शल्य

शल्य..

Submitted by सूर्यकिरण on 18 July, 2011 - 03:53

हुंदके गिळूनी टाळतो
आता शल्य हे मनीचे,
पार भेटता अडवळणी,
घेई झोके आठवणींचे

कोसळताच सरी बेभान,
उडते छप्पर ओसरीचे,
आसर्‍याला थारा देण्या,
थरथरते पान आभाळाचे

दुर भेटता क्षितीज मग,
पाऊलवाट सोडून जाते,
खुणा झाकण्यास सार्‍या,
समई विझूनी रात्र होते..

काळाची हि रित अघोरी?
भावना सार्‍या गोठवते,
क्षणांची फुले वेचण्याआधी,
अंगणी वादळ ऐसे का भेटते?

- सूर्यकिरण

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शल्य