मौनाचं वादळ

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 2 December, 2010 - 09:34

काहीतरी खुपतंय, सलतंय आत
कुठंतरी खोलवर दुखतंय आज

उगाच गहिवर, आवंढा घशात
कोंडलेला श्वास, सैरभैर मनात
मन कसं पिसं झालंय आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

जयश्री अंबासकर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्तच!!!

सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज>>>>>सुरेख Happy

पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज

वा... फार छान. Happy

छान!

पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज...

मस्त! Happy

अ फा ट !!!!!

खोल खोल ...घुसली कविता

आवडली

पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली

सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज

मस्त !! Happy

छान!!!

Pages