प्रश्न

Submitted by Kajal mayekar on 22 March, 2020 - 10:53

दोन दिवस झाले एक प्रश्न सतत डोक्यात भुंग्या सारखा भुणभुणतोय.. मित्राकडून चेतन भगत ह्यांचे हाफ गर्लफ्रेंड (मराठीत) पुस्तक मागून घेतले.
वाचताना एका क्षणी नायकाला पडलेला प्रश्न मलाही पडला आहे.
प्रश्न असा आहे की स्वतःला वाटेल तेव्हा शारीरिक स्नेह मागून घ्यायचा अधिकार आपल्याला आहे पण तो पुरुषाला नाही असे स्त्रियांना वाटते की काय..??
खरच असे आहे का..??
कदाचित खरच आपण मुलींना असे वाटते कारण बघा ना बर्‍याचदा आपल्याला जेव्हा मित्राच्या खांद्यावर डोके ठेवायचे असते तेव्हा त्याच्या बाजूला सरकून त्याच्या हाताला आपल्या अर्ध्या कवेत घेऊन त्याच्या खांद्यावर आपण आपले डोके ठेवतो. पण असेच काहीसे मुलांनी केले की आपण लगेच uncomfortable किंवा uneasy होतो. असे का.??
ह्याचा अर्थ तर असाच होतो ना की आपल्याला शारीरिक स्नेह मागून घ्यायचा अधिकार आहे पण पुरूषाला तो नाही...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हो असे खरचं घडते. मी सुद्धा अनुभवलंय. जेव्हा माझ्या मैत्रीणीला आधाराची गरज असायची तेव्हा ती हक्काने माझ्याजवळ यायची पण जेव्हा मला तिच्या आधाराची गरज असायची तेव्हा ती मला नक्कीच टाळायची, तीला अनकंफर्टेबल वाटेल म्हणुन मीही जास्त जवळीक केली नाही. पण आता जेव्हा मला गफ्रे आहे त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांना नक्कीच समजुन घेतो. आणि मला अस वाटतं की जेव्हा एक मुलगा आणि एक मुलगी गफ्रे बाँफ्रे बनतात आणि त्यादोघांमध्ये प्रेम असेल तेव्हा काही गोष्टी मध्ये आपण आपसुकच कंफटेबल होतो.

हाफ गर्लफ्रेंड फार पूर्वी वाचले होते म्हणून तुम्ही म्हणताय तो संदर्भ नेमका माहीत नाही, पण दुसरा मुद्दा... शारीरिक स्नेह म्हणजे फक्त मैत्रीपूर्ण स्पर्श असे गृहीत धरले तर प्रत्येक मुलीला स्पर्श कळतो. अगदी गर्दीत चुकून झालेला आणि मुद्दाम केलेला यातला सूक्ष्म फरक.. किंवा सहज झालेला स्पर्श ज्या क्षणी सहेतुक होतो तेव्हा सुद्धा मुलगी सेकंदाच्या 10 व्या भागात तो स्पर्श संपवते. आता मूळ मुद्दा, जोवर मुलगा निर्व्याज, निखळ स्पर्श करतो, तोवर मुलगी तो सहन करते, किंवा लक्षातदेखील येत नाही असे म्हणता येईल. सहेतुक स्पर्श कळल्यावर कसा react करायचं हा त्या मुलीचा प्रश्न.

आणि शारीरिक स्नेह म्हणजे sexual advances म्हणायचे असेल तर हे वागणं चुकीचंच म्हणावे लागणार. समाजात मुलीने सोशिक असणे, शारीरिक सुखाच्या बाबतीत ब्र देखील न उच्चरणे आपल्या महान संस्कृतीला मान्य आहे, rather तेच अपेक्षित आहे, पण बंद दाराआड या भूमिका बदलतात. तिथे स्त्रीची इच्छा पूर्ण न करणारा पुरुष षंढ ठरतो, आपली इच्छा मांडणारा पुरुष भोगवादी किंवा लंपट ठरतो.. इथं झाकीर खानच्या स्टँड अप शो मधलं वाक्य आठवतं, लाईन के उसपार तुम हो जाते हो वेशी दरिंदे, और इसपार चुतीये!

थोडक्यात, कोणत्याही प्रकारे पुरुषाने शारीरिक सुखाची किंवा साध्या स्पर्शाची अपेक्षा ठेवणं भारतीय संस्कृतीनुसार चूकच आहे.

सहेतुक स्पर्श कळल्यावर कसा react करायचं हा त्या मुलीचा प्रश्न. +101

गर्दीत सहेतुक न्याहळणाऱ्या नजरेमुळे कोणतीही स्त्री जर अनकंफर्ट फिल करते. आणि त्यावर रिऍक्ट होते. तर तिला स्पर्शातला फरक जाणवणार नाही? आणि त्यावर ती रिऍक्ट होणार नाही असे का वाटते? Uhoh

Thanks everyone
मुळात स्पर्श कोणत्या intentions ने होतोय असा मुद्दा नाही
मला असे म्हणायचे आहे की जेव्हा मुलींना मित्राची गरज (शारीरिक गरज नाही) असते तेव्हा त्या मित्राकडून तो आधार प्रेम हक्काने मागून घेतात पण असेच जर मुलांनी केले तर मुली का uncomfortable होतात.

दोन मित्रांमधे निखळ मैत्री आणि विश्वास असेल तर uncomfortable होण्याचा प्रश्न येत नाही..
आणि तरीदेखील मुली uncomfortale होत असतील तर त्यांच upbringing सुद्धा तितकंच matter करत असाव. Happy