मायबोलीचे नवीन मुख्य प्रशासक

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

कुठल्याही संस्थेचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारी एक गोष्ट म्हणजे अनेक व्यक्तिंचा त्यात असलेला सहभाग. नुसत्या अनेक व्यक्ती असणे पुरेसे नसते तर वेगवेगळ्या भूमिका आणि त्या पार पाडण्यासाठी लागणारी कौशल्ये, वेळ यांचेही गणित जमावे लागते. आणि जसे पाणी वाहते असले की जास्त चांगले तसे एकाच भूमि़केत संस्थेतली माणसे फार वेळ राहिली तर संस्थेला शैथिल्य येते, व्यक्तिही तेच तेच काम करून कंटाळतात. नवीन नेतृत्वाला संधी मिळणे आवश्यक असते. त्यामुळे व्यवस्थित नियोजन करून अंमलात आणलेला बदल आवश्यक ठरतो. आणि मी स्वतःही अशा आवश्यक बदलाला अपवाद नाही.

मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की मायबोलीचे/हितगुजचे नवीन मुख्य प्रशासक(Admin) म्हणून श्री समीर सरवटे (समीर) यांनी जबाबदारी उचलली आहे. समीर गेली ९ वर्षे मायबोलीचे सभासद आहेत. त्यांनी अनेक वर्षे हितगुजचे नेमस्तक (Moderator) म्हणून काम केले आहे. ते मुख्य संपादक असताना २००३ साली हितगुज दिवाळी अंकाला मुंबई मराठी पत्रकार संघाचे पारितोषिक मिळाले होते. सध्या गेले २ वर्षे मायबोली इंक यासंस्थेचे मुख्य वित्तअधिकारी हा अतिरिक्त भार ही तें संभाळत आहेत.

मी समीर सरवटे यांचं हार्दिक अभिनंदन करतो. माझ्यावर तुम्ही जसं प्रेम केलंत, जसा मला पाठींबा दिलात तसाच त्यानाही मायबोलीकरांकडून मिळेल याची खात्री आहे.

अजय गल्लेवाले.

(जाता जाता: नाही मी इतक्यात निवृत्त होत नाहीये! मायबोलीचा वाढता पसारा पाहता प्रशासकीय काम, तांत्रिक सुविधा आणि मायबोलीचे काही नवीन उपक्रम या सगळ्यांवर काम करताना सगळीकडेच माझं दुर्लक्ष होत होतं. आता तांत्रिक सुविधा, नवीन उपक्रम याकडे थोडं जास्त लक्ष देता येईल. किंवा प्रशासकीय कामामुळे नवीन सुविधा द्यायला वेळ मिळत नाहीये असल्या सबबी मला देता येणार नाही :)).

विषय: 
प्रकार: 

अजय, समीर,

मायबोली आज मराठीतलं सर्वांत मोठं संकेतस्थळ आहे, आणि असंख्य मायबोलीकरांसाठी हे केवळ एक विरंगुळ्याचं साधन नसून, दैनंदिन आयुष्याचा एक भाग आहे..

आपल्या दोघांचेही मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन Happy

नवीन प्रशासकांचे अभिनंदन! Happy
मग नवीन प्रशासक हे अ‍ॅडमिन आणि जुने अ‍ॅडमिन हे वेबमास्टर का?

नवीन प्रशासकांचे अभिनंदन! Happy

अरे वा, अभिनंदन समीर.. आणि अजयना शुभेच्छा नवीन योजनांवर काम करण्यासाठी., पुढच्या वाटचालीसाठी. Happy

अभिनंदन समीर !
आणि अजय तुमचे मनःपूर्वक आभार.

अभिनंदन समीर! अजय - नवीन जवाबदारीसाठी शुभेच्छा.

अभिनंदन समीर.
आता तांत्रिक सुविधा, नवीन उपक्रम याकडे थोडं जास्त लक्ष देता येईल. किंवा प्रशासकीय कामामुळे नवीन सुविधा द्यायला वेळ मिळत नाहीये असल्या सबबी मला देता येणार नाही >>>
अ‍ॅडमिन, म्हणजे आता मायबोली तांत्रिक सुविधा आणि नवीन उपक्रम या बाबतीत पण अजून छान होईल.
दोघांचेही आभार.

समीर, हार्दिक अभिनंदन!
अजय, तुम्हाला नविन उपक्रमासाठी शुभेच्छा!!

नवीन प्रशासकांचे हार्दिक अभिनंदन.
हे संकेतस्थळ इतक्या चोखपणे चालवल्याबद्दल अजय व समीर आपल्या दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.

  ***
  सरपंच, वाड्यावर समदी येवस्था केली हाय !

  समीरचे हार्दीक अभिनंदन..
  तसेच नवीन सुविधा लवकर समोर येणार.. त्यामुळे आनंद झाला.

  ----------------------
  हलके घ्या, जड घ्या
  दिवे घ्या, अंधार घ्या
  घ्या, घेऊ नका
  तुमचा प्रश्न आहे!

  नवीन प्रशासकांचे अभिनंदन.

  दोघांचेही अभिनंदन. मराठी संकेतस्थळांच्या भाऊगर्दीत "आपलीशी" वाटणारी मायबोली अजून बहरेल ही सदिच्छा.
  _________
  यो अ॒स्याध्य॑क्ष: पर॒मे व्यो॑म॒न्त्सो अ॒ङ्ग वे॑द॒ यदि॑ वा॒ न वेद॑

  नवीन प्रशासकांचे स्वागत आणि अभिनंदन..

  नवीन प्रशसकांचे अभिनंदन !!
  अजय
  >>>जाता जाता: नाही मी इतक्यात निवृत्त होत नाहीये! >>> हे वाचुन हायसे वाटले. तुम्हाला नवीन जवाबदारीसाठी शुभेच्छा !!!
  धनु.

  नवीन प्रशासकांचे प्रेमपूर्वक अभिनंदन आणि स्वागत! Happy

  ----------------------------------------------
  ऐसीयांचा संग देई नारायणा | ओलावा वचनां जयाचिया ||

  नविन प्रशासकांचे अभिनंदन Happy

  -------------------------------------------------------------------------
  जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी

  वाह, अभिनंदन समीर !
  आणि नवीन बदल पाहायची उत्सुकता आहे आता! Happy

  www.bhagyashree.co.cc/

  हार्दिक अभिनंदन समीर! प्रमोशनबद्दल पार्टी हवी Happy
  ---------------------------------------------
  यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

  वा. वा. अजय आणि समीर दोघांचेही अभिनंदन. Happy

  समीर- अभिनंदन आणि शुभेच्छा

  अभिनंदन आणि शुभेच्छा Happy
  ***************
  ॐ नमश्चण्डिकायै |

  नविन प्रशासकाचे माबोवर स्वागत आणि शुभेच्छा! Happy

  नविन प्रशासकांचे अभिनंदन !
  जुन्या प्रशासकांना नविन उपक्रमासाठी शुभेच्छा!!

  अजय नवीन उपक्रमाबद्दल अभिनंदन..
  समीर, नव्या जबाबदारीबद्दल ????????? Sad Happy काय म्हणू?

  -क्षण दरवळत्या भेटींचे अन हातातील हातांचे
  हे खरेच होते सारे का मृगजळ हे भासांचे

  नविन प्रशासकांचे अभिनंदन !
  जुन्या प्रशासकांना नविन उपक्रमासाठी शुभेच्छा!!

  साधना

  *****&&&*****
  Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

  मनःपूर्वक अभिनंदन समीर, आणि पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा. Happy
  असंख्य मायबोलीकरांसाठी हे केवळ एक विरंगुळ्याचं साधन नसून, दैनंदिन आयुष्याचा एक भाग आहे..>> असंख्य मोदक.
  आभार, अजय. Happy

  ---
  असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

  समीर, आपलं हार्दिक अभिनंदन! Happy
  अन अजय, तुम्हाला नविन उपक्रमासाठी शुभेच्छा!! Happy

  समीर : अभिनंदन रे .......... Happy

  ~~~~~~~~~~~~~~
  उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
  परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
  चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

  समीर, अभिनन्दन, अन शुभेच्छा Happy
  (पण ते "अ‍ॅडमिन" नाव बदलू नका रे! अ‍ॅडमिन या शब्दात जो दरारा आहे तो बाकी कुठल्या शब्दात व्यक्त होत नाही! हव तर सिनियर अ‍ॅडमिन, नि ज्युनियर वा डेप्युटी अ‍ॅडमिन म्हणा, शब्दप्रभुन्ना सिनियर्/ज्युनियर्/डेप्युटि शब्दान्करता मराठी शब्द शोधण्यास कामास लावा...... अस आपल माझ मत बर का!)

  Pages