बेटर कॉल सॉल

Submitted by रायगड on 11 February, 2015 - 17:04

Saul.jpg

ब्रेकिंग बॅडच्या चाहत्यांसाठी नवी पर्वणी - नविन सिरिअल - बेटर कॉल सॉल! ज्यांनी ब्रेकिंग बॅड बघितलय त्यांना या कॅरॅक्टरची आणि या वाक्याची चांगलीच ओळख आहे. तर आता या सॉल वरच मालिका - नक्कि काय आहे मालिकेत माहिती नाही. पण सॉलची ब्रेकिंग बॅड च्या आधीची पार्श्वभूमी, तो तसा कसा काय घडला, आणि त्याचं ते अजब नेटवर्क "Let's just say I know a guy...who knows a guy ...who...knows another guy." कुठून निर्माण झालं - याची ही सारी पार्श्वभूमी असावी.
ब्रे बॅ चे निर्माते - विंस गिलीगन हे याचे सुद्धा सह-निर्माते आहेत. परवाच्या रविवारी म्हणजे ८ फेब्रुवारी ला या मालिकेचा पहिला भाग झाला आणि सोमवारी दुसरा भाग. मस्त होते दोन्ही भाग.
सध्या फुल एपिसोड्स AMC वर बघायला मिळतील :
http://www.amctv.com/full-episodes/better-call-saul

तर ब्रे बॅ चाहत्यांनो, बघा व इथे येऊन त्यावर गप्पा मारा.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिले दोन भाग बघितले.. जबरी काम करतो हा माणूस !
आणी काय प्लॉट, त्याची बॅगग्रांऊंड डेव्हलप केलीये.... ब्रेबॅ मधे सॉल असा का? ह्याचं उत्तर /झलक त्याच्या पूर्वायुष्याच्या प्रसंगात पाहताना धमाल येते. वकीली भाषा, बोलण्यावरची कमांड, शब्दांचे खेळ, शब्द फिरवणे.. धमाल आहे नुसती. मी पहिल्या दोन भागातच खूश Happy

आवडेल ही बघायला पण सध्या बँड्विड्थ नाही .. नेटेफ्लिक्स् वर आलं की सावकाशी ने .. Happy

त्याची "सॉल" इमेज इतकी डोक्यात बसलीये की नेब्रास्का मध्ये वेगळ्या रोलमध्ये अ‍ॅक्सेप्ट करायला वेळ लागला ..

वकीली भाषा, बोलण्यावरची कमांड, शब्दांचे खेळ, शब्द फिरवणे.. धमाल आहे नुसती >> अगदी अगदी, रार!

एकूणातच दुसर्‍या एपिसोड मध्ये सॉलशेट टुकोला ज्या पद्धतीने पटवतात ते म्हणजे धम्माल!

Hey, I just talked you down from a death sentence to 6 months probation, I am the best lawyer ever Lol

त्या चकची भानगड मला अजून नीटशी कळत नाहीये - electromagnetism चा त्रास? काय नक्की?

आय थिंक काही त्रास नसतो इलेक्ट्रोमॅगनेटीझमचा. चक सायको असावा. कारण तो म्हणत अस्तो - मी बरा होईन. इ इ .

५ भाग पाहिले. आता ड्रामा वाढला आहे. बघतोय पुढे. मात्र आधीच्या सीझन मधे जिमी ची एक वेगळीच विनोदाची स्टाइल होती. dry/droll यापैकी म्हणता येइल अशी, ती अजून दिसली नाही नवीन सीझन मधे.

पण माइक वगैरे चा ट्रॅक ब्रेकिंग बॅड कडे जाउ लागला आहे Happy

ब्रेकिंग बॅड म्हणजे खरंच एक अप्रतिम सिरीयल होती, ब्रायन क्रॅन्स्टन-ऍरॉन पॉलचा अप्रतिम अभिनय, दर्जेदार क्राईम-थ्रिलर आणि मुख्य म्हणजे प्रत्येक एपिसोड मधून समजत गेलेले केमिस्ट्री विषयाचे बारकावे! माझी आत्तापर्यंतची सर्वात आवडती सिरीयल!
बेटर कॉल सॉलपण स्पिन-ऑफच्या दृष्टीने चांगली आहे!

५ भाग पाहिले. >>>

हायला ते कुठून पाहिले? सीझन ३चे दोनच भाग आलेत ना आत्तापर्यंत?

आबा - ओह तुम्ही सीझन ३ म्हणताय ते लक्षात आले नाही. मी नेटफ्लिक्स वर सीझन २ आला आहे त्याबद्दल म्हणतोय :). सीझन ३ एएमसी वर आलेला दिसतोय.

पाहिला दुसरा सीझन पूर्ण. इण्टरेस्टिंग होता. माइक चे कॅरेक्टर वाढवले आहे. ब्रे बॅ व ही सिरीयल धरून त्या माइकला हसताना पहिल्यांदाच दाखवला असेल Happy

बरं 'चक' चा फ्रेण्डस मधला छोटा रोल कोणाला लक्षात आहे का? Happy
हिंट - मॉकोलेट