येती संत अॅना / आमुच्या पॅसॅडेना

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

पॅसॅडेना म्हणजे crown of the valley. आपल्या नावाला जागणारे हे टुमदार शहर वसले आहे संत मारीनो या गर्भश्रिमंताच्या खेड्याच्या उत्तरेला व संत गॅब्रीआल पर्वतरांगेच्या पायथ्याशी (विश्वाचा पसारा वाढवणाऱ्या हबलच्या शोधाची दुर्बीण असलेल्या माऊंट विल्सन फेम).

तर अशा या नयनमनोहर, रोज-परेडी शहरात शांतता व सुबत्ता राज्य करतात. मात्र काहीवर्षी या दिवसांमधे संत अॅना (*) मरुतरावांच्या रूपात अवतरतात. क्वचीत प्रसंगी त्यांच्या आवेगाला थोपवण्यात संत गॅब्रीआल अयशस्वी ठरतात. काल अशाच त्या विकोपल्या. ३०/११ ते १/१२ च्या रात्रभर चाललेल्या त्या झंझावाताचा परिणाम तुम्हाला खाली दिसेलच. (आडोबाजुच्या देशातील लोकांची ८०८० फोटोंकरता क्षमा मागुन).

आमचे घर कॅलटेकपासुन केवळ दोन ब्लॉक्सवर आहे. तेवढ्या जागेत ४ झाडे उन्मळुन पडली होती. (त्यातील एक आमच्या क्रेडीट युनिअनवर).

काहीतर विजेच्या तारांवर पडली होती.

काही गाड्यांचे थोडक्यात निभावले, अनेक गाड्या मात्र अॅनागतीस प्राप्त झाल्या.

काही ठिकाणी घरांची प्रवेशदारे बंद होती.

फांद्यांचा कचरा सगळीकडे होता

कॅलटेकच्या परिसरातही

आमची बिल्डींगही या तडाख्यातुन सुटती तरच नवल.
तुटलेली काच

छपरावरुन उडालेला डिश अॅंटेना

एसी वरील टक्कर

थोडे मोडेन आणि थोडे वाकेन म्हणणारे अॉनिंग (मागे दिसतो आहे संत गॅब्रिआल पर्वतांपैकी एक).

आणि पोहतलावातील खुर्च्या

४५० झाडे पडली. दुपारी फेरफटका मारला तेंव्हा असा एकही रस्ता नव्हता ज्यावर झाड किंवा फांद्या तुटुन पडल्या नव्हत्या. येथील घरे साधारण ताशी सत्तर मैलाचा वारा सहन करु शकतात (इती भुकंपांवर काम करणारा माझा मित्र स्वामी). काल अधुन-मधुन ९५ मैलांच्या गस्ट्स होत्या. ४२ घरांना धोक्याची लालफित डकवण्यात आली आहे. नशिबाने मोठी आग कुठे लागली नाही, नाहीतर काही वर्षांपुर्वी प्रमाणे अनेक दिवसांपर्यंत ती जळती.

पण (आनंदाची गोष्ट म्हणजे)

लोकांनी स्वेच्छेनी साफसुफ केली.

तारांवर पडलेली झाडे साफ करायला कामगार लवकर हजर झाले.

काहीशे घरांचीच विज गेली (आम्ही त्यात नाही). एक-दोन दिवसातच पॅसॅडेना पुर्ववत व्हावे. माझ्या एका कलीगच्या घरावर एक झाड पडले. आमच्या टाईम डोमेन फोरममधे त्याचे टॉक आजच्याकरता मी काही दिवसांपुर्वी ठरवले होते. पट्ठा हजर होता. त्या झाडाचे योग्य आकाराचे तुकडे चेनसॉने तोडुन त्यापासुन (घरीच) कोणते फर्निचर बनवता येईल याचा विचार करत होता.

संत अॅनाचे प्रेम व (आ)वेग आम्हाला पुन्हा न लाभो अशी सदिच्छा.

* http://en.wikipedia.org/wiki/Santa_Ana_winds

बाप रे, बरंच नुकसान झालंय. बातम्यांत बघितलं, नेमक्या कुठे ते आठवत नाही, पण १-२ ठिकाणी आगी पण लागल्या होत्या.

तुम्ही सगळे ठीक आहात हे वाचून बरं वाटलं.

पॅसेडिना म्हटल्यावर काय आठवलं असेल तर बिग बँग.
संत अ‍ॅना म्हणजे वादळ हेही नव्यानेच कळलं. तुमच्याकडे सगळं ठिक आहे हे चांगलंय.

आज सकाळीच WSJ मध्ये त्या गाडीवर पडलेल्या झाडाचा फोटो पाहिला आणि तुम्हांला इमेल/विपू करायचं ठरवलं होतं..
काळजी घ्या !

आमच्याकडे पण भयानक वादळी वारा होता. रात्री झोप लागणं मुश्कील झालेले इतका तो वार्‍याचा घोंघों आवाज!

दक्षे, खेडं काय म्हणतेस! पॅसाडेना सारखे सुंदर शहर बघितले नाहीये मी!

न्युज मधे पाहिलं तेंव्हा खरच वाटलं नाही, आमच्या इथे काहीच जाणवलं नाही, छान वारं होतं , मारझोड वालं अजिबात नाही.

दक्षे, खेडं काय म्हणतेस! पॅसाडेना सारखे सुंदर शहर बघितले नाहीये मी!
<<खेडं ऐकून हसु आलं मला पण, हॅपनिंग शहर आहे गं दक्षिणा Proud

@nshelke: म्हणुन तर आधीच म्हंटले आहे:
> (आडोबाजुच्या देशातील लोकांची ८०८० फोटोंकरता क्षमा मागुन).

पोर्ट ८०८० वापरल्याने बाजुच्या देशातील आडोलाही दिसणार नाहीत फोटो.
occupy 8080 चालवा.

पडलेल्या झाडांचा ४५० हा आकडा केवळ शहराच्या मालकीच्या झाडांचा आहे. खाजगी झाडे कितीतरी जास्त असणार.
पॅसॅडेनातील प्रत्येक रस्त्यावर दुतर्फा भरपुर झाडे आहेत आणि त्यामुळे हा आकडा मोठा आहे. जुन्याप्रमाणे अनेक कच्ची झाडेही पडली. मॅग्नोलियाच्या असंख्य फांद्या अजुनही रस्त्यांवर आहेत.