तुझी आठवण

Submitted by दूरदेशीचा मित्र on 16 September, 2019 - 23:53

मनाच्या फांदीवर आलं तुझ्या विचारांचं पान
माझ्या नकळत त्याचं झालं घनदाट रान 

कसं थांबवू तुझ्या आठवणींचं हे वारं
एक छोटीशी झुळूक तरी सैरावैरा सारं

झालं सुरु हे वादळ, आता ह्याला नाही थारा 
डोळा पावसाची साद, हा नेहेमीचा इशारा

काही खोल जखमा वरच्या वर जगायच्या
काही तरल वेदना पुन्हा पुन्हा भोगायच्या

कधीतरी हा चंद्र जाईलच ढगांच्या मागे
सुटतीलच कधीतरी हे गुंतलेले धागे 

कधीतरी ओसरेल हा मोगऱ्याचा वास 
तेंव्हातरी घेता येईल मला मोकळा श्वास 

तोपर्यंत मला ह्या चंद्रप्रकाशात भिजू दे
तोपर्यंत मला ह्या फुलांजवळ निजू दे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अतिशय सुंदर आणि भावपूर्ण!!
>>>>>>>> मनाच्या फांदीवर आलं तुझ्या विचारांचं पान
माझ्या नकळत त्याचं झालं घनदाट रान

कसं थांबवू तुझ्या आठवणींचं हे वारं
एक छोटीशी झुळूक तरी सैरावैरा सारं>>>>>>>>> वाह!!