साराभाई v/s साराभाई हिंदी मालिका

Submitted by सुजाता बापट on 24 November, 2014 - 16:11

साराभाई v/s साराभाई ही मला आवडणारी एक evergreen हिंदी मालिका. ह्या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा इतकी चपलख जमली आहे... आम्ही ह्या मालिकेचि अक्षरशः पारायणे केली आहेत. ह्यातला प्रत्येक विनोद माहीत आहे तरी तो इतका निखळ आणि उत्स्फूर्त आहे की प्रत्येक वेळी बघताना हसायला येतंच..
हे कुटुंब -
इंद्रवदन - कळीचा नारद , प्रचंड खाण्याची आवड,
माया - high society representative,
सून - मोनिशा - typical मध्यम वर्गीय ,
मुलगे - साहिल - सगळ्या कुटुंबाचा विचार करणारा , रोशेस - एक वेगळेच व्यक्तिमत्व
इतकं निखळ, अप्रतिम मिश्रण आहे - अशी भट्टी क्वचितच जमून येते....

ह्या मालिकेचा कोणतही भाग म्हणजे stress कमी करण्याचा हमखास उपाय वाटतो मला...

"साराभाई vs. साराभाई चे ६७ एपिसोड्स"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोण्त्या चॅनलवर सूरु झाली? ५० भाग रेकॉर्ड केलेत व प्रत्येक निदान १५ वेळा पाहिलाय, काही अजुन जास्तवेळा.. तरी समाधान नाही. Happy

बेस्ट स्ट्रेसबस्टर मालिका!! कधीही, कोणताही भाग बघा, मनोरंजनाची पूर्ण गॅरेंटी! बहूतेक सगळे भाग युट्युबवर आहेत.
दुष्यंतच्या उल्लेखाशिवाय मालिकेची ओळख अपूर्ण आहे!

एक अप्रतीम मालिका! सगळेच भाग कित्येकदा पाहिलेत...
दुष्यंत, मोनिशा, माया, रोसेश, साहिल, इंद्रवदन मस्तच भट्टी जमलेली... Happy

याच मालिकेची मराठी बहीण स्टार प्रवाह वर आहे - माधुरी मिडलक्लास (की अश्याच काही) नावाची. सगळीच कॉपी-पेस्ट आहे मूळ मालिकेची. अजिबात नाही आवडलेली...

खरं आहे जिज्ञासा.. मी कशी विसरले दुश्यंतला..... ही मालिका युट्युबवर च बघतो...म्हणजे पारायणं करतो....

एएए...... मधुसुदन फुफा...
आणि रोसेशची पोएट्री... बेस्ट सीरिअल.... Happy

मलापण ही मालिका फार आवडते. खरच एव्हरग्रीन मालिका आहे ही. ही मालिका एव्हरीबडी लव्ह रेमंड ह्या अमेरिकन मालिकेवरून बेतलेली आहे असे कळले. हे खरे आहे का?
मी एव्हरीबडी लव्ह रेमंड ह्या मालिकेचे काही भाग बघितले पण तितकीशी मजा नाही वाटली.

माझी पण एक नं. आवडती मालिका. युट्युबवरच पाहते मी पण. ही आणि खिचडी Happy

रॉसेश, यम बनलेला असताना किती गोड दिसत होता एका भागात. आणि ईंद्रवदन एका भागात माया बनलेला असतो, साडी नेसून अ‍ॅक्सेन्ट मारताना ह . ह.पु.वा होत राहते बघणार्यांची नुसती Rofl

एका भागात इंद्रवदन आणि माया यांचे लग्न कसे जमले ते दाखवले आहे.
ते तरूण असतात आणि एका पार्टीत भेटतात, इ. इ. Happy

सध्या कुठे चालू आहे का ही मालीका? बरेच भाग रेकॉर्ड केले होते. मधे टाटा स्कायने काहीतरी गोंधळ घातला आणि सगळे डिलिट झाले Angry परत रेकॉर्ड करायचे आहेत.

मला ही खुप आवडते ही मालिका , कुठल्यातरी मराठी चॅनलवर याचीच कॉपी असलेली मालिकेचे काही भाग पाहिले होते, त्या मालिकेचे नाव "माधुरी मिडलक्लास" पण पात्र ही सगळी आहेत, अगदी सेम .

ऑल टाईम ग्रेट, ऑल टाईम फेव्हरेट! उच्च अभिरुचीचा हाईक्लास विनोद..
कुठेही मेलोड्रामा नाही, ना कुठे ओवरअ‍ॅक्टींग, आणि आचरटपणापासून कोसो दूर..

माधुरी मिडलक्लास -
मी फेबूवर हि मालिका डोक्यात जाते असे लिहिलेले.
त्यावर एका मित्राने आमच्याकडे सर्वांना आवडते असे म्हटलेले.
मी त्याला विचारले, तुम्ही साराभाई v/s साराभाई पाहिलीय का?
तो नाही म्हणाला.
मग मी ठिक आहे म्हणून वाद संपवला.

कविता, हो म्हणून तर, ज्याने साराभाई पाहिलीय त्याला माधुरी मिडलक्लास फारशी पचनी पडणे अवघडच. बाकी साराभाई न पाहिलेल्यांना ती चांगली वाटू शकते, पण मग अश्यांना साराभाई किती सरस होती हे समजावणेही कठीणच, म्हणून तिथेच थांबलो.

साराभाई ऑल टाईम फेव्हरेट मालिका.
गुजर गये पोपट काका Proud ते विडंबन मला आईये मेहरबां पेक्षा जास्त आवडतं आणी आठवतं Lol

ईंद्रवदन एका भागात माया बनलेला असतो, साडी नेसून अ‍ॅक्सेन्ट मारताना >>> हा भाग नाही पाहिला. याची प्लिज लिंक द्या Happy

कधी कधी मोनिषाचे मध्यमवर्गीयपण आणि मायाचे उच्चवर्गीयपण जरा जास्तच बोल्ड केल्यासारखे वाटते, पण जरा नाट्यमय करण्यासाठी ते तसे आवश्यक असावे.

रोसेशची एकदा मुलाखत पाहिली होती एका चॅनेलवर, तेव्हा साधा सरळ बोलणारा रोसेश पाहून काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. Happy

<<<<रोसेशची एकदा मुलाखत पाहिली होती एका चॅनेलवर, तेव्हा साधा सरळ बोलणारा रोसेश पाहून काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. स्मित>>>>

रोसेश ची भुमिका करणारा सोनी की सब टी.व्ही. वर मिस्टर अँड मिसेस शर्मा इलाहाबादवाले मधे मुख्य भुमिकेत होता तसेच स्टार प्लस वरील "बा , बहु और बेबी" मध्ये तीन भावांपैकी एक होता.

सतिश शहाचे नाव साराभाई मध्ये इंद्रवदन आहे का मला नेहमी इंद्रवर्धन वाटायचं

एका आळसावलेल्या रविवारी मॅगी चे जेवण जेवून दिवसभर एका बैठकीत याचे जमतील तेवढे भाग बघीतलेले नवर्‍यासोबत!! Proud अहाहा क्या दिन थे वो!! :उसासे सोडणारी स्वप्नाळू बाहुली:
"मोनिषाचे मध्यमवर्गीयपण" माझ्यात ठासून भरलेय अशी बरेच दिवस नवर्‍याची ठाम श्रद्धा होती Uhoh

ज्याने साराभाई पाहिलीय त्याला माधुरी मिडलक्लास फारशी पचनी पडणे अवघडच.>> +१
http://www.maayboli.com/node/46535

प्रत्येक नवर्‍याला आपली बायको बर्‍याच बाबतीत मोनिषाची कॉपी आहे वाटत असे आणि बर्याच सुनेंना आपली सासु माया सारख्या टोमणा मारणार्या वाटत होत्या. आणि आपला नवरा साहिल सारखा सरळमार्गी असावा अशी पुर्ण न होणारी अपेक्षा होती Wink

त्यातल्यात्यात रोशेष सारखा कॅरेक्टर घरात असु नये यावर सगळ्यांचेच एकमत होते

अशा मालिका बन्द का पडतात हे कळत नाही. स्पोन्सरर मिळत नाही का प्रेक्शक सन्ख्या पुरेशी नसते देव जाणे.
या टाइपच्या मालिकेचा चाहता वर्ग खुप कमी असतो.

ही मालिका परत सुरु व्हायला हवीच.

सगळ्यात भीषण म्हणजे कवी संमेलन....
अरारारा, काय एकसे एक कविता....
मै लुख्खा हू च्या वेळी तर अक्षरश लोळलो होतो....

सगळ्या कलाकारांबरोबरच लेखकाला मानले पाहिजे...जबरदस्त...कुठेही तो विनोद ओंगळवाणा, दुखावणारा, कंबरेखालचा होत नाही.
निखळ विनोद म्हणजे काय याचे आदर्श उदाहरण

Pages