नवीन

सदिच्छा ..

Submitted by पुरंदरे शशांक on 17 February, 2013 - 06:22

सदिच्छा ..

असे उजाडावे | मनाच्या क्षितीजी |
नुरावी काळजी | नावालाही ||

लख्ख व्हावे सारे | हृदय गाभारी |
प्रकाशाची झारी | बरसावी ||

मोकळे मोकळे | होताच आकाश |
कुठला आवेश | नसो तेथे ||

स्वैर वारा वाहे | किंवा झरा मुक्त |
व्हावे बंधमुक्त | चित्त तसे ||

असावा तयात | प्रेमाचा ओलावा |
सुखाचा गारवा | सदोदित ||

हीच एक आस | मनी तोचि ध्यास |
न करी उदास | जगदीशा ||

शब्दखुणा: 

अळीची चळवळ

Submitted by पुरंदरे शशांक on 18 October, 2012 - 23:17

7750331-cartoon-illustration-of-a-happy-green-caterpillar.jpg

अळीची चळवळ

वळवळ वळवळ
अळीची चळवळ
किती ती धावपळ
करे ना खळखळ

चालते कस्ली
खालीवर खालीवर
लाटच जशी
फिरते अंगभर

हिर्वी हिर्वी चादर
पांघरते अंगावर
कधी कधी रंगीत
ठिपके त्यावर

उचलून डोके
बघते कायतर
शेंगा पान फुले
खाऊ तो कुठवर

मटार सोलता
सोनूची धावपळ
कथ्थक डिस्को
नुस्ती तारांबळ...

शब्दखुणा: 

माझ्झंच स्केचबुक एकदम भारी...

Submitted by पुरंदरे शशांक on 13 February, 2012 - 01:20

माझ्झंच स्केचबुक एकदम भारी
छान छान चित्रं काढलीत कितीतरी

लाल निळा हिरवा केवढे ते रंग
रंगवताना स्केचबुकमधे होते मी गुंग

यात सारखं बघून हस्तोस का असा
स्टुपिडेस का तू, तुझा स्क्रू ढिलासा

एवढा का माझा हत्ती झालाय हडकुळा ??
फुल कस्लं तुझे.... दिस्तोय खुळखुळा.....

कित्ती कित्ती काढायचेत फुले नी प्राणी
तुला काय चिडवायला मिळाले नाही कुणी ??

नसू दे माझा फुगा गोल जराही.....
तू त्याला चिडवायचे कारणच नाही.......

हसू नको काही या चिमणीला बघून
असेल मोठी झाडापेक्षा..... तू निघ आधी इथून....

गुलमोहर: 

वाघाची मावशी

Submitted by पुरंदरे शशांक on 8 February, 2012 - 01:46

वाघाची मावशी......

वाघाची मावशी मनीमाऊ छान
सिप स्पिप करताच टवकारी कान

शांपूबिंपू काही नको, तरी किती स्वच्छ
चाटून चाटून स्वतःला ठेवते अगदी लख्ख

म्याँव म्याँव करत घोटाळते पायात
लाड करुन घेते मावशी ही अचाट

टॉमी समोर येताच गुरकते केवढी
केस फुलवून म्हणते मी तर तुझ्याएवढी.......

(संस्कारीत) वाघाची मावशी - दादाश्रींकडून

वाघाची मावशी मनीमाऊ छोटीशी
सिप सिप करताच उडी मारी इवलीशी

गुलमोहर: 

मॉडर्न कविच्या व्यथा.....

Submitted by पुरंदरे शशांक on 4 February, 2012 - 04:43

मॉडर्न कविच्या व्यथा.....

फुटके तुटके शब्द आणून कविता केल्या चार
दोस्त सगळे चाट पडले, कसलं भारी यार........

GFला विचारतो मग, काय आणू सांग ?
चंद्र-तारे आणून देतो, नाऊ व्हॉट्स राँग ?

नाक मुरडून म्हणते हूं... कसले चंद्र-तारे
एक कोल्ड कॉफी साधी आणून दे ना रे

सगळ्या पोरी सारख्याच, यांना कळेल का कविमन ?
खायला-प्यायला द्या नुसते, वर प्रेझेंट ए वन !!!

कुठून पडलो फालतू सालं, फंदात या कवितांच्या ?
डॅडकडे मागू कसा पॉकेटमनी जास्तीचा !!!!

वणवण...

Submitted by पुरंदरे शशांक on 7 December, 2011 - 01:19

वणवण...

ध्येय दिशा ती चुकता होते वणवण अवघी
वणवण कुठली ध्येय नेमके कळले नाही

हलवुन दोर्‍या नाचवले मज येथे तेथे
कर्तृत्व खरे का बाहुलेच आकळले नाही

रंगपटी ढकलले कुणी का आलो मी स्वेच्छे
भाषा, अभिनय, सोंग मुळी ते सजले नाही

सुखदु:खाचे प्रसंग येता मज सामोरी
झेलले किती अन उरात घुसले वळले नाही

ठाशीव उमटवी पदचिन्हे तू तव माघारी
आभार मानु का भार कुबडीचा मर्म जाणले नाही........

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जळतं जीणं

Submitted by संजय पठाडे on 27 November, 2011 - 16:15

का गं सखे सांग तरी
नशीब मला छळतं?
तळपत्या उन्हासंग
जीणं माझं जळतं...

सपनाच्या आरशाला
कसा रोज जातो तडा?
कुणाच्या पापाने असा
भरतो गं माझा घडा...

पिचलेल्या शरीरात
जीव होतो कासावीस
जीणं असं सये माझं
जन्मभरी घासाघीस...

पाखडते जीव असा
धन्याच्या वळचणीला
नशीबानं दान दिलं
फाटक्या गं पदराला...

कसं रोज विस्कटतं
कपाळीचं कुंकू माझं
सुखाच्या गं भासामधी
दु:ख भरलेलं ताजं...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खरे....खोटे......

Submitted by पुरंदरे शशांक on 25 November, 2011 - 01:49

खरे....खोटे......

दाणापाणी संपे येथील, नवीन शोधा चला उठा
कोण इशारे करतो आतुन, धुंडायाच्या नव्या दिशा

दिवसामागून येती राती, वर्षामागून वर्ष सरे
किती समय तो रमलो येथे, निघणे आता हेचि खरे

मित्र मिळाले केल्या गोष्टी, सुखदु:खाच्या त्यांसंगे
भावुक मन ते आत हुरहुरे, भेट पुन्हा योगायोगे

सळसळणारा प्रवाह हा तर, जीवनसरिता नाव खरे
थांबायाचे नाव न येथे, वाहत वाहत तरायचे

गढूळ डबकी नकोच काही, कुजून नाही पडायचे
"चला पुढे" या जीवनमंत्रा, मनापासुनी जपायचे

गुलमोहर: 

.....केव्हा....केव्हा.....केव्हा....

Submitted by पुरंदरे शशांक on 21 October, 2011 - 13:47

....केव्हा.....केव्हा... केव्हा...

आई मी अज्जून लहानंच का गं
ओट्यावर कप ठेवणार केव्हा...

फ्रॉक छोटासा किती दिवस हा..
ओढणीचा ड्रेस घालणार केव्हा...

बांगडी ही असली जाऊन एकदा
मस्त घड्याळ येणार केव्हा....

टॉक टॉक सँडल वाजवीत सही,
स्कूटीने भुर्रSSSS जाणार केव्हा....

कापतेस माझे केस सारखे
अश्शी हेअरस्टाईल करणार केव्हा....

खेळण्यातला फोन नुसता वाजतो
टचस्क्रीन भारी मिळणार केव्हा....

दूध, कॉम्प्लान नाहीतर कोको
कॉफी शिप शिप करणार केव्हा...

रुमाल नक्कोय हा फ्रॉकवरचा
छोटीशी पर्स देणार केव्हा...

"अग्गोबाई एवढं पुरे का...

गुलमोहर: 

राधास्वप्न....

Submitted by पुरंदरे शशांक on 13 October, 2011 - 05:45

राधास्वप्न....

दूर शिखरावरती
शांत शांत ती निळाई
पात तृणाचीही गर्द
आज कशी ती सावळी

भास मना का गं होई
श्रांत कान्हा पहुडला
पुष्पे सुवर्ण कांतीची
शेला कटी मिरवला

शिरी शिखराच्या एक
वृक्ष भला बहरला
मोर पीस खोवि कैसे
जैसे मुरारी डोईला

मेघ नभींचे शिखरी
रुळे कुंतल कुरळे
वारा हळुवार सारी
दाही हाती त्या सावरे

उन मऊसे उतरे
मेघ थोडेसे सारुन
स्मित रेखा हरि मुखी
क्षणी जाते उजळून

नाद कालिंदीचा कानी
किती हळुवार येई
हरि अधर स्पर्शाने
वेणू गोड निनादली (शहारली)

रुप श्रीरंगाचे सये
दोन्हीं नयनी मावेना
मिटू घेता नवलाई
कान्हा अंतरी ठाकला......

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - नवीन