नवीन

आई जेव्हा रागावते ....

Submitted by पुरंदरे शशांक on 3 December, 2013 - 22:03

आई जेव्हा रागावते .... Uhoh

घरात पाऊल टाकले तरी
आईच्या नावाने ओरडा नाही ???

का बाई शांत दिस्तयं घर ???
किती ते बावरं माझं मन ....

झालंय काय या सोनूला
मार्गच नाही कळायला

खोलीत पसरलेत वाटतं म्हाराज
सुस्त कस्काय सारं कामकाज ??

काय रे असा गप्प गप्पसा
पडलास का कुठे? बोल पटापटा

डोळे हे सांगतात वेगळेच बरं
तुझं हे लक्षण नव्हे रे खरं Angry

दिस्ताएत मला तुकडे अजून
कुठली बरणी ठेवलीस फोडून ?? Angry

कारट्या, कितीदा सांगितलंय तुला
किती रे छळशील अजून मला Angry

कामाने जातीये मी आधीच वैतागून
अन तू ठेव अजून पसारा मांडून

बास कर आता ते झटक नि फटक

इंद्रायणी तीरी.....

Submitted by पुरंदरे शशांक on 1 December, 2013 - 06:04

इंद्रायणी तीरी.....

इंद्रायणीच्या लाटांवरती
अवचित उठली अनाम खळखळ
सुवर्ण पिंपळ स्तब्ध शांतसा
अजानवृक्षी अपूर्व सळसळ

म्लान पाहता श्रीहरिचे मुख
ध्यान सोडिती गिरीजाशंकर
शिष्य निघाला स्वस्थानासी
श्रीसद्गुरुंना फुटला गहिवर

इंद्रायणीच्या तीरावरती
भागवतांचे मेळे निश्चळ
ज्ञानोबाचा गजर अंतरी
नयनी उरले अश्रु व्याकुळ

टाकून बिरुदे देवपणाची
भक्तासोबत श्रीहरि पाऊल
चिरा लोटता समाधीवरी
मागे उरला तुळसी दरवळ......

(कार्तिक वद्य त्रयोदशी - संजीवनसमाधी सोहळा - श्रीक्षेत्र आळंदी)

आता जिणे बास झाले...

Submitted by राजेंद्र देवी on 22 July, 2013 - 02:39

आता जिणे बास झाले...

आता जिणे बास झाले
पावलो पावली उपहास झाले

वाट पाहतो रोज तुझी
तुझे येणे महामास झाले

झोंबता वारा सहीला परी
झुळुक येणे त्रास झाले

तरळते डोळ्यात पाणी
तुझ्या आठवांचे भास झाले

आपल्यांनीच छळीले आता
वैरीच आता विश्वास झाले

झेलले वार किती तरी
जखमांचे व्यास झाले

सजवले होते फुलांनी तरी
कफनाचे निमित्त खास झाले

राजेंद्र देवी.

शब्दखुणा: 

शाळेत जाताना ....

Submitted by पुरंदरे शशांक on 1 July, 2013 - 03:20

शाळेत जाताना ....

नव्वा नव्वा ड्रेस
नि नव्वे नव्वे शूज
आज स्वारी आहे
एकदम खूष खूष

नव्वी नव्वी शाळा
नि नव्या नव्या टीचर
हरबर्‍याचे झाड
आज पार आभाळभर

दारातच शाळेच्या
गर्दी केवढी तरी
खेळ, गाणी, डबा
लालूच भारी भारी

हात सुटता आईचा
अवसान सारे गेले
हरबर्‍याचे झाड पार
भुईसपाट झाले

बावरलेले मन
नि भिरभिरणारे डोळे
इवल्याशा पायात
बळ कुठुन आले

गाणी-खेळ मजेचे
होते भारी भारी
घंटा झाली तरी
खेळण्यात दंग स्वारी ...

पावसाची मिठी

Submitted by पुरंदरे शशांक on 4 June, 2013 - 02:57

पावसाची मिठी

भरदिसा पडे
पावसाची मिठी
नाही रीती भाती
कशी म्हणू प्रिती

तुडवीतो राने
करी चोळामोळा
धावे सैरावैरा
कसा याचा चाळा

थेंब किती भारी
सरीवर सरी
करी शिरजोरी
लगटतो उरी

पावसाची मिठी
ओलावली दिठी
किती दिसा झाली
सजणाची भेटी

उणावे आवेग
पुरेपूर संग
उन्हात हसुनी
निहाळी नि:संग

लाजली धरणी
मुख घे झाकोनी
हासू झळकले
पदरा आडोनी ....

हे मनदेवा !!

Submitted by पुरंदरे शशांक on 7 March, 2013 - 00:20

हे मनदेवा !!

लख्ख प्रकाशानं जाई
कधी उजळुनी मन
काळोखात बुडुनिया
जातं तेच वेडं मन

कधी सामोरं जातंया
येईल त्या क्षणांनाही
तेच पाठ फिरवूनी
कसं दाही-दिशा होई

अशा लाटा-तरंगात
पार काढी बुडवूनी
घुसमटे जीव असा
नाकातोंडा शिरे पाणी

विनवितो तुम्हालागी
मनदेवा कृपा करा
घुसळून काढताना
जरा दाखवा किनारा..

शब्दखुणा: 

हसू पसरलं घरभर....

Submitted by पुरंदरे शशांक on 5 March, 2013 - 10:45

हसू पसरलं घरभर....

चिमणी आमची शाणी
गोड गाते गाणी
एकदा अश्शी रुसली
कोपर्‍यात जाऊन बसली

"अगं अगं चिम्णे, लवकर येना इकडे
खाऊ किती आणलाय हात कर जरा पुढे"

"खेळ किती आणलाय बाबांनी भारी
चला चला लवकर खेळायला तरी"

आई आली बाहेरुन
हाक मारी चिम्णू म्हणून

चिम्णू काही ऐकेना
बोलेना की उठेना

"एक फुगा फुगलाय
कोपर्‍यात जाऊन बसलाय
खाऊ काही खात नाही
खेळ पण खेळत नाही"

आई आली जवळ नि हात ठेवी डोक्यावर
रडत रडत सोनू हसते, उडी घेई कडेवर
....अस्सा फुगा फुटताच हसू पसरलं घरभर....

नस्ती विवंचना !!

Submitted by पुरंदरे शशांक on 5 March, 2013 - 03:50

नस्ती विवंचना !!

कवितेत त्यांच्या नेहेमीच वसंत मस्त फुललेला
मला सतत काट्यांचा घोर का लागलेला ??

असतात तिथे फुलबागा छान छान सजलेल्या
दिस्तात मला झोपडपट्ट्या घाणीने भरलेल्या !!

उंची कपडे, बंगले-गाड्या, बीचवरती संध्याकाळ...
सिग्नलपाशी चेहरा कुट्ट हावभरला सदाकाळ !!

जगात त्यांच्या एकूणएक मस्तीतच गुरफटलेला
मीच एक करंटा नस्त्या विवंचनेत पडलेला .....

जादू हवीहवीशी..

Submitted by पुरंदरे शशांक on 4 March, 2013 - 00:54

जादू हवीहवीशी..

परीराणी नाजुकशी
हातात छडी जादूची

मुकुट छान सोनेरी
गालावरती गोड खळी

छडी लावे झाडाला
"जेम्स"चा पाऊस आला

छडी फिरे वरती खाली
रंगीत फुगे भोवताली

सोनू झाली चकित फार
आईस्क्रीम हवे गारेगार

उडता येईल का मला
ढगांवरुन भटकायला

छडी फिरली भराभर
सोनू उडते हवेत वर

वॉव, कस्ली मज्जाए
जादू तुझी भारीए

हे काय गार गार गालावर
आईस्क्रीम इथे सांडले तर

आई म्हणते सोनाला
उठा उठा लौकर बाळा

हात अस्सा गालावर
अज्जून जर्रा ठेवतर

तगमग

Submitted by पुरंदरे शशांक on 3 March, 2013 - 22:12

तगमग

देणे पावसाचे कसे
वेडे ओलावले मन
पान पान आठवांचे
गेले पार बिथरून

मेघ गर्जती बाहेर,
आत विजेचा थरार
वारा फोफावला स्वैर,
उर धपापला पार

पडे पाऊस जोरात,
आत उसळे आकांत
झाकोळले सारे काही,
मन काळोखी नहात

पडे पाऊस पाऊस
जरा शांत स्थिरावला
थेंब थेंब रुते आत,
डोह पुरा डहुळला........

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - नवीन