खरे....खोटे......

Submitted by पुरंदरे शशांक on 25 November, 2011 - 01:49

खरे....खोटे......

दाणापाणी संपे येथील, नवीन शोधा चला उठा
कोण इशारे करतो आतुन, धुंडायाच्या नव्या दिशा

दिवसामागून येती राती, वर्षामागून वर्ष सरे
किती समय तो रमलो येथे, निघणे आता हेचि खरे

मित्र मिळाले केल्या गोष्टी, सुखदु:खाच्या त्यांसंगे
भावुक मन ते आत हुरहुरे, भेट पुन्हा योगायोगे

सळसळणारा प्रवाह हा तर, जीवनसरिता नाव खरे
थांबायाचे नाव न येथे, वाहत वाहत तरायचे

गढूळ डबकी नकोच काही, कुजून नाही पडायचे
"चला पुढे" या जीवनमंत्रा, मनापासुनी जपायचे

खंत न उरली सुखदु:खाची, क्षणिकाचे ओझे "खोटे"
क्षणोक्षणी बदलाचे वारे, "खरे" कशाला म्हणायचे.........

गुलमोहर: 

गढूळ डबकी नकोच काही, कुजून नाही पडायचे
"चला पुढे" या जीवनमंत्रा, मनापासुनी जपायचे >> उत्तम विचार.. Happy

सळसळणारा प्रवाह हा तर, जीवनसरिता नाव खरे
थांबायाचे नाव न येथे, वाहत वाहत तरायचे >>> सुंदर ! Happy

मित्र मिळाले केल्या गोष्टी, सुखदु:खाच्या त्यांसंगे
भावुक मन ते आत हुरहुरे, भेट पुन्हा योगायोगे

सळसळणारा प्रवाह हा तर, जीवनसरिता नाव खरे
थांबायाचे नाव न येथे, वाहत वाहत तरायचे>>>

खूप छान!
गेयपूर्ण कविता,मनापासून आवडली..

<<<<दिवसामागून येती राती, वर्षामागून वर्ष सरे
किती समय तो रमलो येथे, निघणे आता हेचि>>>> काहो शशांकजी अशा ओळी का आल्या? Happy छान आहे कविता.