लव्ह इन ट्रबल...

Submitted by स्वरांगी on 12 May, 2019 - 07:32

लव्ह इन ट्रबल
रात्रीचे दिड वाजले होते. मुंबईसारख्या शहरात पूर्ण शांतता अशी कधी नसतेच, पण यावेळी अर्धीअधिक मुंबई गाढ झोपेत होती. घाटकोपर पोलीस स्टेशन मधे ‘इन्स्पेक्टर गायतोंडे’ आपल्या खुर्चीत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिडचिड, वैताग,निराशा, हतबलता असे संमिश्र भाव होते. उन्हाळ्यातही फुल स्पीड वर रेग्युलेटर असूनही घरघर करत एक च्या स्पीड वर फिरणारा डोक्यावरचा पंखा त्यांच्या या अवस्थेत आणखीनच भर घालत होता.
त्यांच्या समोरच साधारण एक 27-28 ची तरुणी बसली होती. तिचे डोळे पाण्याने भरले होते आणि चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, आता काय होणार याची. तिचे हात रक्ताने माखले होते, कापड्यांवरही रक्ताचे डाग होते. तिच्या हाताला कंप सुटला होता गायतोंडेंनी तिच्याकडे एकवार पाहिलं आणि पुन्हा बोलण्यासाठी तोंड उघडलं.
“ हे बघा मॅडम, तुम्हाला मी आता शेवटचं विचारतोय. नक्की काय घडलय हे मला सविस्तर सांगा. मुंबईतल्या तुमच्या राहत्या फ्लॅट मधे ‘शुभम फडके’ या इसमाचा चाकू खुपसून बेदरकारपणे खून केला जातो.”
“ घटनास्थळी केलेल्या तपासात तो चाकू मिळालाय ज्यावर शुभमचं रक्त आहे आणि चाकूवर तुमच्या हाताचे ठसे सुद्धा! एवढा भक्कम पुरावा असूनही तुम्ही काहीच कबूल करायला तयार नाही?!”
“ बोला मॅडम बोला, काय वैर होत तुमचं त्याच्याशी की तुम्ही त्याचा जीव घेतला? काय संबंध होता तुमचा त्याच्याशी? बोला नाहीतर मला वेगळी ट्रीटमेंट द्यावी लागेल तुम्हाला…” गायतोंडे ओरडले.
“एफ आय आर तयार झालेलाच आहे, आता फक्त तुमचा कबुली जबाब लिहायचा बाकी आहे. लवकर बोला माझ्याकडे वेळ नाहीये.” गायतोंडेच्या ओरडण्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नव्हता. ती तरुणी तशीच शून्यात डोळे लावून बसली होती.
यावेळी तिच्या मनात फक्त एकच व्यक्ती होती, जी तिला ह्या सगळ्यातून वाचवू शकणार होती. त्याचाच विचार तिच्या मनात पहिल्यांदा आला आणि ती म्हणाली, “ मी एक फोन करू शकते का?”

अनघा कानाला फोन लावतच पायऱ्या उतरत होती. The number you are calling is currently switched off. समोरून उत्तर आलं. “ह्याला काय झालं फोन स्वीच ऑफ ठेवायला?” ती स्वतःशीच पुटपुटली. तिने पुन्हा फोन लावला पण पुन्हा तेच उत्तर आलं.
“च् , जाऊदे आता भेटूनच बोलते ह्याच्याशी.” ती शुभमला फोन लावत होती. शुभम आणि अनघा दोघं एक वर्ष रिलेशनशिप मध्ये होते. दोघही law students. ती फर्स्ट इयर ला होती तेव्हा तो लास्ट इयर ला. कॉलेजच्या annual फंक्शन ला त्यांची ओळख झाली. आधी ओळख मग मैत्री आणि त्यानंतर प्रेम… अनघा लास्ट इयर ला असताना त्याने तिला प्रपोज केलं आणि तिनेही हो म्हटलं. आताशीच त्यांच्या प्रेमाला एक वर्ष पूर्ण होणार होतं. शुभम आता एक मोठा lawyer झाला होता आणि त्यालाच भेटायला अनघा अंधेरी ला जात होती. मेट्रो आली तशी अनघा लगेच पुढे धावली. मेट्रोचे दरवाजे uiउघडले आणि सगळा लोंढा एकदम आत घुसला. आत सगळ्या सीट्स फुल्ल होत्या त्यामुळे उभंच राहावं लागणार होतं.
अनघा गर्दीतून घुसून वाट काढत जागा मिळाली तिथे हँडल धरून उभी राहिली. तिच्या शेजारी एक तरुण येऊन उभा राहिला. तिला पुढच्याच स्टेशन ला उतरायचं होत त्यामुळे तीचं बाहेरच लक्ष होतं.एवढ्यात तिला जाणवलं कि कुणीतरी आपल्या कमरेला हात लावतय.
तिने शेजारच्या तरुणाकडे एक कटाक्ष टाकला तर तो बाहेर बघत होता. दुसऱ्या बाजूला एक चाळीशी चा माणूस दुसरीकडे मान करून उभा होता. तिला वाटलं आपल्याला भास झाला असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं पण थोड्या वेळाने पुन्हा कुणितरी तिला हात लावल्याचं जाणवलं. तिने पुन्हा त्या तरुणांकडे रागाने पाहिलं,त्यानेही तिच्याकडे दुर्लक्ष केलं. पण थोड्या वेळाने पुन्हा तेच आता मात्र हद्द झाली!
“ बावळट!! दिसायला किती साधा सज्जन दिसतो पण आहे एक नंबरचा मवाली….” ती मनातच चरफडली.मधेच मेट्रो ला हिसका बसला आणि तो तरुण तिच्यावर आदळला
“सॉरी हा !!” तो म्हणाला.ती खोटंच हसली आणि त्याला म्हणाली, “ तूच ना तो?”
“काय म्हणालात?” तो.
“ मी जेव्हा मेट्रो मधून दहा वेळा प्रवास करते ना तेव्हा त्यातल्या एका प्रवासात मला तुझ्यासारखं कोणीतरी भेटतंच…”
आता अनघा त्याच्याकडे तोंड करून उभी राहिली आणि त्याला म्हणाली, “हॅलो !! तुला भेटून आनंद झाला मला…”
त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि तिला विचारलं, “ तुम्ही माझ्याशी बोलताय का?”
“ हो ,हो ,अगदी तुझ्याशिच बोलतेय...” ती
“ माझ्याशी? तुम्ही ओळखता का मला?” तो.
“ हो तर!! अगदी चांगलं ओळखते मी तुझ्यासारख्या मवाली आणि सायको लोकांना…” अनघा रागाने म्हणाली. आता मात्र आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे बघायला लागले.
“ Excuse me? तुम्ही मला तर मवाली म्हणत नाहीयेत ना? हे बघा तुम् …”
“ मी बघतेच आहे ..”
“ तुम्ही मला काय समजलात? पुन्हा बोला?” तो बुचकळ्यात पडला.
“ मवाली!! गुंड!!!” ती.
“ पण का?” तो.
“Because you just touched my ass in really disgusting way…..” अनघा चिडून ओरडली.
“Why would I touch your ass? “ तो उडालाच..
“ हाच तर माझा प्रश्न आहे!! का तु मुलींना हात लावतोस?” ती वैतागून म्हणाली.
“ मी नाही हात लावला!!!! शप्पथ!!!” तो आश्चर्याने म्हणाला.
“मी खरंच हात नाही लावला!!” तो सगळ्यांकडे पाहत म्हणाला.
“मला फक्त एवढंच सांग तुला असं का वाटलं की मी..? “ आता तो वैतागला होता. आता तोही एकेरीवर घसरला.
“ तुझ्यासारख्या लोकांना मी चांगलीच ओळखते. तू कुणाला मूर्ख बनवतोयस?? माझी नजर एकदम तीक्ष्ण आहे या बाबतीत..” “ तुला माहितेय ? According to आय पी सी सेक्शन – ३५६ शारीरिक जवळीक करण्याचा प्रयत्न केल्यास १ ते ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते…” अनघा दम देत म्हणाली. “हे बघ बोलण्या आधी नीट स्टडी करून बोलत जा. According to सेक्शन – ३५४ आहे ते, ३५६ नाही..” तो गंभीरपणे म्हणाला.
“ सी! तुझ्यासारख्या लोकांना असले कायदे पाठच असतील!! अगदी बरोबर ओळखलंय मी तुला.” ती.
“ मी कोण आहे हे मला तुला पटवून द्यायची गरज मला वाटत नाही.” तो.
एवढं सगळं सुरू असताना अनघाच्या शेजारी असलेला दुसरा माणूस मात्र सुटलो म्हणून देवाचे आभार मानत होता… खर तर त्या चाळीशीच्या माणसानेच तिची छेड काढलेली पण त्याच्याकडे बघून तिला वाटलं नाही की हा अस काही करेल.. तो मात्र आता मजा बघत होता. “ तुला काही वाटत नाही का असं करायला??का वागलास असं?” ती.
“ तू का वागतेयस अस माझ्याशी?!!” तो कंटाळून म्हणाला.
अनघा इकडे तिकडे पाहून त्याच शेजारच्या माणसाला म्हणाली, “ काका, याची कंप्लेंट करा पोलीस स्टेशनमध्ये!!”
“ ओ काका, काही कंप्लेंट वैगरे करू नका प्लीज..” तो काकुळतीला आला
“ चोर तो चोर वर शिरजोर? थांब आत्ता फोन लावतो पोलिसात!!” तो इसम दात ओठ खाऊन म्हणाला.
“बाजूला हो माझं स्टेशन आलं मला उतरायचंय” त्याला बाजूला करत अनघा घुश्यात उतरली. “ अरे! मला पण इथेच उतरायचंय!!” त्या तरुणाच्या लक्षात आलं आणि तोही उतरू लागला पण अनघा ने त्याला उतरुच दिलं नाही. मेट्रोचा दरवाजा बंद झाला आणि तो आतच राहिला. अनघाने त्याला बाहेरूनच बाय बाय केलं. तिला स्वतःशीच हसू आलं तिच्या वागण्यावर.
“ या गोंधळात इथे शुभमला का भेटायला आलेय हे विसरूनच गेले मी.” अनघा गंभीर झाली. तिला तिच्या बेस्ट फ्रेंड रेश्मा ने मेसेज केला की शुभमच बाहेर afair सुरू आहे आणि तो आजच त्या मुलीला ‘kohinoor continental' मध्ये भेटणार आहे. अनघालाही त्याचं वागणं गेले काही दिवस वेगळं वाटत होतं पण तिने दुर्लक्ष केलं. पण आता ती दुर्लक्ष करणार नव्हती आणि त्यासाठीच ती शुभमला रंगेहात पकडायला Kohinoor ला जाणार होती.आता अनघा कोहिनूर समोर उभी होती. “ आता जे व्हायचंय ते होऊदे!” असं म्हणुन तीने एन्ट्री केली आणि इकडे अभिजीत Kohinoor मध्ये entre झाला.
“ अरे, तू नेहमी वेळेवर येणारा, आज इतका उशीर का झाला रे तुला?” सिनियर advocate ‘ मि. बर्वे ‘अभिजीतला पाहून म्हणाले.
“ काय सांगू तुम्हाला? तुम्हाला एक वॉर्निंग देतो. 7.45 च्या दरम्यान घाटकोपर ते अंधेरी मेट्रोने अजिबात ट्रॅव्हल करू नका. तिथे तुम्हाला एक सायको मुलगी भेटू शकते.” अभिजित त्यांच्या समोर बसत म्हणाला.
“ सायको मुलगी???? काय झालं?” बर्व्यांनी आश्चर्याने विचारलं.
“ She was completely crazy.. तिने पार मवाली करून टाकला मला!!” अभिजित चिडून म्हणाला.
“तुला??? का?? “ बर्वे.
“ मला नाही माहीत. तिने सगळ्यांसमोर लाज काढली माझी मी काहीही केलं नसताना!! अभिजित डोकं पकडून म्हणाला. “ तू आधी शांत हो. हे घे पाणी पी.” अभिजीतने ग्लास ओठाला लावला आणि इकडे त्याच्या मागेच थोड्या अंतरावर एका टेबल वर अनघा आणि शुभम बसले होते. अनघा आत आली तेव्हा समोरच तिला शुभम आणि त्याच्यासोबत एक मुलगी गळ्यात गळे घालून फिरताना दिसले. दोघांची पाठ असल्याने तिला त्या मुलीचा चेहरा नाही दिसला. ती तशीच स्तब्ध उभी राहून त्यांना पाहत होती. धक्काच बसला तिला. मधूनच शुभमचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि तो त्या मुलीला परस्पर पाठवून अनघासमोर येऊन उभा राहिला.आणि आता ते समोरासमोर बसून बोलत होते.
“ बोल. आता काय बोलायचंय तुला? Explain कर.” त्याच्याकडे रोखून बघत अनघा म्हणाली.
“ माझ्याकडे explain करायला काही नाहीये, पण मी accept करतो माझी चूक. मला अजूनही तू आवडतेस. मी पुन्हा अस नाही करणार.” शुभम casually म्हणाला.
“ तुला मस्करी वाटतेय ही सगळी?” अनघा चकित होऊन म्हणाली.
“ मग तूच सांग मी काय करू आता?” शुभम शांतपणे म्हणाला.
“ Try to be serious and honest, you jerk!!” अनघाने जोरात टेबल वर हात आपटले. तिच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या.
“ हे बघ अनु, इट्स जस्ट अ वन नाईट स्टँड!!” शुभम निर्लज्ज पणे म्हणाला. “सी अनु आय एम यंग, होत अस कधी कधी पण जाऊदे यार एवढं काय त्यात!! मुलांच्या पण काही गरजा असतात..सोडून दे ना तू! We are still in relationship..”
“ तुला अस म्हणायचंय की तू मुलगा आहेस म्हणून मी हे सगळं चालवून घ्यावं? Okkkk!! Let’s make it fair then.. मीपण यंग आहे मीपण घेणार वन नाईट स्टँड आणि त्यानंतर तुझ्याशी ब्रेकअप करणार..” संतापाच्या भरात अनघा वाट्टेल ते बोलुन गेली.
“ Seriously??!! तू मुलगी आहेस अनु” शुभम हसत म्हणाला.
“So what?? आत्ता माझ्या समोर जो मुलगा येईल त्यासोबत जाणार मी.. त्यांच्यासोबतच असेल माझा वन नाईट स्टँड… just wait and watch.” चॅलेंज करून अनघा मागे वळली. खुप अपमानित झालेली ती आणि रडवेली झालेली. अस काही होईल असं तिला कधीच वाटलं नव्हतं. रडून डोळे लाल झालेले त्यातच मधूनच तिचा तोल गेला आणि ती पडली. Kohinoor मध्ये सगळे त्यांच्याकडेच पाहत होते. अनु कशीबशी उठली. आत्ता कुणीतरी यावं त्याने आणि मला इथून बाहेर घेऊन जावं अस वाटत होतं तिला. ती तशीच खाली मान घालून उभी राहिली.
एवढ्यात एक तरुण तिच्यासमोर येऊन उभा राहिला.तिने मान वर करून पाहिला. लेन्स नसल्यामुळे तिला त्याच्या चेहराच नीट दिसेना. डोळे बारीक करून त्याच्या जवळ जाऊन ती चेहरा निरखु लागली आणि तिचे डोळे विस्फारले गेले.
तो ‘ अभिजित’ होता……
क्रमशः

Group content visibility: 
Use group defaults

छान

छान सुरुवात.. Happy
पहिला प्रयत्न वाटत नाही.. छानच लिहीताय..