समाज

लढाई कोरोनानंतरची (आर्थिक मंदी आणि बेरोजगारीशी)

Submitted by Cuty on 31 March, 2020 - 07:21

एकवीस दिवसांचे लाॅकडाऊन. ते संपले किंवा थोडे अजून काही दिवस वाढले,तरी ही कोरोनाविरोधी लढाई आपण नक्की जिंकू. पण गेले दोनतीन दिवस टीव्हीवरती जरा वेगळी चर्चा कानावर पडते आहे. बहुतेक तज्ञांच्या मते 2009 पेक्षा जास्त भयानक अशी आर्थिक मंदीची लाट येईल. 2009 मध्ये इतर अनेक देशांच्या तुलनेत भारतात मंदीचा तितका प्रभाव पडला नव्हता. मात्र यावेळी परिस्थिती बिकट आहे. कोरोनानंतर आपल्याला यादेखील लढाईला सामोरे जावे लागेल. अशावेळी प्रत्येक पातळीवर, घरीदारी या मंदीवर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो. आपल्या जीवनावर काय परिणाम होतील आणि आपल्याला काय बदल करावे लागतील.

एक व्हायरस साला आदमी को..

Submitted by अनन्त्_यात्री on 29 March, 2020 - 08:04

ये व्हायरस साला आदमी को.

...बहुत कुछ सिखाया

मर्यादा-
श्रध्देच्या,
विज्ञानाच्या,
स्वयंघोषित तज्ञांच्या

अवघडपणा-
जुन्या सवयी सोडण्यातला,
पंख बांधून उडण्यातला,
जगण्याच्या वेगाला करकचून ब्रेक लावण्यातला,
शांततेची गाज ऐकण्यातला,
अतर्क्याचा साक्षीदार होण्यातला,
हतबलांच्या तांड्यातील एक असूनही..
विझत्या आशेवर जगत राहाण्यातला

न जाने ये व्हायरस साला आदमी को...
और क्या क्या सिखायेगा

विषय: 

संतोस

Submitted by 'सिद्धि' on 27 March, 2020 - 13:43

खणखणीत आवाजात दोन टाळ्या वाजवुन संतोषने उजवा हात पुढे पसरला. डाव्या हाताने उगाचच पदराला चाळा करत, तिचे ते बायकी नखरे चालू झाले. " ओय्य चिकने ! ए मामा , चल दे दे फटाकसे ! भोत दिनो के बाद आयी मै. चल दे दे !" लालभडक बांगड्यानी भरलेला तो हात, नुसताच राकट आणि रुक्ष... स्त्रिपणाचा जरा ही लवलेश नाही.

शब्दखुणा: 

रखमा...

Submitted by 'सिद्धि' on 23 March, 2020 - 08:17

' साथीच्या रोगाने विठोबाचे निधन झाले आणि सगळ्या जबाबदार्या, सगळ्या कर्तव्यांच ओझ रखमावर पडलं. ४-५ वर्षाचा म्हादु आणि ६-७ वर्षाची गंगी ही दोन मुले... त्यांच्या शाळेची, पोटा-पाण्याची ही सगळी जबाबदारी पार पाडताना तिची पुरती दमछाक होऊन जायची. त्यात हातात जमीनीचा फक्त एक तुकडा 'मारुतीचा माळ', तो पण रेताड भाग, अगदी डोंगरा लगतचा ...पीक आलच तर अगदी जेमतेम... अन त्यावरही मानसातल्या कोल्ह्या, लांडग्यानची नजर होती. तिच्या तोंडचा घास बळकावण्यासाठी हे लोक आपापल्या परिने प्रयत्न करत असत. या सगळ्यांना पुरून उरणारी रखमा आता मात्र मनोमन खचत चालली होती.

शब्दखुणा: 

प्रश्न

Submitted by Kajal mayekar on 22 March, 2020 - 10:53

दोन दिवस झाले एक प्रश्न सतत डोक्यात भुंग्या सारखा भुणभुणतोय.. मित्राकडून चेतन भगत ह्यांचे हाफ गर्लफ्रेंड (मराठीत) पुस्तक मागून घेतले.
वाचताना एका क्षणी नायकाला पडलेला प्रश्न मलाही पडला आहे.
प्रश्न असा आहे की स्वतःला वाटेल तेव्हा शारीरिक स्नेह मागून घ्यायचा अधिकार आपल्याला आहे पण तो पुरुषाला नाही असे स्त्रियांना वाटते की काय..??
खरच असे आहे का..??

विषय: 

मोकळ्या जागा आणि सामाजिक सौंदर्यदृष्टी

Submitted by मामी on 10 March, 2020 - 09:41

शहरीकरण, आधुनिकीकरण आणि पैशाच्या हव्यासेपायी मोठा बळी पडलेला विभाग म्हणजे मोकळ्या जागा. शहरंच काय निमशहरं आणि मोठी गावं देखिल त्यांच्याकडच्या मैदानी जागा, बागा, वनांचे पुंजके, ओढे, नद्या, टेकड्या, मोकळा परीसर हे झपाट्यानं गमवत आहेत. अश्या ज्या काही (अजून पर्यंत धुगधुगी राखून असलेल्या) जागा आहेत त्यांच्यावर हावरट बिल्डरांची नजर कधी पडेल, सरकारी बाबूंचे हात कधी ओले होतील आणि गरजेच्या नावाखाली एक विटांची चळत कधी उभी राहील काही सांगता येत नाही. मग ती वस्तीची बिल्डिंग असो, ऑफिसची इमारत असो की मॉल असो.

विषय: 

दरवेश्याने अस्वलाला जगायचा हक्क दिला

Submitted by सामो on 9 March, 2020 - 16:08

लहान, कोत्या, खुज्या माणसांनी
तिचे तुकडे तुकडे पाडायचे ठरवले.
पहील्यांदा मोठ्ठा ढलपा, मग एक लचका,
मग करवरतीचा वार आणि हळूहळू नामशेष करण्याचे ठरविले.
सुरुवात कुठुन करायची यावर एकमत होत नव्हतं.
तिचा स्वाभिमान, तिची ओळख, तिचं मन की तिचा आत्मविश्वास
कुठुन कुरतडायच, कुठे वार करायचा.
कसं खणायचं, कापायचं, तोडायचं, मोडायचं, कुस्करायचं, चोळामोळा करायचा.
लगाम तर घातलाच पाहीजे असं कसं!!
नामशेष तर झालीच पाहीजे.
.
.
.
अगं थांब जरा, कुठे धावतेस, कशाला मनातलं बोलतेस
कशाला खातेस-पीतेस-लेवतेस-बोलतेस-व्यक्त होतेस

बोन्साय

Submitted by Theurbannomad on 9 March, 2020 - 02:04

शारीरिक उंची हा विषय बऱ्याच लोकांचा अतिशय जिव्हाळ्याचा असतो. आपण उंच, सुदृढ आणि बांधेसूद असावं अशी कोणत्याही स्त्री अथवा पुरुषाची मनापासूनची इच्छा असते. मध्यम किंवा कमी उंचीच्या व्यक्तींना उंच व्यक्तींची काही वेळा असूया पण वाटत असते. पण काही व्यक्ती शारीरिक उंचीच्या पलीकडे जाऊन आपल्या कर्तृत्वाची अशी काही उंची गाठतात की त्या कर्तृत्वाच्या उंचीपुढे मग भले भले लोक खुजे वाटायला लागतात.

प्रांत/गाव: 

आतल्या शहरातला बाहेरचा वाटाड्या

Submitted by Theurbannomad on 9 March, 2020 - 01:13

महासत्तेच्या काळातल्या अक्राळ विक्राळ रशियाचा एक भाग असणारा आणि संपूर्ण रशियाची तेलाची गरज एकट्याने भागवू शकेल इतका तेलसंपन्न भूभाग म्हणजे आजचा चिमुकला अझरबैजान देश. बाकू ही या देशाची राजधानी पूर्वीपासून तेलसंपन्न भूमी म्हणून ओळखली जाते.

प्रांत/गाव: 

सामाजिक उपक्रम वर्ष ११ वे आवाहन धागा

Submitted by कविन on 8 March, 2020 - 14:49

सामाजिक उपक्रमाचे हे आपले ११ वे वर्ष. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली १० वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत.समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.

Pages

Subscribe to RSS - समाज