हाऊस एम डी बद्दल

Submitted by mi_anu on 30 January, 2015 - 05:07

हाऊस एम डी मला खूप आवडायची. हाऊसचे एकंदर पात्र आणि त्याला कायम चिमटे काढत असूनही कठीण प्रसंगी त्याला आधार देणारी आणि त्याच्या बुद्धीला कायम मानणारी टिम पण.
मालिका आता स्टार वर्ल्ड वर संपली पण त्याच्या आठवणी जागवण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या मालिकेचा एक ठराविक साचा आहे.
पहिली पंधरा मिनीटे: एक रुग्ण प्लेन्स्बोरो हॉस्पिटलात दाखल होणे आणि सर्वांना तो साधी केस वाटणे.
दुसरी पंधरा: रुग्णाचे बायको/नवर्‍याशी/आईवडिलांशी संबंध हाऊसच्या टिमने उघड केलेल्या एखाद्या सिक्रेटमुळे तणावत आणि अवस्था गंभीर.
तिसरी पंधरा: हाऊस टिमचे तर्क आणि एक निष्कर्ह काढून उपचार आणि त्याने रुग्ण जवळ जवळ मरायला टेकणे
शेवटची पंधरा: हाऊसला एखादी गोष्ट लक्षात येऊन अचूक आजाराचे निदान आणि रुग्ण सुधारणे आणि रुग्णाची नातीगोती पण सुधारणे.

सर्वात आवडलेले सीन्सः
१. हाऊसने ट्वेंटी व्हायकोडीन मध्ये आपल्या निदानाच्या आत्मविश्वासावर कैद्यांशी मुद्दाम भांडण करुन मारहाण करवून घेऊन रोगी कैदी बरा करण्यासाठी हॉस्पीटलात जाणे.
२. विल्सनने वेदनादायाक उपचार म्हणून केमोथेरपी नाकारुन कॅन्सर बरा करणे नाकारुन मरण स्वीकारण्या निर्णय घेतल्या वर "लाईफ इज पेन. आय वेक अप एव्हरी मॉर्निंग इन पेन." म्हणून टॉब बरोबर बोलताना व्यक्त झालेला हाऊस.
३. हाऊस कडीशी बिनसल्यावर हॉटेलात राहून तिसर्‍या मजल्यावरुन स्विमिंग पूल मध्ये उडी मारतो तो सीन छान घेतला आहे. त्यातलं 'माय बॉडी इज अ केज' अजून कानात घुमतं आहे.
४. विल्सनची मृत मैत्रिण हाऊसला भासांमध्ये दिसत होती ते भाग पण आवडायचे.
हाऊस बघायला खूप उशिरा चालू केलं. आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बिंज वॉचिंग करायचं आहे पहिल्यापासून. कधी काय माहित.

मी काही महिन्यांपुर्वीच बिंज वॉच करुन सगळे सीजन संपवले. मी खुप मोठा पंखा आहे ह्यु लॉरीचा. खुपच टॅलेंटेड माणूस आहे.
सहसा एखाद्या शो मध्ये जेव्हा सगळ्याच कलाकारांची/पात्रांची भट्टी जमते तेव्हाच शो हिट होतो. हाऊस मध्ये पण टीम झक्कास जमलीये.

मी काही महिन्यांपुर्वीच बिंज वॉच करुन सगळे सीजन संपवले. मी खुप मोठा पंखा आहे ह्यु लॉरीचा. खुपच टॅलेंटेड माणूस आहे.
<<
ए भो, मी बी!

मी आधी बघायचे ही मालिका. मग १-२ सीझननंतर हाऊस असह्य झाला तेव्हा बघायची सोडली. शेवटचे २-३ भाग मागच्या आठ्वड्यात पाहिले. विल्सनचं कॅरॅक्टर फार आवडायचं. शेवटच्या भागांत त्याला आजारी बघवत नव्हतं. शेवटच्या एपिसोडमधलं 'किप मी इन युअर हार्ट....' खूप आवडलं. शेवटी फोरमनला हाऊस जिवंत असल्याचं टेबलाच्या पायाखाली असलेल्या आयडी कार्डवरून कळतं तो सीन मस्त वाटला. ह्यांच्या सगळ्या सिरियल्समधल्या टीम्स खूप मस्त असतात.

हाऊस एम. डी. ही मलादेखील भावलेली एक सिरियल !
या अद्वितीय संग्रहणीय सिरीयलचे तब्बल १७७ एपिसोड झाले आणि प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवीन रोगनिदानाची चर्चा घडवली गेली.
पुन्हा पुन्हा पहावी असे वाटणारी ही सिरियल ज्या डॉक्टरांच्या लेखांवर स्फुरली त्या डॉ लिझा सॅन्डर्स,(the doctor behind 'House') यांची 'Diagnosis' आणि "Every Patient Tells A Story" ही पुस्तके देखील अत्यंत वाचनीय आहेत. काही एपिसोड्स बर्टन रुसे यांच्या "Medical Detectives" या पुस्तकांवरून व अशा अनेक सत्यकथा शोधून त्यावर आधारले होते. आठ वर्षे चाललेल्या ह्या मेगासिरियलने अनेक नवे विक्रम निर्माण केले. डेव्हिड शॉर आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करावे तेव्हढे थोडेच !

या सिरीयलमधील मुख्य पात्र मात्र मला नेहमीच खटकले होते. एक बुद्धिमान पण विक्षिप्त अशा पात्रा ऐवजी त्याच टीम मधील डॉ विल्सन किंवा डॉ कडी जास्त चांगले वाटले असते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत ! पण तरीही या प्रकारच्या मेडिकल नाट्य विभागातील इतर अनेक मालिकांपेक्षा House MD फारच उजवी होती !

भविष्यामध्ये अशा प्रकारची आणखी एखादी नवी सिरियल नक्कीच आपल्याला पाहण्यास मिळेल अशी माझी खात्री आहे.

Long Live House MD !

<<<<<< या सिरीयलमधील मुख्य पात्र मात्र मला नेहमीच खटकले होते. एक बुद्धिमान पण विक्षिप्त अशा पात्रा ऐवजी त्याच टीम मधील डॉ विल्सन किंवा डॉ कडी जास्त चांगले वाटले असते. >>>>>>

त्या पात्राचा विक्षिप्तपणा हीच खरतर त्या पात्राची आणि पर्यायाने शो ची जान आहे. जर ते पात्र हुशार पण सरळमार्गी असते तर काय मजा??? म्हणजे पेशंट शी उपहासात्मक तिरसटपणे बोलणे, त्यांच्या घरी घरफोडी करणे, पेशंटला वाचविण्यासाठी नियम धाब्यावर बसवणे, डॉक्टरांशी प्र्यांक करणे, कोणत्याही गोष्टींवर पैज लावणे, या गोष्टी नसत्या तर मग शो मध्ये काय उरले ??
बाकी कटणर ची गच्छन्ति एकदम तडकाफडकी झाली.

Patients lie.
People never change. हे माझे आवडते डायलॉग.

कटणर ओबामा साहेबांचा काही सहाय्यक बनला त्यामुळे राजकीय कारणांसाठी त्याला काम करता येणार नव्हते मालिकेत. म्हणून तडकाफडकी मारुन टाकला. मला हे माहित नव्हतं तेव्हा उगीचच वाटत होतं तो भाग संपेपर्यंत की हाऊस काहीतरी चमत्कार करुन त्याला वाचवेल. त्यांनी कडीसाठी च्या राचेल बाळाला असंच अचानक जिवंत दाखवलं तसं.
कडी हाऊस च्या खोट्या अंत्ययात्रेला आली नाही याचे आश्चर्य वाटले.

गंमत म्हणून विचार करत होतो, आपल्याकडे जर हाउस एमडी बनवले (सेम स्टोरी इंडियन मॉडिफिकेशन ण करता २४ सारखे)

तर कास्ट लाइनअप कसा असेल??

लिसा कड़ी - करीना कपूर
विल्सन - रजत कपूर
फोरमन - रणदीप हूडा
चेस - शहीद कपूर, वरुण धवन
कॅमरुन - जेनेलिया डीसुझा किंवा इलेअना डी क्रूज़
टॉब - विनय पाठक, नसीरुद्दीन शाह, अनुपम खेर
रेमी हेडली - एमी जैक्सन
हाउस - केके मेनन किंवा बेस्ट म्हणजे इरफ़ान खान

कडी फक्त चित्रांगदा
हाऊस इरफान खान किंवा अनिल कपूर किंवा अक्षय कुमार
चेस ह्रितिक रोशन किंवा नील नितीन मुकेश किंवा शायनी आहूजा
कॅमेरॉन श्रद्धा कपूर, आलिया
थर्टीन प्रियांका, जैकलीन
विल्सन रितेश देशमुख, शर्मन जोशी, सैफ अली खान
फोरमन कोणी येत नाही डोळ्यासमोर, त्यातल्यात्यात मुकेश ऋषि येतोय डोळ्यासमोर.

कडी फक्त चित्रांगदा
हाऊस इरफान खान किंवा अनिल कपूर किंवा अक्षय कुमार
चेस ह्रितिक रोशन किंवा नील नितीन मुकेश किंवा शायनी आहूजा
कॅमेरॉन श्रद्धा कपूर, आलिया
थर्टीन प्रियांका, जैकलीन
विल्सन रितेश देशमुख, शर्मन जोशी, सैफ अली खान
फोरमन कोणी येत नाही डोळ्यासमोर, त्यातल्यात्यात मुकेश ऋषि येतोय डोळ्यासमोर.

लिझा कडि - अर्चना पुरन सिंग (साधारण दिसते पण लिझा एडल्स्टाइन सारखी)
ग्रेग हाउस - पंकज कपूर (विक्षिप्त कॅरेक्टर साकारण्यात हातखंडा - मकबुल, करम्चंद)... Happy

माफ़ करा पण अर्चना पूरणसिंह ही ओरिजिनल लिसा एडेलस्टिन ची रिप्लेसमेंट म्हणजे लिसाचा अपमान आहे!!

हे माझे वैयक्तिक मत आहे कृपया राग मानु नये Happy

अर्चना पूरणसिंग चांगली अभिनेत्री आहे, तशी अंडररेटेड आहे पण लिसा कडीचे पात्र 'वयाने लहान असताना मोठ्या पदावर पोहचलेली आणि हॉट सुन्दर स्त्री चे आहे आणि त्यात अर्चना पूरणसिंग सूट होणार नाही.तशी थोड़ा चांगला अभिनय केला तर मला चित्रांगदा किंवा कटरिना पण चालेल.

वोगलर गुलशन ग्रोव्हर किंवा कल्लू मामा चं काम करणारा शुक्ला.
स्टेसी सुष्मिता सेन
अंबर बिपाशा(तिला बऱ्याच भूतपटा मध्ये पाहून डोळ्यांना सवय झालीय.
कटनर माधवन
मार्था मास्टर्स लारा दत्ता किंवा आलिया
एडेम्स दीपिका
पार्क जस्सी चं काम करणारी बाई

याचा पायलट्/पहिला भाग फक्त पाहिला आहे. इण्टरेस्टिंग वाटला होता. ह्यू लॉरी ला खूप आधी बर्टी वूस्टर च्या धांदरट रोल मधे पाहिला होता. त्याचे या गेल्या काही सिरीज मधले रूप नवीन आहे. मधे एकदा फक्त तो फ्रेण्ड्स मधे रेचेल बरोबर लंडनच्या फ्लाइट मधे तिच्या बडबडीने वैतागून हेडसेट लावून बसतो त्या सीन मधे पाहिला होता Happy

कालच पाहिले.
हाऊस एम डी चे सर्व भाग आता भारतात अमॅझॉन प्राईम व्हिडिओ वर उपलब्ध आहेत.(आता पर्यंत कोणीतरी गुगल डॉक वर चढवलेले किंवा ७२० पी वरचे बघायला लागायचे.)
इथे डॉक्टर हाऊस असे नाव आहे, हाऊस एम डी नाही.

एक सिझन झाला पाहून. अजुनपर्यंत तरी भयंकर आवडली आही. हाऊस अचाट आहे.

मंक तर जबरदस्त आहे च्र्प्स. मी रोज थोडतरी पहातेच. आठ सिझन २दा पाहुन झालेत. तिसर्‍यांदा सुरु केले आहे.