
ब्रेकिंग बॅडच्या चाहत्यांसाठी नवी पर्वणी - नविन सिरिअल - बेटर कॉल सॉल! ज्यांनी ब्रेकिंग बॅड बघितलय त्यांना या कॅरॅक्टरची आणि या वाक्याची चांगलीच ओळख आहे. तर आता या सॉल वरच मालिका - नक्कि काय आहे मालिकेत माहिती नाही. पण सॉलची ब्रेकिंग बॅड च्या आधीची पार्श्वभूमी, तो तसा कसा काय घडला, आणि त्याचं ते अजब नेटवर्क "Let's just say I know a guy...who knows a guy ...who...knows another guy." कुठून निर्माण झालं - याची ही सारी पार्श्वभूमी असावी.
हे असे होईल काही वाटले नव्हते कधी
आरसा बोलेल खोटे वाटले नव्हते कधी
ठरविले वेडा जगाने ना तयाचे दु:ख पण
तू मला वेडा म्ह्णावे वाटले नव्हते कधी
खेद त्यांनी व्यक्त केला- चूक माझी जाह्ली
चूक उमगावी धुरीणा वाटले नव्हते कधी
चंद्र बघतो नेहमी पण एकदा पाहिन धरा
मीच त्या चंद्रावरुनी वाटले नव्हते कधी
एकटा उरलो असा की शेवटी सोडेल ती
सावलीही साथ माझा वाटले नव्हते कधी
लागलो गझला लिहाया फावल्या वेळेत मी
लोक गुणगुणतील त्याही वाटले नव्हते कधी
-नाहिद नुरुद्दिन नालबंद 'इस्रो'
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०]
हाऊस एम डी मला खूप आवडायची. हाऊसचे एकंदर पात्र आणि त्याला कायम चिमटे काढत असूनही कठीण प्रसंगी त्याला आधार देणारी आणि त्याच्या बुद्धीला कायम मानणारी टिम पण.
मालिका आता स्टार वर्ल्ड वर संपली पण त्याच्या आठवणी जागवण्यासाठी हा धागा.
साइनफेल्ड सुरु झाले - एफ एक्स वर -
मराठी/हिंदी विनोदी मालिकांतील पांचट विनोदाचा कंटाळा आला असेल तर जरुर पहा.
(नेटवर उपलब्ध आहे पण टीव्हीवर पहायला मजा येते).
नुकतीच झी मराठीवर "असे हे कन्यादान" ही मालिका सुरु झाली आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वा सुरु झाली आहे.
बापलेकीच्या नात्याचे सुंदर पैलू आपल्याला बघायला मिळतील. तर ह्या निमित्ताने खुमासदार चर्चेला आता सुरुवात होऊ द्या. म्हणून हा नवीन धागा ….
"एकांत" ह्या एपिक चॅनेल वर दर गुरुवारी रात्री १०:३० वाजता (रिपिट टेलिकास्ट - शुक्रवार रात्रौ ८:३०) लागणार्या कार्यक्रमामध्ये भारतातल्या एके काळच्या गजबजलेल्या पण आता ओसाड झालेल्या जागांबद्दल माहिती देतात. हा कार्यक्रम बहुतेक नोव्हेंबर २०१४ पासून सुरु झाला असावा कारण हे चॅनेलच मुळी तेव्हा सुरु झालं. माझे सुरुवातीचे काही भाग चुकले असावेत. राजस्थानमधलं भानगढ, त्रिपुरातलं उनाकोटी आणि गुजरातमधलं लखपत ह्यावरील भाग मी पाहिले. आणि त्यावरची माहिती 'संथ चालती ह्या मालिका' इथे पोस्ट केली. ती कायमस्वरुपी साठवून ठेवावी अशी सूचना झाली म्हणून हा धागा काढला.
आज काल खुप छान आणी दर्जेदार मराठी चित्रपट येत आहेत... आणी पुण्यात तर मल्टीप्लेक्सवर मस्त चित्रपट चालु असतात... पण बरेचदा आपण काही चित्रपट मिस करतो कामामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे.. मला वाटतं आपण जर मराठी चित्रपटांचे ट्रेलर जर पाहीले तर कदाचीत आपल्याला तो चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागेल आणि आपण तो पाहु आणि तेवढाच आपला हात भार चित्रपटा निर्मात्यांना.. म्हणुन हा धागा...
मोबोकरांनी एकद्याचित्रपटाचे ट्रेलर पाहीले तर इथे नक्कीच पोस्ट करा म्हणजे बाकीच्यांना सुध्धा पाहता येईल आणि कदाचीत आपण तो चित्रपट पाहु....
मी पाहिलेल ट्रेलर..
बाजी
https://www.youtube.com/watch?v=PGmX5NyHVt4
जुन्या मालिका ( फार जुन्या नाहीत ) उदा. शांती, स्वाभिमान, कोरा कागझं ह्या बद्दल काही गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत, कोणाला आठवत असेल तर सांगा 
१. शांती मधे एक माणूस दाखवत ज्याचे फक्त दोन्ही हात आणि प्रत्येक बोटात अंगठ्या असतं, तो कोण होता ?
२. कोरा कागझ चा शेवट काय झाला ? रेणुका शहाणे, सलील अंकोला होते त्यातं.
अजून आठवतील तसे प्रश्ण लिहिन 
नशा फक्त वाईट गोष्टींचीच चढते असं नाही. चांगल्या गोष्टींची देखिल नशा चढते! आणि मला सध्या पाकिस्तानी टीव्ही मालिकांची नशा चढली आहे. तशा खूप पाकिस्तानी मालिका पाहिल्या नाहीयेत मी अजून, हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच पाहिल्यात पण त्यांनी मला जे दिलं आहे ते आजवर कोणत्याच हिंदी/मराठी/इंग्रजी मालिकेने दिलेलं नाहीये! अर्थात हे माझं मत आहे. आणि ही मालिकांना यशस्वी मानण्याची एकमेव फुटपट्टी नव्हे. कारण कोणाला कधी, कशात काय सापडेल ते सांगता येत नाही. दगडात देव शोधणारी माणसं आपण! चांगल्या कलाकृतीचा माझा निकष एकच – तिने मला लिहायला भाग पाडले का? माझ्यातला कलाकार/लेखिका जागी केली का? सुदैवाने हो!
साराभाई v/s साराभाई ही मला आवडणारी एक evergreen हिंदी मालिका. ह्या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा इतकी चपलख जमली आहे... आम्ही ह्या मालिकेचि अक्षरशः पारायणे केली आहेत. ह्यातला प्रत्येक विनोद माहीत आहे तरी तो इतका निखळ आणि उत्स्फूर्त आहे की प्रत्येक वेळी बघताना हसायला येतंच..
हे कुटुंब -
इंद्रवदन - कळीचा नारद , प्रचंड खाण्याची आवड,
माया - high society representative,
सून - मोनिशा - typical मध्यम वर्गीय ,
मुलगे - साहिल - सगळ्या कुटुंबाचा विचार करणारा , रोशेस - एक वेगळेच व्यक्तिमत्व
इतकं निखळ, अप्रतिम मिश्रण आहे - अशी भट्टी क्वचितच जमून येते....