मैत्र जिवांचे : गणेशोत्सवातील उपक्रम

Submitted by ह.बा. on 7 September, 2011 - 03:47

हाले डुले आभाळाचे झुंबर माथ्याला
भगताच्या देव्हार्‍यात गणराज आला
मोर्‍या मोर्‍या म्हणे कुणी उधळी गुलाल
पावसाच्या गाण्यावर धरणीचा ताल......

बाप्पा येऊन सहा दिवस झाले. सजावटीपासून ते रोजच्या आरतीपर्यंत प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून करणार्‍या भक्तांच्या मेळ्यात दरवर्षी दंग असणारे काहीजण यावर्षी मात्र वेगळ्याच गडबडीत होते. मैत्र जिवांचे सामाजिक संस्थेशी जोडले गेलेले हे मायबोलीकर वेगवेगळ्या मंडळांच्या अध्यक्षांच्या मागावर होते. गणेशोत्सवापुर्वि मायबोलीवर विशाल कुलकर्णी (सचिव) यानी मायबोलीकरांना एक अवाहन केले होते. गणेश मंडळांसमोर बॅनर लाऊन मैत्र जिवांचे सामाजिक संस्थेचा विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा विचार होता. त्यानुसार विटा, कराड भागाची जबाबदारी दत्ता गायकवाड यानी घेतलेली आणि मी गणेशोत्सवासाठी कराडलाच असल्याने मीही सोबत होतोच.

मालखेड मधे सर्व पेठांमधील सर्व मंडळांसमोर हे फलक लावले गेले. त्याचबरोबर कासार शिरंबे या गावातही काही ठिकाणी हे फलक लावले गेले. विट्यात श्री दत्ता गायकवाड यानी ही जबाबदारी स्विकारलेली. त्यांच्याकडून फोटो अजून यायचे आहेत.

Image0021.jpgImage0020.jpgImage0040.jpgImage0043.jpg

(फोटो मिळताच बाकीच्या ठिकाणचे फोटो इथे प्रकाशीत केले जातील.)
मंडळांच्या शेडला, राजकीय पक्षांच्या बोर्डला, झाडाला जमेल त्या ठिकाणी फलक लावले गेले आहेत. विट्याचे व कराडचे सदस्य यासाठी खास वेळ काढून काम करत होते.

शहरी भागात असा विचार जास्त लवकर पटेल पण ग्रामिण भागातील लोक तयार होणार नाहीत अस काही लोकांनी यापुर्वी सांगितले होते. पण या फलकांच्या निमीत्ताने ग्रामिण भागातील लोकांची या गोष्टीला पुर्ण तयारी असल्याचे जाणवले. आम्ही तीन गावांमधे लोकांशी चर्चा केली व सरपंचांना गावात असा उपक्रम राबविण्याविषयी विचारले. एखाद्या ग्रामसभेत किंवा वेगळा कार्यक्रम आयोजित करून या विचारा विषयी ग्रामस्थांना पुर्ण माहिती देण्याची विनंती त्यानी मैत्र जिवांचेला केली आहे. आपण अशा माहितीपर कार्यक्रमाची तयारी करतो आहोत.

या उपक्रमात प्रोत्साहन देणार्‍या सर्व मायबोलीकरांचे आभार!!!

गुलमोहर: 

झक्कास....

"लेट अस काँग्रॅच्युलेट अवरसेल्व्ह्ज"

"मंजिल की जूस्तजूं मे मेरा कारवां तो है"... मैत्र जिवांचे हा Happy

पुण्यात एवढा अत्यल्प प्रतिसाद का मिळावा? >>> साद घातल्यानंतरच प्रतिसाद येतो. आपण सादच न घातल्याने कदाचीत प्रतिसाद कमी असावा. शेवटच्या तीन दिवसांसाठी आणि दुर्गा उत्सवासाठी मी काही मंडळांशी चर्चा केली आहे. ज्याला जिथे शक्य आहे त्याने तिथे बोलावे असे आधिच सांगितलेले आहे. मंडळाचा होकार कळताच एक एसेमेस करा फलक छापुन घरी पोहोचवला जाईल. सगळ्यांनी काम केल्यास पुण्यातही नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल.

आभार!

पुण्यात गणपती मंडळांची बहुतेक एकत्र संघटना / ग्रूप आहे ना? ह्या वर्षी मला कोणाला संपर्क करायला जमले नाही, परंतु पुढच्या वर्षी नक्की सहभागी होईन. चांगला उपक्रम आहे, सर्वांचा हातभार लागणेही तितकेच जरूरी आहे.
ह. बा. +१