बागराज्यात नाट्यसम्मेलनाची घोषणा

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
2’

All the Natya rasiks of the world,

Namaskar.

PLEASE SAVE THE DATES

29Th & 30Th May, 2010 in Raritan Center, NJ, USA.

for the historic event of 1st Vishwa Marathi Natya Sammelan

( this will be the 90Th Natyasammelan )

*Marathi Manoos has an insatiable thirst for Good Marathi nataks.

*To quench this inherent urge, we promise to bring you

the Best Marathi Plays from the world,

which will fully satisfy the taste of the US audience.

Sincerely yours,

Shri Mohan Joshi ( President – Akhil Bharatiya Marathi Natya Parishad )

Dr. Meena Nerurkar (President- Marathi Natya Parishad, US chapter)

* Manish Ingle * Nitin Limaye * Sanjay Shetye * Meena Deshpande

The details and the list of teams and team members to follow:

This historic Marathi Cultural event is supported by

Marathi Vishwa, NJ

Maharashtra Mandal, NY

Marathi Mandal, Philadelphia

प्रकार: 

मेरा टिकट आत्ताच रिझर्व करके रखो रे बाबा! मैं आतु!

देसाई विंग्रजीत का लिहीलं? अभिनंदन तुमच्या मंडळाचे. मी येणार. Happy

( आता पहिले कोमसाप, पहिले दलित मराठी सा.स. आणि पहिली वसंत व्याख्यानमाला, पहिला पुरूषोत्तम करंडक एवढीच काय ती अमेरिकेला यायची राहिली आहे. आणि बाकी उरलेले सा स आणि नाट्य स्पर्धा ह्यांनी इथेच खाते उघडले म्हणजे बरे, तिकडे सांगता येईल की आता भारतात पहिले क्षक्ष सा सा, क्षक्ष नाट्यस्पर्धा. हे जस्ट स्वगत. )

मी पण येणार!!!!

नुसतं नाटक बघायला यायचं का? करायला यायचं असेल तर?

विनय, ही स्पर्धा वगैरे आहे का? त्याचे नियम इ. कुठे मिळतील?

गेल्या वर्षी सॅन होसेला झालेल्या साहित्य सम्मेलनानं इकडे खूप धमाल उडवून दिली होती.. खूप वाद-विवाद माजले होते. शेवटी 'ते' सम्मेलन 'अधिकृत' नव्हतं असं जाहीर करून आणखीन एका 'अधिकृत' संमेलनाचा 'फार्स' महाबळेश्वरला 'उरकून' साहित्य महामंडळाने आपली उरलीसुरली इज्जतही घालवली. तीच पाळी अखिल नाट्य परीषदेवर येणार का?
बापू करंदीकर

देसाई विंग्रजीत का लिहीलं?<<<मला आलेली मेल इंग्रजीतच होती...

सगळेच या (घरी सोय करतो).

करायला यायचं असेल तर?<<<नाटक करायला यायचं असेल तर काय करायचं ते लवकरच कळवेन...
ही स्पर्धा वगैरे आहे का? <<< तिथे स्पर्धा नसते बहुतेक...

माझ्या हातात पडतील त्या मेल इथे टाकेन (नाहीतर नवीन बाफ उघडूया)....

बापू,
ते तर होणारच. साहीत्य परीषदेवरच्या लोकांनी आपली फुकटात अमेरीकायात्रा करून घेतली मग नाट्यपरीषद वाले तरी मागे कशाला राहतील. फक्त साहित्य संमेलनावरून झाला तसा गदारोळ होणार नाही. कारण या नाट्यसंमेलनांचा उत्साह आणि हजेरी स्थानिक लोकांचीच जास्त असते आणि त्यातलेही नाटकाच्या वेडापेक्षा प्रसिद्ध नट नट्यांना बघायला आलेले खूप. साहित्य संमेलनाला दरवर्षी भक्तिभावाने जाणारे लोक भरपूर आहेत. नाट्यसंमेलनाचं तसं नाहीये.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

1st Vishwa Marathi Natya Sammelan >> ह्याचा अर्थ काय? जगभरातून , कुठल्याही देशातून ह्या इव्हेंट साठी entries येवू शकतात काय? कि फक्त अमेरिका आणि भारत ह्यांसाठीच हे सिमित आहे?

म्हणजे आम्हाला दुबईतून entry देयची असेल तर काय करावे (नाटक करण्यासाठी) ?

<< साहीत्य परीषदेवरच्या लोकांनी आपली फुकटात अमेरीकायात्रा करून घेतली >>

आता अमेरिकेतल्या '"साहित्यप्रेमी"' लोकांनी त्यांना फुकटात यात्रा घडवली, तर ते का जाणार नाहीत?? होते तसे त्यांच्या नशीबात!

आता नाट्य परिषदेच्या लोकांचे भाग्य उजाडते आहे. उजाडू द्या.
फक्त 'पळा पळा ....' हे नाटक आणू नका म्हणजे झाले!!

<<*Marathi Manoos has an insatiable thirst for Good Marathi nataks.

*To quench this inherent urge, we promise to bring you>>

याबाबत म्हणायचे, तर नाटक, साहित्य वगैरे पेक्षा काहीतरी वाद उत्पन्न करायचे नि तडात्तड भांडत रहायचे. हिंदी, मराठी, इंग्रजी या सर्व भाषा एकत्र करून नुसते भांडत बसायचे. एव्हढीच फक्त "insatiable thirst" " Marathi Manoos " ला असते.

उगाचच विश्व नाट्य संमेलन म्हणायचे! पण खास अमेरिकन व्याख्येप्रमाणे विश्व म्हणजे अमेरिका नि उगाच आपले महाराष्ट्राला सामिल करून घ्यायचे. (भारतातली इतर राज्ये सुद्धा नाहीत.) म्हणजे लोकांना भांडायला कारण मिळते. नुसते म्हंटले असते की रारिटान मधे मराठी नाटके होणार आहेत, आणि त्याची जाहिरात मराठीतून केली असती, तर अशी "insatiable thirst for Good Marathi nataks" असलेला " Marathi Manoos " आला नसता का?

बहुतेक नाही. म्हणूनच खरी "insatiable thirst" असलेला " Marathi Manoos " गोळा करायचा असेल तर असे विवाद्य विधान करावे लागते.

शिवाय इंग्रजीतून लिहीले म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना पण समजायला बरे पडते. नाहीतर तिथल्या लोकांना कळणार कसे की मराठी भाषा आता अमेरिकेत पोचली आहे? (खरे तर 'पोचली' आहे म्हणण्यापेक्षा 'गेली' आहे असे म्हणणे सयुक्तिक व्हावे!)

Happy Light 1

>>आता अमेरिकेतल्या '"साहित्यप्रेमी"' लोकांनी त्यांना फुकटात यात्रा घडवली, तर ते का जाणार नाहीत?? होते तसे त्यांच्या नशीबात! आता नाट्य परिषदेच्या लोकांचे भाग्य उजाडते आहे. उजाडू द्या.<<
मला काही प्रॉब्लेम नाहीये कुणाला फुकटात अमेरीकायात्रा घडली याबद्दल. गरजही नाही.

>>फक्त 'पळा पळा ....' हे नाटक आणू नका म्हणजे झाले!!<<
तुमच्याकडच्या लोकांनीच ते नाटक सिलेक्ट केले होते. त्यांना कळायला नको? असो त्यातल्या तपशीलात मला इंटरेस्ट नाही.
परत एकदा साहित्यसंमेलन अमेरीकेत करण्याबद्दल जे माझे आक्षेप होते ते तसेच असतील.
जो देश आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून कलाकारांना व्हिसा देत नाही अश्या वेळेला नाट्यसंमेलन अमेरीकेत करणे ह्याचा विचार करणारे भारतातले नाट्यपरीषदवाले आणि अमेरीकेतली जी कोण संस्था असेल ती यांच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित करण्याजोगी परिस्थिती आहे.
नाट्यसंमेलनामधे केवळ चार व्यावसायिक नाटकांचे प्रयोग एवढेच होत नाही. त्या ठिकाणी मराठी नाटकांच्या जगामधे कुठे काय चालले आहे, काय असायला हवे या सगळ्याचा उहापोह होतो. नाटक ही कला म्हणून कशी कशी आणि कुठे कुठे वाढत जाते आहे याचा परामर्श घेता यावा यासाठी विविध परिसंवाद, चर्चा याबरोबरच घडणारे नवीन प्रयोग हे ही असतात. उल्लेखनीय प्रायोगिक नाटकांचे (उदा: कणकवलीच्या आचरेकर प्रतिष्ठानसाठी अतुल पेठेने दिग्दर्शित केलेला दिवाकरांच्या नाट्यछटांवर आधारीत प्रयोग, मोहीत टाकळकरची काही नाटके, ग्रिप्सची नाटके आणि असे बरेच काही..) प्रयोग हे ही याच विचाराचा भाग असतात, असायला हवेत. नाटकाच्या इतर भागांसंबधाने काही महत्वाचे प्रयोग आणि स्टेटमेंट करणारे प्रयोगही या ठिकाणी पुढे येऊ शकतात. या सगळ्यात असलेले कलाकार, तंत्रज्ञ हे अनेकदा व्यावसायिक रित्या स्थिरस्थावर न झालेले, घरातून भांडून आपलं नशिब या क्षेत्रात आजमावू पहाणारे म्हणजे थोडक्यात आमच्याकडे स्ट्रगलर्स ज्यांना म्हणले जाते ते असतात. या सगळ्यांना इथून उठून अमेरीकेत संमेलनासाठी घेऊन जाणं हे ही अमेरीकेतली संस्था निश्चितच करणार नाही. एकतर त्यांच्या आर्थिक गणितात ते बसणार नाही. तसेच यातल्या बहुतांश लोकांना व्हिसा मिळणार नाही कारण अर्थातच त्यांची आर्थिक परिस्थिती.
अश्या वेळेला तिथे जाऊ शकणारे लोक कोण तर नेहमीचे रूळलेले व्यावसायिक नटमंडळी.
समीक्षक, अभ्यासक, नवीन प्रयोग करणारे, करू पाहणारे दिग्दर्शक, लेखक इत्यादींना तिथे स्थान नाही. मग याला नाट्यसंमेलन म्हणणे ही सगळ्यात मोठ्ठी चूक.

अमेरीकेतील तथाकथित विश्व साहित्य संमेलन महाराष्ट्र शासनाच्या अनुदानाशिवाय झालेले नाही. नाट्य संमेलन हे ह्या अनुदानाशिवाय होणार की नाही याबद्दल काहीही माहीती नाही पण अनुदानाशिवाय होण्याची शक्यता कमी.

माफ करा माझ्या मिळकतीतून कापल्या जाणार्‍या कराचा पैसा दुसर्‍या देशात रहाणार्‍या मराठी लोकांच्या संस्थेची नाट्य संमेलन भरवण्याची हौस पुरी व्हावी यासाठी वापरला जावा हे मला कदापि मान्य नाही. आमच्या खिशातून गेलेल्या टॅक्समधून नाट्यसंमेलन म्हणवून घेऊन अनुदान घेणे या सगळ्यालाच शंभर टक्के विरोध.

एवढीच हौस असेल तर महाराष्ट्र शासनाचा कणभरही पैसा/ नाट्यसंमेलनासाठी दरवर्षी काढून ठेवलेल्या पैशातला एकही पैसा न घेता नाचावे काय नाचायचे असेल ते.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

नीरजाला पूर्ण अनुमोदन.

"अमेरीकेतली जी कोण संस्था असेल ती यांच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित करण्याजोगी परिस्थिती आहे."

त्यांचा हेतू एकच. 'निस्ति धम्म्माल करायचीन्क्काय?' त्यात यत्किंचितहि शंका बाळगू नका कुणि.

हा सबंध अमेरिका देश त्याच एका हेतूने भारलेला आहे. त्यापायी जगातला सगळ्यात श्रीमंत देश, सगळ्यात गरीब झाला. पण फिकीर नॉट! पर्वा इल्लै! टेंशन मत लेनेका, क्या! लई धमाल!

सुदैवाने या 'नाट्यसंमेलना ' मागे 'अमेरीकेतली जी कोण संस्था' आहे त्यांची वैयक्तिक आर्थिक परिस्थिती जरा बरी आहे. तिकडे महाराष्ट्र शासन कुणाच्या पैशाचे काय करतात, याची इकडे कुणालाच काळजी नाही. त्या शासनाने पैसे दिले नाहीत तरी इथले लोक आर्थिक दृष्ट्या त्यांना काय करायचे ते करू शकतात.

शिवाय जर याला नाट्यसंमेलन म्हणू नये असे जर तेथल्या लोकांचे मत असेल तर त्यांनी तसे म्हणू नये. खर्‍या नाट्यसंमेलनात काय करायला पाहिजे ते तुम्ही तिकडे करा. त्यात इथे कुणाला काही गम्य नाही.
इथे पैसे गोळा करण्यासाठी , इथल्या लोकांनी जर याला 'विश्व नाट्यपरिषद' वगैरे नाव दिले, नि त्यामुळे जर इथले लोक पैसे देऊन आले, तर बरेच झाले.

माझी खात्री आहे, Marathi Manoos has an insatiable thirst "^ ONLY" for वादविवाद, कचाकचा भांडणे, एकमेकांना नावे ठेवणे. ते नाटक, साहित्य, वगैरे निमित्ताला कारण. म्हणून मग इथले लोक जातीलच. निदान मी तरी सध्या जायचा विचार करतो आहे, तोपर्यंत जगलो तर.

Happy Light 1

हे नाट्य संमेलन अमेरिकेत घेणे निरर्थक आहे.
प्रायोगिक नाटकांचे प्रयोग, नाट्यविषयक चर्चा वगैरे काहीही शक्य नाही.
त्याच त्या यशस्वी नाटकांचे प्रयोग आणी त्याच त्या प्रसिद्ध अभिनेत्यांना पहायला झालेली गर्दी.
निदान यावेळी बे एरिया मराठी मंडळाप्रमाणे सरकारी अनुदान घेण्याचा निलाजरेपणा दाखवू नये ही अपेक्षा.

>>सुदैवाने या 'नाट्यसंमेलना ' मागे 'अमेरीकेतली जी कोण संस्था' आहे त्यांची वैयक्तिक आर्थिक परिस्थिती जरा बरी आहे. तिकडे महाराष्ट्र शासन कुणाच्या पैशाचे काय करतात, याची इकडे कुणालाच काळजी नाही. त्या शासनाने पैसे दिले नाहीत तरी इथले लोक आर्थिक दृष्ट्या त्यांना काय करायचे ते करू शकतात. <<
मग साहीत्य संमेलनाच्यावेळेला कशाला घेतले अनुदान? आर्थिक परिस्थिती उत्तम असूनही महाराष्ट्र शासनाकडून अनुदान घशात घातलेच की.
बघू ना आता नाट्य संमेलनाच्यावेळेला नाकारतात का अनुदान ते.

>>त्यांचा हेतू एकच. 'निस्ति धम्म्माल करायचीन्क्काय?' त्यात यत्किंचितहि शंका बाळगू नका कुणि.<<
मग पार्टी करा, गटग करा.. नाट्य संमेलन म्हणून ज्यांना खरोखरीच मराठी नाटकांबद्दल काही आस्था आहे त्यांची खिल्ली उडवू नका.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

<<साहीत्य संमेलनाच्यावेळेला कशाला घेतले अनुदान?>>

माझ्या माहितीप्रमाणे ते घेतले नाही, किंवा त्याचे पैसे अजून पोचले नाहीत. पण जरी पैसे मिळाले तरी, त्यासाठी ते आयोजित केलेच नव्हते. त्यापेक्षा किती तरी जास्त खर्च त्या मंडळाने केला, नि कमी पडले असते तर आणखीहि केला असता. ते पैसे मागितले नव्हते, पण इथे पैसा आहे म्हणजे राजकारणी लोक घुसायचा प्रयत्न करणारच! म्हणून ते दिले. दिले तर घेतले. महाराष्ट्र सरकारला लाज वाटली असेल म्हणून दिले असतील!

निस्ति धम्म्माल करायला आयोजित केले होते. नि मी म्हंटल्याप्रमाने, त्यात साहित्याशी काही संबंध नव्हता, फक्त "Marathi Manoos has an insatiable thirst "^ ONLY" for वादविवाद, कचाकचा भांडणे, एकमेकांना नावे ठेवणे. ते नाटक, साहित्य, वगैरे निमित्ताला कारण."

म्हणून तसे नाव दिले!! नि लोकं भडकली, नि करणार्‍यांनी गंमत पाहिली. त्यातल्या कुणिहि त्याचे स्पष्टीकरण किंवा समर्थन जाहीर रीत्या केलेले नाही यावरून मी म्हंटले तेच खरे वाटते मला.

<<नाट्य संमेलन म्हणून ज्यांना खरोखरीच मराठी नाटकांबद्दल काही आस्था आहे त्यांची खिल्ली उडवू नका. >>
भारतातल्या नाट्य क्षेत्रातल्या व्यक्तींनी जर म्हंटले की तुम्ही याला नाट्यसंमेलन म्हंटले तर आम्ही येणार नाही, तर काय त्यांना जबरदस्ती उचलून आणणार आहेत का इथले लोक? याला साहित्यसंमेलन म्हणू नका, म्हंटले तर येणार नाही, असे म्हणाले का ते 'भारतातले साहित्यिक'?

तर माझ्या मते भारतीय लोक अशी खिल्ली उडवायला कारण आहेत. इथल्या लोकांनी असे पैसे फेकून आपल्याला हव्या त्या लोकांना बोलावून घ्यायचे नि त्यांनी पण लाळ गाळत यायचे नि त्याला म्हणायचे 'विश्व संमेलन'. कारण फुकट अमेरिका यात्रा घडत असेल तर काय वाईट? लोक काही का म्हणेनात! म्हणायचे, कोल्ह्याला द्राक्षे आंबट!

मला जर तुम्ही असे फुकट भारतात बोलावले नि माझा खर्च केलात तर मी पण येऊन आनंदाने राहीन. तुम्ही त्याला सांस्कृतिक देवाण घेवाण म्हंटले तरी हरकत नाही. वर वीस डॉलर टिप पण देईन, महाराष्ट्र सरकारने दिली तशी! एक धमाल चर्चा होईल भारतात, की झक्कीचा नि संस्कृतीचा काय संबंध? मी गंमत बघत बसेन. भारतीय इंग्रजीमधूनच होईल, म्हणजे मला समजणार नाही, नि मला वाटेल माझी स्तुती करताहेत हे लोक!! किंवा मागे नंदिनी ने म्हंटल्याप्रमाणे कुत्रे भुंकल्यासारखे वाटेल मला!!

Happy Light 1

विरोध करणार्‍यांना कुत्रे बित्रे म्हणणं यापलिकडे तुमच्यासारख्याकडून काही अपेक्षाही ठेवण्यात अर्थ नाही. चालूद्या तुमचं.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

संशोधन करून बघा. इंग्रजी बोलले की कुत्रे भुंकल्यासारखे वाटते हे नंदिनींनी म्हंटले आहे नि मी तसे लिहीलेहि आहे.

खरे तर मला तुमचा मुद्दा १०० टक्के मान्य आहे. जे काही इथे होणार आहे, त्याला उगाच 'विश्व नाट्यपरिषद' वगैरे म्हणणे म्हणजे क्कैच्च्याक्कैच्च!

तुम्ही पूर्ण वाचत नाही, काय लिहीले ते वाचत नाही, केवळ कुणि लिहीले आहे ते बघून काहीतरी लिहीता! म्हणजे जातिभेद तर जातच नाही, आता नामभेदपण. आनंद आहे. (जरा डोकं शांत ठेवून वाचाल तर निदान शेवटचे दोन शब्द कसे इथे चपखल बसतात ते जाणवेल.!)

आहे का तुमच्याजवळ उत्तर माझ्या खालील मुद्द्यांचे?

जे लोक येणार आहेत त्यांना तुम्ही व तुमच्यासारखे लोक समजावून सांगत का नाही, की हे तुम्ही जाता आहात ते 'विश्व नाट्यसंमेलन' असे न म्हणता, रारिटान इथे मराठी नाट्यप्रयोग होणार आहेत, एव्हढेच म्हणा! नि इथल्या लोकांना सांगायला सांगा की तुम्ही 'विश्व नाट्यपरिषद' किंवा 'विश्व नाट्यसंमेलन' वगैरे म्हणणार असाल तर आम्ही येणारच नाही!!

ऐकणार नाहीत का ते तुमचे? समजणार नाही का एव्हढी साधी गोष्ट त्यांना? नि त्यांना तसे कळले तरी वळेल का?

असे त्यांनी केले तर आम्ही म्हणू, या लोकांना काही तत्वे, मूल्ये आहेत. फुकट मिळाले म्हणून वाट्टेल ते खपवून घेणार नाहीत.

नाहीतर आमचा नेहेमीचा फॉर्म्युला. पैसे फेकले की आशा भोसले पासून कुणीहि येतात इथे, नाचतात, गातात, आपण आपले आरामात बसून म्हणायचे, पहा आम्ही इतक्या दूर येऊन 'मराठी संस्कृतीची मूल्ये जपली ' ! उगाच आपले वरवर म्हणायचे, नाते जुळले मनाशी मनाचे, नाहीतर, आमचे तुमचे प्रेम आहे वगैरे. पैसे फेकल्याशिवाय प्रेमाखातर काही ते येत नाहीत, नि पैसे फेकले की भारतातले कितीहि मोठे लोक काहीहि म्हंटले तरी इथे येऊन नाच गाणी करणार! भारतीयांच्या या असल्या वागणुकीमुळे त्यांच्याबद्दल काय आदर रहाणार?

भारतात हे लोक कुठल्यातरी भारतीय संस्थेचे पैसे खर्च करून अशी संमेलने भरवतात. समजा अमेरिका, इंग्लंड नि मध्यपूर्वेतल्या वर्षा इ. लोकांना पैसे देऊन भारतात बोलावून घेतले नि तिथे "विश्व नाट्यसंमेलन' केले तर चालणार नाही का? का नाही करत तसे? भारताखेरीज, खरेतर महाराष्ट्राखेरीज इतर कुठल्या देशाने असले 'विश्व संमेलन' भरवावे यात त्यांना त्यांचा अपमान नाही का वाटत?

कसले मोठे कलाकार नि कसले त्यांचे 'संमेलन नि परिषद?' फेकले पैसे की आले कुणिहि तिथून इथे! एव्हढेच फक्त खरे!

जोपर्यंत अमेरिकन लोक आमच्या मूल्यांना मान देत नाहीत, आमच्याकडे भीक मागत येत नाहीत, तोपर्यंत आम्ही अमेरिकेत येणार नाही, नि आलो तर आमच्या पैशाने येऊ, नि आम्ही म्हणू तसे करू! असे म्हणण्याची हिंमत किंवा इच्छा नाही तिकडे कुणाच्यात!

Happy Light 1

<<नाहीतर आमचा नेहेमीचा फॉर्म्युला. पैसे फेकले की आशा भोसले पासून कुणीहि येतात इथे, नाचतात, गातात, आपण आपले आरामात बसून म्हणायचे, पहा आम्ही इतक्या दूर येऊन 'मराठी संस्कृतीची मूल्ये जपली ' ! भारतीयांच्या या असल्या वागणुकीमुळे त्यांच्याबद्दल काय आदर रहाणार?

ज्या लोकांच्या महत्वाच्या समारंभांचे कुणि असे विडंबन केले तरी 'केवळ पैसे फेकले की जे लोक येतात' त्यांना काय म्हणावे? <<>>

विषयांतर असेल कदाचित, पण मला हा मुद्दा कळला नाही. BMMला आलेला प्रत्येक कलाकार हा व्यावसायिक आहे. त्याला अमेरिकेत काय, पण सोमालियात जरी पैसे देऊन बोलावलं तरी तो जाईल.. यात मला काहीच चुकीचं वाटत नाही. आशा भोसले यांनी भरपूर पैसे घेऊन अमेरिकेत कार्यक्रम केला, यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर कसा कमी होतो?

पैसे फेकले की?<<
कलाकाराबद्दल ही भाषा कशाला? कलाकाराने तुमचं फुकट मनोरंजन करावं का?
व्यावसायिक कलाकाराने कलेच्या प्रदर्शनाबद्दल पैसे घेतले तर काय चुकलं?
आशा भोसले काय कुठल्याच कलाकाराने पैसे घेऊन कला सादर केली तर चुकीचं काय?
तुम्ही काय उपकार करत नाही आहात.

पैसे फेकल्याशिवाय प्रेमाखातर काही ते येत नाहीत, <<
आणि मुळात त्यांनी प्रेमाखातर यावंच का? झोपडपट्टीत करायचा असेल शो तर ठिके प्रेमाखातर फुकट करणं. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यासमोर कशाला फुकट दाखवायची कला?

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

>>असे म्हणण्याची हिंमत किंवा इच्छा नाही तिकडे कुणाच्यात! <<
आहे. आणि मी ते केलेलं आहे. तेव्हा लॉस एंजेलिस मधल्या एका अतिशहाण्याने काय नी कसा त्रास दिलाय याच्या आठवणीही मी विसरले नाहीये.
कृपया शेंडाबुडखा नसलेली विधानं करू नयेत.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

अतिरेकी मतांचा मारा चालला आहे इकडे....? Sad

नीट वाचून मतं लिहीलीत तर चर्चा होईल नाहीतर लठ्ठालठ्ठी आहेच.. Happy

विनय

बरोबर आहे विनय.. शेवटी आम्ही आमचा विरोध नोंदवला म्हणजे आमची मतं अतिरेकीच मानली जाणार. पैसे फेकले की कोणीही कलाकार येतो असं म्हणणारे योग्य ठरणार.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

पण बाकीचे काय? ते जर व्यावसायिक असतील, नि जर "नाट्य संमेलन म्हणून ज्यांना खरोखरीच मराठी नाटकांबद्दल काही आस्था आहे त्यांची खिल्ली " उडवली, तरी केवळ पैसे मिळाले म्हणून ते येणारच असे असेल, नि तुमचे कराचे पैसे तुमचेच सरकार देणारच असेल तर आम्ही मौजमजा का ना करावी??

आम्ही भारतीय संस्कृति जपण्याचे फार मोठे काम करतो आहोत हो! (उपहास दर्शवणारी स्मायली).

तुमच्या लोकांचा पैशासकट हातभार नि पाठिंबा नि अनुमोदन आहे आम्हाला! त्यांच्याकडे तक्रार करा, की
"नाट्य संमेलन म्हणून ज्यांना खरोखरीच मराठी नाटकांबद्दल काही आस्था आहे त्यांची खिल्ली "
उडवू नका!

ते काही तुमचे ऐकणार नाहीत. व्यावसायिक म्हणा नाहीतर काही म्हणा, कुणि पैसे फेकले की येतात, नुसता धंदा आहे, त्यात उगाच साहित्य, संगित, नाट्य, नृत्य बद्दल 'आस्था आहे' असे काही नाही!

तुम्ही आपले मला शिव्या देऊन तुमचा राग शांत करून घ्या. नाहीतरी माझा जगात दुसरा काही उपयोग नाही सध्या.

Happy Light 1

नाट्यसम्मेलनाला विरोधः बोलावणार्‍याने बोलावले तरी तो येणार्‍याला पकडून आणत नाही आहे.

पैसे: इथे भरणार्‍या सम्मेलनाला भरपूर तिकीट देऊन लोक येतात. त्यात तुमचे पैसे वापरतो असा आरोप अतिरेकीच नाही का? भारताने पैसे दिले अगर न दिले तरी सम्मेलन होतेच. न्यूयॉर्कला मुखमंत्र्यानी दिलेली रक्कम तशीच्या तशी (किंवा जास्त करून) त्यांच्या फंडाला परत दिलीच होती. तेव्हा तुमचा विरोध अस्थानी आहे...

व्यावसायिक कलाकाराचे पोट त्या पैशावर चालते त्यामुळे तो पैसे दिले की येतो. मग एकिकडे त्याने 'पैसे घेतले तर काय चुकले?' आणि दुसरीकडे (नाट्यसम्मेलन म्हणून खिल्ली उडवू नका) असे म्हणणे हा अतिरेकच.
इथे सम्मेलन करणारे उदात्त विचाराने करतच नसतील असे जरी धरले तरी 'नाट्यपरिषदेची' याला मान्यता असल्याशिवाय असले कार्यक्रम होत नाहीत, हे तुलाही माहीत आहे.

तेव्हा नक्की विरोध आहे का आणि तो कशासाठी आहे, आणि तो कुणाकडे व्यक्त करावा हे ठरवावं लागेल..

विनय Happy

तुम्ही आपले मला शिव्या देऊन तुमचा राग शांत करून घ्या.<<
माफ करा पण मी तुम्हाला एकही शिवी दिलेली नाही.
तुम्हीच पहिल्यापासून वाकडी भाषा वापरताय.

कोणाच्याही लेखी माझ्या म्हणण्याला किंमत नाही हे सांगण्याचा तुमचा अट्टाहास महान आहे. त्या वस्तुस्थितीची जाणीव मला नाही असं तुम्हाला का वाटतं हे ही मला माहीत नाही.

तरीही जर इथे विषय निघालाय तर विरोध नोंदवायचाच नाही या अट्टाहासाचे कारणही कळले नाही.

बाकी तुमचं संमेलन, तुमचे फेकायचे पैसे सगळं तुमचं तुम्हाला लखलाभ.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

नीधप, तुझ्या पहिल्या पोस्टला अनुमोदन.

परंतु असे संमेलन भरवणार्‍या मंडळाचे हेतू जितके संशयास्पद, तितकेच अशा संमेलनाला भारतीय करदात्यांच्या पैशातून अनुदान देऊ करणारं (दिलं की नाही मला माहीत नाही) शासन संशयास्पद नाही का? नीधपने लिहिलेल्या (अचूक) मुद्द्यांसाठी याला मुळात नाट्यसंमेलन म्हणताच येणार नाही. असं असताना व्यावसायिकतेच्या नावाखाली तिथे येऊन परफॉर्म करणार्‍या कलाकारांची त्यांच्या कलेबद्दलची निष्ठा नाही का संशयास्पद? हे कलाकार/निर्माते नंतर उजळमाथ्याने 'अमेरिका गाजवून आलेले नाटक' अशा प्रकारची जाहिरात करतात की नाही? त्यांनी अशा संमेलनावर बहिष्कार टाकायला हवा की नको?

अर्थात याचा संबंध BMMला आलेल्या कलाकारांशी जोडणं चूक आहे. आशा भोसले यांचं उदाहरणही त्या अर्थी चूकच. पण झक्कींचा मुद्दा बहुधा मी मांडला आहे तोच असावा.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

विनय,
इथे सरळसरळ आता मला आरोपीच्या पिंजर्‍यातच उभं केलंस तू. तुला माझ्या वाक्यात अतिरेक जाणवतो झक्कींच्या बोलण्यात नाही.
मी इथे विरोधही दर्शवायचा नाही या तुमच्या अपेक्षेत अतिरेक तुम्हाला जाणवत नाही

>>पैसे: इथे भरणार्‍या सम्मेलनाला भरपूर तिकीट देऊन लोक येतात. त्यात तुमचे पैसे वापरतो असा आरोप अतिरेकीच नाही का? भारताने पैसे दिले अगर न दिले तरी सम्मेलन होतेच. न्यूयॉर्कला मुखमंत्र्यानी दिलेली रक्कम तशीच्या तशी (किंवा जास्त करून) त्यांच्या फंडाला परत दिलीच होती. तेव्हा तुमचा विरोध अस्थानी आहे...<<
ठिके. माझ्या माहीतीतली ती चूक.

>>व्यावसायिक कलाकाराचे पोट त्या पैशावर चालते त्यामुळे तो पैसे दिले की येतो. मग एकिकडे त्याने 'पैसे घेतले तर काय चुकले?' आणि दुसरीकडे (नाट्यसम्मेलन म्हणून खिल्ली उडवू नका) असे म्हणणे हा अतिरेकच.<<
हा अतिरेक कसा काय?
नाट्यसंमेलन आणि नाटकांचे प्रयोग यात फरक नाही का? तुम्ही 'फेका' पैसे आणि करा नाटकांचे प्रयोग त्याबद्दल कोण कशाला काय म्हणेल? पण महत्वाच्या घटकांना डावलून तुम्ही पैसे फेकून प्रयोग लावणार आणि त्याला नाट्यसंमेलन कसं काय म्हणणार? आहे तुमच्या संस्थेची ताकद व्यावसायिक नटांशिवायही इतर धारांना समाविष्ट करून घेण्याची? आणि त्या आर्थिक दुर्बल गटांना व्हिसा नाकारला जाणार नाही याची खात्री तुम्ही देऊ शकता? निश्चित नाही. मग ते नाट्यसंमेलन कसं काय? हे सगळं सुरूवातीच्या पोस्टमधे मी लिहिलंय. पण ते वाचलं नसणारच.

>>इथे सम्मेलन करणारे उदात्त विचाराने करतच नसतील असे जरी धरले तरी 'नाट्यपरिषदेची' याला मान्यता असल्याशिवाय असले कार्यक्रम होत नाहीत, हे तुलाही माहीत आहे.<<
माझ्या दुसर्‍याच पोस्टमधे मी नाट्यपरिषदेच्या हेतूबद्दलही शंका घेतलीये हे वाचलं नाही का?

>>तेव्हा नक्की विरोध आहे का आणि तो कशासाठी आहे, आणि तो कुणाकडे व्यक्त करावा हे ठरवावं लागेल..<<
चालेल तुम्ही ठरवा आणि सांगा. आम्हाला अतिरेकी ठरवून घ्यायचे नसेल तर तुम्ही सांगाल तेच म्हणावं लागेल.

स्वाती,
>>असं असताना व्यावसायिकतेच्या नावाखाली तिथे येऊन परफॉर्म करणार्‍या कलाकारांची त्यांच्या कलेबद्दलची निष्ठा नाही का संशयास्पद? हे कलाकार/निर्माते नंतर उजळमाथ्याने 'अमेरिका गाजवून आलेले नाटक' अशा प्रकारची जाहिरात करतात की नाही? त्यांनी अशा संमेलनावर बहिष्कार टाकायला हवा की नको?<<
मी कोणाचीच भलावण करत नाहीये. व्यावसायिक कलाकाराने पैशासाठी कुठेही प्रयोग केला तरी त्यात चूक नाही. त्याला पैसे फेकणं इत्यादी माजुरडी भाषा वापरणं, त्यांनी प्रेमाखातर करावेत प्रयोग अशी अपेक्षा ठेवणं याला मी चूक म्हणतेय.
भारतात संमेलन झालं तर त्यातले ३०% लोक सुद्धा हजर नसतात ही पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच पहिल्या पोस्टमधे मी हेही लिहिलं होतं की साहित्य संमेलनाला झाला तेवढा गदारोळ होणार नाही.
त्यांनी संमेलनावर बहिष्कार टाकावा ही अपेक्षा करणं व्यर्थ आहे कारण नाट्यपरिषदेचा निर्णय त्या व्यावसायिकांच्या अमेरिकावारीसाठीच केवळ झालेला आहे हे उघड आहे. ज्यासाठी मी सुरूवातीलाच नाट्यपरीषदेच्या हेतूवरही शंका घेतली आहे.
इथे आम्ही प्रायोगिक नाटकांना प्रयोगाला जागा मिळावी म्हणून परीषदेशी भांडतो. परीषद परस्पर त्यासाठी ठेवलेल्या जागेचा वापर वेगळ्याच कारणांसाठी करायचा निर्णय घेते. भर पावसात उभं राहून परीषदेच्या सदस्यांच्या तोंडावर त्यांचा निषेध करतो. दामूकाकांच्यासारखा माणूस शेवटपर्यंत यासाठी आटापिटा करतो. निघून जातो या जगातून पण नाट्यपरीषदेला काडीचाही फरक पडत नाही.
हे सगळं माहीत असताना नाट्यपरीषदेची भलावण मी करणं शक्य नाही किंवा त्यांच्याकडून काही अपेक्षा करणंही.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

Pages