक्षणासाठी शैक्षणीक साधन म्हणून १९६७ साली निर्माण केली गेली. "लोगो" हा एक ग्रीक शब्द असुन त्याचा अर्थही "शब्द" असाच आहे. लोगो संगणकभाषा अत्यंत सोपी, पण समर्थ भाषा आहे. लोगोला "लो फ़्लोर हाय सिलींग" भाषा असेही म्हणतात. म्हणजे, लोगोच्या अद्भुत जगात प्रवेश करून प्रोग्रॅमिंगची मजा लुटणे सुरू करणे कुणीही सहजगत्या करू शकते. पण याचा अर्थ असा नाही की, ती केवळ लिंबू-टिंबूंची भाषा आहे. लोगोमध्ये अवघड समस्या सोडवणे व क्लिष्ट प्रोग्रॅम लिहिणेही शक्य आहे.
आदरणीय झक्कींना कॉफी हाऊसवर मुलाखतीसाठी बोलावले पण त्यांनी नकारही दिला नाही आणि होकारही! या कृतीचा अर्थ आम्हाला समजेना! ज्यांच्या रोखठोक प्रतिसादांच्या किरणांनी मायबोलीची पहाट होते त्यांनी मुलाखतीच्या विचारणेबाबत मौन पाळावे हा प्रथम आम्हाला एक धक्कादायक प्रकार वाटला. नंतर आमच्या प्रतिभासंपन्न मेंदूने निर्वाळा दिला की झक्की म्हणत आहेत की 'मी मुलाखतीत काय उत्तरे देणार हे तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे, मग तुम्हीच प्रश्न आणि उत्तरे दोन्ही का लिहून टाकत नाही?'! हा विचार प्रत्यक्षात आणताना आम्हाला झक्कींच्या परवानगीची गरज भासली नाही ती याचमु़ळे!
जाऊ की नको जाऊ की नको.... या विचारात ५.४५ ला गाडीत बसलो आणि थेट निघालो ठाण्याकडे. वाटेत पंत (प्रसाद गोडबोले) आणि त्याचा रूममेट प्रथमेश यांना आयाअयटीच्या जवळ गाडीत कोंबलं....
आज फॉर अ चेंज, पंत भयंकरच सभ्य पोषाखात आला होता..... डोक्याचा पार गझनी केला होता त्याने... त्यावर थोडे थोडे काळे तण उगवलेले होते. प्रथमेशची मिशी एकदा बघाच म्हणजे "मुच्छे हो तो नथुलाल जैसी" पार विसरून जाल ..!!
मित्र-मैत्रिणींनो,
एक वाईट बातमी आहे. आंतरजालावरील लोकप्रिय लेखक धुंद रवी आणि त्यांचे कुटुंबियांवर महिन्यापुर्वी प्राणघातक हल्ला झाला. ही बातमी आज मला कळली. धुंद रवी आणि त्यांचे आई-वडील आणि बहिण यांच्यावर कोयत्याने वार झाले आणि झालेल्या जखमा खुप गंभीर स्वरुपाच्या होत्या.
पण दिलासा देणारी बाब एवढीच की ते मृत्युशी झुंज देऊन आता सावरताहेत.
आयुष्य पुर्णपणे सुरळीत व्हायला बराच काळ जाईल.
परमेश्वर त्यांना लवकरात लवकर संपूर्ण स्वास्थ प्रदान करो, ही सदिच्छा.
नाही नाही...लगेच आयबीएनला नका विचारु. ते कळवण्याची तसदी आम्ही घेतली आहे. तर कुठे काय विचारता महाराजा....मायबोलीच्या महिलांचं महागटग पार पडलं सुद्धा.गम्मत नाहीये काही.. !
बरं मला सांगा, तुम्हाला कधी कुणी सांगितलं की मायबोली आयडी ’किश्या’ या वर्षात १६ महिलांना एकत्र आणण्यास कारणीभूत ठरणार आहे तर विश्वास ठेवाल? अर्थात हे गगोवर किश्याने बोलायच्या आधीपासुन ठरत होतं आणि त्याच अनुषंगाने शोभाने त्याला आव्हान दिले होते याचा त्याला पत्ताच नव्हता. 
'कोंबडी पळाली' ह्या गाण्याचं हिंदीत रुपांतर झालयं हे पाहून खरचं खूप बरं वाटलं.अजय-अतुल ह्यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आज बॉलीवूड मध्ये चिकनी चमेली ह्या गाण्याने प्रसिद्ध होतयं पण.....
दिनांक 4 डिसेंबर 2011 रोजी भरत नाट्य मंदिरात सुचेतानंत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या, ग्रामीण जीवन शास्त्रज्ञ कै. आप्पासाहेब उर्फ एस.आर. भागवत यांच्या जीवनावर आधारीत 'निराळा योगी...' या चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, आणि स्थानिक स्वराज्य संस्था पुणे चे संचालक श्री. एस.जी. चव्हाण यांच्या हस्ते झाले. गुंजवणे येथील श्री. गुलाबराव रसाळ, सरपंच श्री. लिम्हण आणि भागवतांबरोबर काम केलेले श्री.