एक व्हायरस साला आदमी को..

Submitted by अनन्त्_यात्री on 29 March, 2020 - 08:04

ये व्हायरस साला आदमी को.

...बहुत कुछ सिखाया

मर्यादा-
श्रध्देच्या,
विज्ञानाच्या,
स्वयंघोषित तज्ञांच्या

अवघडपणा-
जुन्या सवयी सोडण्यातला,
पंख बांधून उडण्यातला,
जगण्याच्या वेगाला करकचून ब्रेक लावण्यातला,
शांततेची गाज ऐकण्यातला,
अतर्क्याचा साक्षीदार होण्यातला,
हतबलांच्या तांड्यातील एक असूनही..
विझत्या आशेवर जगत राहाण्यातला

न जाने ये व्हायरस साला आदमी को...
और क्या क्या सिखायेगा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आशावाद शिकवेल का?
विझत्या आशेवर जगत राहाण्यातला
यात आशवादच आहे की ....