अतीश्रीमंतीने सजलेली घरे, मढलेल्या बायका, घरातही लग्नासाठी जमावे तसे सजलेले स्त्री-पुरुष, जनरेशन गॅप, कौटुंबिक नाट्य, रटाळ चित्रण, प्रत्येकाच्या चेहर्यावर कॅमेरा रेंगाळवून प्रत्येकाची रिअॅक्शन दाखवण्याची अविकसित बुद्धीमत्ता, टिपीकल कंटाळवाणी संवादफेक, चांगले असणारे फारच चांगले आणि वाईट ते फारच वाईट, रिअल लाईफमध्ये कधीही होणार नाहीत असे संवाद व त्यांचा वेग, ही सर्व गुण(?)वैशिष्ट्ये घेऊन मालिका अवतरतात.
If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices!
झी मराठीवरचा एकमेव विनोदी Reality Show असलेल्या फू बाई फू चं नवीन पर्व कसं वाटतंय ??
माझ्या मते आधीचीच पर्व आणि त्यांच्यातले विनोद सरस होते. यातल्या जोड्या आणि सगळे स्कीट ओढूनताणून केल्यासारखे आहेत. विशेषत: माधवी जुवेकर आणि विजय पटवर्धन अतिशय सुमार… बळंच लाऊड होतात (हेमावैम). स्वत: परीक्षकही खूप कमी वेळा हसतात !!
तुम्हाला काय वाटतं ??
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

स्टार प्रवाहवर कालपासुन एक नवीन मालिका सुरु झाली आहे. स्टार वनवरच्या सुप्रसिद्ध साराभाई v/s साराभईची ही कॉपी आहे, पण मालिका छान काढली आहे.
नावः- माधुरी मिडल्क्लास
वाहिनी:- स्टार प्रवाह
प्रसारण वेळ:- रोज रात्री ९:३० ते १०:३०
कलाकारः-
१. अमिताभ राजे
(साराभईमधल्या सतीश शहाच्या रोलमध्ये)
२. माया राजे
(साराभईमधल्या सतीश शहाच्या बायकोच्या (नाव नाही आठवत) रोलमध्ये)
नमस्कार
आजपासुन झी कॅफे वर रा ११:०० वाजता अगाथा क्रिस्टीचा डिटेक्टिव "पॉयरो" चे एपिसोड्स दाखवणार आहेत.
हे सगळे भाग युट्युबवर आहेतच पण टीव्हीवर पहायला आणखी छान वाटेल.
सी आय डी किंवा अदालत मधले बिनडोक भाग पाहुन कंटाळा आला असेल तर त्यावर उत्तम उतारा..
Enjoy!
शाळेत असताना किती भाबडी स्वप्न असायची नाही का? खूप मोठे व्हावं आणि पेपरमध्ये (त्या काळी पेपर हेच दृश्य एक साधन होतं झळकण्याचं) निदान फोटो नाहीतर नाही पण कमीत कमी कुठल्यातरी कोपर्यात नाव तरी छापलं जावं अन आपण झळकावं अशी आम्हा मैत्रिणींची इच्छा म्हणा किंवा स्वप्न म्हणा! पण असं काही होणं दुरापास्तच कारण आम्ही सामान्यातील सामान्य. चुकून माकून फोटो काढला गेला अन तो पेपरमध्ये आला तर ह्या आशेवर कधीतरी शाळेच्या पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला निघणार्या प्रभात फेरीत कितीही हात दुखला तरी हातात झेंडा घेऊन समोर उभं राहायचो. नाही म्हणायला खेळात होतो पण काळ्या - पांढर्या दहाजणीतील मी कोण?
नमस्कार मायबोलीकर,
एक नवीन धागा उघडत आहे. यात आपण बिग बॉस च्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करू शकतो.
तर, कोण कोण बघतो बिग बॉस आणि काय वाटते तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल ?
नविन मालिका - २४
अनिल कपुर ची नविन मालिका "२४" कलर्स वाहिनीवर शुक्रवार पासुन दाखवली जात आहे.
इंग्लिश मालिका "२४" चे भारतीय रुपांतर आहे
जय सिंग राठोड ( अनिल कपुर) एटीयु ( अँटी टेरेरीस्ट युनिट) चा ऑफिसर आहे. त्याला आदल्यारात्री माहीती मिळते की दुसर्या दिवशी शपथग्रहण करणार्या पंतप्रधानांचा काही अतिरेकी लोक खुन करणार आहे..त्या पुर्ण २४ तासाच्या दिवसाच्या घडामोडींवरची ही मालिका...... २४भागात प्रसारीत करणार आहेत... दर भाग एक तासाचा....
सुरुवात तर प्रचंड आशादायक झालेली आहे...
दोन एपिसोड तर झाले आहेत... प्रचंड गुंतागुंत आणि वेगवेगळे कथानकाचे पैलु एकाच वेळेला समोर येत आहेत