शोले

शोले (इन ऑफिस)

Submitted by जित on 29 January, 2018 - 00:26

शोले म्हटलं की सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. जर चित्रपटांमध्ये राजा ठरवायचा झाला तर शोलेला पर्याय नाही. मध्यंतरी एका मित्राने हैदराबादमधल्या एका शोले थीम हॉटेल बद्दल सांगितले. तिथे म्हणे मॅनेजर गब्बरच्या वेषात असतो. गल्ल्यावर एक ठाकूर पण असतो. आणि वाढपी सगळे वेगवेगळ्या गावकऱ्याच्या वेषात. तेव्हापासून डोक्यात एक विचार होता, की जर एखाद्या ऑफिसमधले लोक, एकमेकांशी शोलेच्या आविर्भावात बोलू लागले तर कशी मजा येईल.
तेच शब्दरूप करायचा एक प्रयत्न.
——-
प्रसंग : प्रॉडक्शनमध्ये बग्स आलेत, क्लायंट उचकलाय, मॅनेजर त्याच्या QA लीडशी बोलतोय
——-

शब्दखुणा: 

शोले

Submitted by संतोष वाटपाडे on 7 April, 2015 - 00:32

" शोले "

काळतोंड्या गब्बराने वागणे बेफ़ाम केले
एक तोफ़ेनेच शेवट लंबुचे जयराम केले..

खोड ज्यादा बोलण्याची सर्व पोरींनाच असते
गाववाल्यांनी बसंतीला उगा बदनाम केले..

का पसरला आज सन्नाटा असा गावात भाई
आज डाकूंनी कुणाचे कारटे गुमनाम केले..

गाववाल्यांनो नका रोखू मला मी चाललो रे
या बसंतीनेच मजला रोज त्राहीमाम केले..

मावशे समजाव थोडे तू तुझ्या या कारटीला
लग्न करण्याच्या इराद्याला हिने इल्जाम केले..

हात नाही आज ज्याला केवढी बडदास्त त्याची
रामलालाने बिचार्‍या जे हवे ते काम केले..

सांग सांभा का रित्या हाती असा आलास तूही
कोण होती माणसे ज्यांनी तुम्हाला जाम केले..

शब्दखुणा: 

'शोले': एक वाहून गेलेले परीक्षण!

Submitted by राफा on 17 August, 2014 - 05:57

आप्पा जोशी वसईवाले (वाचक, दैनिक 'परखड')
दिनांक: १६ ऑगस्ट १९७५

शब्दखुणा: 

चित्रपटसृष्टीतील दुर्लक्षित लोक

Submitted by फारएण्ड on 10 November, 2013 - 22:03

'शोले' मधला पहिला मालगाडीवाला सीन...ठाकूरशी बोलताना टपावर पायाचा आवाज येतो. त्या डाकूला उडवायला अमिताभ वॅगनमधे जमिनीवर आडवा पडून वरती गोळी मारतो. नंतर त्याचे काय झाले ते पाहताना वेगात चाललेली मालगाडी व त्यामुळे "मागे" पडणारा डाकू. तसेच शेवटी धर्मेन्द्र सर्वांना "चुन चुन के" मारायला जाताना मोठ्या खडकावर उभा असलेल्या एकाला गोळी मारतो. तो तेव्हा भरधाव घोड्यावरून जात असल्याने तो तेथून पुढे गेल्यावर वरचा डाकू खाली पडतो. 'शोले' कितव्यांदा पाहताना या गोष्टी जाणवू लागल्या ते आता लक्षात नाही, पण काय जबरी एडिटिंग आहे असे तेव्हा आम्ही म्हणायचो.

शोले.

Submitted by मकरन्द जामकर on 5 May, 2012 - 03:49

यार, थोडी तू,
ढोसून घे !!
आज, जरा तू,
जगुनी घे !!!!

पाहशील तोच,
कितीदा "शोले "?
ष्टोरी ती पाठ,अन,
जीवन रटाळ झाले !!!!

भूतकाली रे,
काय दडलंय,
नको उगालूस
जे घडलय,
त्यावाचून का,
काही अडलंय ??
त्यापेक्षा पेला,
तो भर जरा,
जीवनात आनंद ,
भर जरा !!!!!!

वर्तमानाचा तू तर राजा,
दुखाचा न गाजावाजा,
आला दिन होई वजा,
कष्ट कर अन मार मजा,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

शोलेच्या ठाकूरच्या हातांचा शोध

Submitted by नितीन बोरगे on 23 February, 2011 - 02:06

मित्रानो शोले हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ३५ वर्ष लोटली आहेत. हा चित्रपट न पाहिलेली व्यक्ती शोधून सापडायची नाही. ह्या चित्रपटातील सर्व पात्रे लक्षात राहिली, पण सर्वात जास्त लक्षात राहतो तो हात नसलेला ठाकूर. "तेरे लिये मेरे पैर हि काफी है", अस म्हणत गब्बर वर तुटून पडणारा ठाकूर पहिला कि नुसता चेव चढायचा अंगात. हात कापलेल्या ठाकूरला लढताना बघताना मला लहानपणी जाम कौतुक वाटायचे. मग शाळेत खेळताना हात मागे बांधून मित्रांशी मारामाऱ्या देखील केल्या आहेत (आणि तोंडावर पडून नाक फोडून घेतली ते सांगायला नकोच,,).

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शोले