दरवेश्याने अस्वलाला जगायचा हक्क दिला

Submitted by सामो on 9 March, 2020 - 16:08

लहान, कोत्या, खुज्या माणसांनी
तिचे तुकडे तुकडे पाडायचे ठरवले.
पहील्यांदा मोठ्ठा ढलपा, मग एक लचका,
मग करवरतीचा वार आणि हळूहळू नामशेष करण्याचे ठरविले.
सुरुवात कुठुन करायची यावर एकमत होत नव्हतं.
तिचा स्वाभिमान, तिची ओळख, तिचं मन की तिचा आत्मविश्वास
कुठुन कुरतडायच, कुठे वार करायचा.
कसं खणायचं, कापायचं, तोडायचं, मोडायचं, कुस्करायचं, चोळामोळा करायचा.
लगाम तर घातलाच पाहीजे असं कसं!!
नामशेष तर झालीच पाहीजे.
.
.
.
अगं थांब जरा, कुठे धावतेस, कशाला मनातलं बोलतेस
कशाला खातेस-पीतेस-लेवतेस-बोलतेस-व्यक्त होतेस
खरं तर कशाला जगतेस?
दबून रहा, अपमान गिळ, सोस, आनंद लपव
मुकी हो, अदृष्य हो, आकुंचन पाव, ऊठ तुझी जागा त्यांना दे,
विरुन जा, विटुन जा, मरुन जा
मर!! मर!! मर!!
.
.

मग तू त्यागाची मूर्ती बनशील,
देवघरातील देवी आणि अनंतकाळची माता बनशील,
मग तेच तुला पूजतील, प्रसाद दाखवतील,
तेच तुझं माफक कौतुक करतील
मग तू खूष व्हायचस, तुला खिडकीभर आभाळ दिलं त्यांनी
तुला कोपऱ्यात का होइना झाडूपाशी जागा दिली
गिळायला २ तुकडे फेकले, ल्यायला दिलं,
डोक्यावरती छप्पर दिलं, गळ्यात एक डोरलं दिलं.
दरवेश्याने अस्वलाला जगायचा हक्क दिला.

Group content visibility: 
Use group defaults

होय, पण शब्दरचना चपखल आहे.
<<गिळायला २ तुकडे फेकले, ल्यायला दिलं,
डोक्यावरती छप्पर दिलं, गळ्यात एक डोरलं दिलं.>> हे आवडले. तुमच्या कडे किती वाजलेत आता? इकडं २.२३ झालेत.

छान.

आजचे सरकार व आजची जनता ह्यांचे सुंदर वर्णन

आता 21 व्या शतकातही स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी ऍक्टिव्हली प्रयत्न करणार नसतील स्त्रिया तर रडगाणं गाण्यात काय अर्थ आहे !! स्वतःची परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतःच प्रयत्न केले पाहिजेत , बाहेरून कोणी मदतीला येईल याची वाट बघत किती दिवस राहणार .... तोंड दिलं आहे ते योग्य वेळी उघडून बोलण्यासाठी दिलं आहे .. करणार नाही , जमणार नाही , मला हे असं असं नको आहे एवढं मत योग्य वेळी मांडून त्यावर चिकटून राहिल्या , स्वतःचे निर्णय स्वतः घेतले , शक्यतो आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे प्रयत्न केले तर कशाला कोणाची जबरदस्ती सहन करावी लागेल !!

कविता आवडली आहे... अशा प्रकारच्या परिस्थितीत असणाऱ्या स्त्रिया दुर्दैवाने अजूनही आहेत. एकट्या स्त्रिया मग कुठल्याही स्तरातील का असेनात त्यांना समाजात आर्थिक स्वातंत्र्य, आदर आणि सुरक्षितता मिळाल्याशिवाय त्या अशा परिस्थितीला आपल्या दैवाचा भाग मानून तडजोड करणे सोडणार नाहीत.

जगातील सर्व कायदे स्त्री चूक आहे की बरोबर ह्या मूळ विषयावर नाहीत तर स्त्री ही बरोबर आहे आणि पुरुष चुकीचे आहेत ह्या विचारावर आहेत.
पुरुषांना सिद्ध करावे लागते मी चुकीचं काम केले नाही स्त्री ला चुकीचं कोणताच कायदा ठरवत नाही.
अजुन कसले अधिकार,संरक्षण मिळाल्या वर तुम्ही सशक्त होणार.
आरक्षण पण देवून झाले तरी तुम्ही सशक्त होत nasal tar kay kele पाहिजे.

परत तेच सांगते - फक्त आर्थिक स्वातंत्र्य स्त्रीकरता पुरेसे नाही. इट इज नेसेसरी बट नॉट सफिशियंट. त्याबरोबर ती मनाने मजबूत हवी नाहीतर तिला मन मारुनच जगावं लागतं. मी असे म्हणत नाहीये की संपूर्ण दोष पुरुषांचा आहे. स्त्री दुर्बळ असेल मनाने तर तो दोष तिचा किंवा तिच्या पालनपोषणाचाही असू शकतो.

सामो
हेच सांगायचे आहे मला.
समाधानासाठी
काही लोक असे चित्र उभे करतात स्त्री सशक्त झाली आहे.
आता पर्यंतच्या जगाच्या इतिहासात स्व देशाचे रक्षण करण्यासाठी स्त्री ने जीवाची बाजी लावण्याची उदाहरणे बोटावरच मोजता येतील.
स्त्री वर अत्याचार करणाऱ्या नराधम लोकांना पुरुष नी पकडावे आणि शिक्षा द्यावी जी वृत्ती सार्वत्रिक आहे..
आर्थिक क्षेत्रात पूर्ण पने स्त्री नी चालवलेली आणि नावा रूपाला आलेली कंपनी नाही.
पण फक्त पुरुषांनी चालवलेल्या कंपन्या आहेत.
गरोदर स्त्री आणि वयस्कर स्त्रिया ज्या लोकल रेल्वे मध्ये पुरुषांच्या कंपार्टमेंट मध्येच सुरक्षित समजतात स्त्री कंपार्टमेंट मध्ये त्यांना असुरक्षित वाटते आणि मदतीची अपेक्षा 0, वाटते ..
सध्या एवढ्येच बस

अप्रतिम, एक-एक शब्द काळजाला घरे पाडतो पण जळजळीत असल तरी सत्य आहे! हे सर्व सहन करणाऱ्या स्त्रीया मी पाहिल्या आहेत
Sad

सैन्यात लढणारे जवान आणि कंपन्या ज्यांनी नावारूपाला आणल्या ते पुरुष एकाही स्त्रीने जराही योगदान दिलं नसतं , जन्माला घालण्यापासून ते एवढंसं मूल सांभाळून मोठं करण्यापर्यंत - तर जगलेच नसते , अचिव्हमेंट्स खूप लांबची गोष्ट ... कुठल्याही स्त्रीच्या मदतीशिवाय 1 दिवसाचं मूल जगवून दाखवू शकतील असे किती पुरुष आहेत जगात ?

या विश्वात एक तरी ग्रह नक्की असा असेल जिथून स्त्री लोकसंख्या संपूर्ण नष्ट झाली आहे आणि स्त्रियांचे सगळे व्यवहार स्त्री रोबोट कडून करून घेतले जातात ... राजेश यांना पुढचा जन्म तिथे मिळावा अशी माझी इच्छा आहे . तेव्हाच जिवंत हाडामासाच्या स्त्रीची समाजातील गरज तिचं योगदान आणि तिचं स्थान त्यांना कळेल .

कळलं का राजेश? स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांना पूरक आहेत. एक अस्तित्वात नसेल तर दुसरा जन्मच घेऊ शकत नाही. कायद्याने स्त्रीयांच्या लग्नाला बंदी घातली तरच तीचं शोषण थांबेल. मग संतती हवी असणारे पुरुष सरोगसी सारखं मुलं जन्माला घालतील. हुकमाचा एक्का स्त्री कडं असेल. पहिली विवाहसंस्था नष्ट करा.