कादंबरी

लव्ह इन ट्रबल भाग- 3

Submitted by स्वरांगी on 14 May, 2019 - 10:17

लव्ह इन ट्रबल भाग- 3
अनु धावत पळतच अभिजीतच्या घरातून बाहेर पडली आणि बस स्टॉप वर जाऊन सरळ सिटी बस पकडली..बसूनच ती काल जे काही झालं त्याचा विचार करत बसली. शुभमला मेसेज करावा असा तिला वाटून गेलं आणि तिने मोबाइल बाहेर काढला. मेसेज टाईप करायला घेणार एवढ्यात तिला त्याचं वाक्य आठवलं, “ अनु आत्ताच्या अत्ता तिथेच थांब नाहीतर खरंच breakup होईल आपलं!!”

लव्ह इन ट्रबल भाग- 2

Submitted by स्वरांगी on 13 May, 2019 - 04:04

लव्ह इन ट्रबल भाग-२
अनघा आणि शुभमचं भांडण अक्ख कोहिनूर हॉटेल पाहत होत. त्यातच अभिजीतचही तिकडे लक्ष गेलं.
“ही इथे काय करतेय?” अभिजीतला आश्चर्य वाटलं. तो त्यांच्याकडेच पाहत होता. हळूहळू सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि आता पुढे काय होतंय याची वाट पाहू लागला. अनु पडली तेव्हा त्याला काय वाटलं कोण जाणे पण तो अचानक उठला आणि लांब लांब पावलं टाकत तिच्या दिशेने जाऊ लागला. आत्ता तिला इथून बाहेर काढणं त्याला जास्त गरजेचं वाटलं. अनु उठून खाली मान घालून उभी राहिली तोपर्यंत तो तिच्याइथे पोचलासुद्धा…

लव्ह इन ट्रबल...

Submitted by स्वरांगी on 12 May, 2019 - 07:32

लव्ह इन ट्रबल
रात्रीचे दिड वाजले होते. मुंबईसारख्या शहरात पूर्ण शांतता अशी कधी नसतेच, पण यावेळी अर्धीअधिक मुंबई गाढ झोपेत होती. घाटकोपर पोलीस स्टेशन मधे ‘इन्स्पेक्टर गायतोंडे’ आपल्या खुर्चीत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिडचिड, वैताग,निराशा, हतबलता असे संमिश्र भाव होते. उन्हाळ्यातही फुल स्पीड वर रेग्युलेटर असूनही घरघर करत एक च्या स्पीड वर फिरणारा डोक्यावरचा पंखा त्यांच्या या अवस्थेत आणखीनच भर घालत होता.

पीतांबर

Submitted by प्रतिक सोमवंशी on 23 March, 2019 - 12:51

अंधार दाटून आला की
सावल्या खायला उठतात
त्यांचे ते घाणेरडे स्पर्श,
नखांनी माझ्या कातडीला कुडतडन
घड्याळाच्या प्रत्येक सेकंदाला
(टिक, टिक, टिक, टिक)
माझ्या देहाची रोजची होणारी विटंबना
ते अंधारात माझ्याकडे सरसावणारे हात
माझ्या गळ्याचा घेतलेला घोट
माझ्या वेणीला धरून मला फरफटत नेताना
अजून अंधारात, काळोखाच्या टोकापर्यंत
माझ्या ड्रेसचा रक्ताने माखलेला शोल्डर
बस ,बस नाही सहन होत आता
(टिक, टिक, टिक, टिक)
हे घड्याळ, ही रात्रीची वेळ, या वाईट आठवणी
मला झोपायचय, मेंदूच्या नसा फुटण्याआधी
हे कान्हा,

शृंगार १४

Submitted by अनाहुत on 24 May, 2016 - 05:06

आजकाल काय चालल आहे तेच कळत नाहीए . काय तर म्हणे परांजपे सर need your help . छे मलापण वाटल करावी मदत पण मदत म्हणजे काय त्यांना आज अर्जंट काही माहिती हवी आहे आणि ते फक्त त्यांना जाऊन एक्सप्लेन करायच नव्हत तर ती डॉक्यूमेंट त्यांच्या ऑफिसमध्ये मलाच घेऊन जायची होती . छे आता एवढचं बाकी राहील होत . तरीही गेलो तर तिकडे वेगळाच प्रकार , माझ्याकडून डॉक्यूमेंट घेऊन मला चक्क ऑफिसच्या बाहेर थांबायला सांगण्यात आल व जाऊ नये अशी गळही घालण्यात आली . आता काय बोलाव हे समजत नव्हत .

विषय: 

मना तुझे मनोगत - ४

Submitted by युनिकॉर्न on 18 May, 2016 - 18:26

मना तुझे मनोगत - १ - http://www.maayboli.com/node/54052
मना तुझे मनोगत - २ - http://www.maayboli.com/node/54066
मना तुझे मनोगत - ३ - http://www.maayboli.com/node/56019

आधीच्या भागांनंतर परत एकदा मोठी गॅप झाली त्यामुळे आधीच्या भागांची लिंक देतो आहे.
फारसे प्रतिसाद न आल्यामुळे वाचकांना कथा आवडत नाहीये असं वाटतय.. काही सुधारणा हवी असेल तर प्लीज सांगा.

********************************************************************************************************

"आयला मग?"

"तो पोलीस नव्हताच रे. तिथलाच लोकल होता कोणीतरी. पण त्याच्याशी तिथे भांडण करण शक्य नव्हतं."

"तुला कसं कळालं?"

शब्दखुणा: 

शृंगार १२

Submitted by अनाहुत on 18 April, 2016 - 07:09

" Hi friend how r u ? " - राधिका

" I m fine n hows u ? " - मी

" काय बोलू fine म्हणू की खर सांगू ? " - राधिका

" खरच सांग . " - मी

शृंगार ११

Submitted by अनाहुत on 16 April, 2016 - 12:38

" तुमच्या बद्दल अस कस होऊ शकत ? "

" इथे physical strength कमी असण्यापेक्षा mental weakness मुळेच हा त्रास सहन करावा लागतो . "

" अरे brother sorry तुला आमच्यामुळे फार थांबाव लागल ." मघाचा बिल्डर अँड फ्रेन्डस् आले होते .

" अरे हे लोक्स कुठेपन पुस्तक ठेवतात त्यामुळ तुला त्रास, sorry हा भाई ." झालेल्या त्रासामुळ आणि त्याच्या थोड्याफार ताणाने त्याची original language परत आली होती .

शृंगार १०

Submitted by अनाहुत on 15 April, 2016 - 03:21

माणसाच्या मनाचही अस असत ना कधी कोणता विचार येईल आणि काय मानसिक स्थिती होईल सांगता येत नाही . तसच झाल होत आता . साधी दाढी करायची त्यातही दोन तीनदा कापून घेतल होत आता अशा परिस्थितीत मी न डगमगता मिशांकडे मोर्चा वळवला .

Pages

Subscribe to RSS - कादंबरी