मोठा नळ, लहान नळ आणि टाकी
दोन नळांच्या साहाय्याने एक टाकी भरायला सहा तास लागतात. एका वेळी एकच नळ चालू ठेवला तर टाकी भरायला लहान नळाला मोठ्या नळापेक्षा पाच तास जास्त लागतात.
प्रत्येक नळाला स्वतंत्रपणे टाकी भरायला किती तास लागतील?
दोन नळांच्या साहाय्याने एक टाकी भरायला सहा तास लागतात. एका वेळी एकच नळ चालू ठेवला तर टाकी भरायला लहान नळाला मोठ्या नळापेक्षा पाच तास जास्त लागतात.
प्रत्येक नळाला स्वतंत्रपणे टाकी भरायला किती तास लागतील?
मंडळी
इथं जी सिच्युएशन देण्यात येत आहे ती काल्पनिक आहे हे आधीच स्पष्ट करतो. समजा, जर तुमच्या ऑफीसमधल्या एखाद्या स्त्री सहका-याने (सहकारणीने)   ब्युटीक मधून शिवून आणलेला महागामोलाचा   ड्रेस तुमच्याकडे दिला ;
थांबा. पूर्ण झालेलं नाही. अर्धविराम आहे.
तर हा ड्रेस तुमच्याकडे तिच्या मैत्रिणीकडे देण्यासाठी दिला कारण तुम्ही त्याच बाजूला राहता आणि तुम्ही विश्वास टाकण्याजोगे आहात अशी तिची समजूत आहे. तुम्ही मोठ्या आनंदाने ही जबाबदारी स्विकारता आणि ड्रेस तुमच्या ब्रीफकेसमधे व्यवस्थित ठेवून देता.
गेल्यावर्षी क्लूलेस शेवटपर्यंत खेळलेल्या सगळ्यांना हाक! 
उद्या भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:११ला क्लूलेस-७ सुरू होईल. नेहमीप्रमाणे लेव्हलींचे क्लू टाकण्यासाठी हा धागा.
यंदा 'हॉल ऑफ फेम'साठी प्रयत्न करूया. 
ही लिंक:
राम आणि श्याम दोन वेगवेगळ्या शहरांमधे राहात आहेत. रामकडे एक हिरा आहे जो त्याला श्यामला पाठवायचा आहे. काही कारणामुळे तो स्वतः श्यामच्या घरी जाऊ शकत नाही आणि श्यामही त्याच्या घरी हिरा न्यायला येऊ शकत नाही. हिरा पोस्टाने पाठवणे हा एकच मार्ग आहे. पण त्या देशातले पोस्ट खाते एकदम चोर आहे. ते प्रत्येक पार्सल उघडून त्यातील गोष्टी चोरतात. पण समजा वस्तू पेटीत ठेवून कुलूप लावले असल्यास ते उघडण्याच्या फंदात पडत नाहीत. राम आणि श्याम दोघांकडे भरपूर पेट्या आणि अनेक वेगवेगळ्या आकारांची पेटीच्या कडीत अडकवता येतील अशी कुलपे आहेत. प्रत्येक कुलपाला एकच त्याची त्याची वेगळी किल्ली आहे.
आटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे
आटपाट नगरातील ही सत्यकहाणी.
गावातील कोर्टात एक जज मॅडम होत्या. त्यांचा नवरा गेल्यामुळे त्या एकट्याच होत्या. साधारण ४० एक वय असावं.
कोर्टाशेजारीच पोलिस स्टेशनची इमारत. तिथल्या चुलबुल पाम्डेवर त्यांचं मन फिदा झालं आणि त्या दोघानी लग्न केलं.
लग्न केलं आणि गोंधळ झाला. कारण चुलबुल आधी विवाहीत असून दोन मुलांचा बाप आहे. त्याचं म्हणणं, मी दोन्ही बायकाना व्यवस्थीत करीन.
आणखी एक तिढा. बाई मुसलमान, तर बुवा हिंदु. बाईनी हिंदु धर्मानुसार कुंकू बांगड्या वापरायला सुरुवात केली.
दुर दुर कुठल्या तरी समुद्राच्या मध्यभागी एक छोटीसी नाव एका जासूसाला एका संकेत स्थळी घेऊन जाते आणि अचानक सिक्युरिटी जहाज येते आणि त्या छोट्या जहाज चालकाच्या अंगावर ओरडते, काय चाल्लय? इतक्या रात्रीचा फिरतोस? घरी जा सरळ, तो छोटा जहाज चालक बिचारा निघतो पण त्या पिटुकल्या जहाजावरील तो जासूस मात्र शिताफीने त्या मोठ्या जहाजाला लटकतो आणि त्यांच्यासोबत पुढचा प्रवास करतो.
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
भावनिक बुध्दयांक......
कुठे लिहावे ते समजेना म्हणुन या पानावर देत आहे. अयोग्य असेल तर सांगावे.
.
.
माबोकरांनो मला भावनिक बुध्दयांका(EQ) बद्दल जाणुन घ्यायचे आहे. पेपरमधे व इतर चर्चेत अॅकेड्मीक हुशारीपेक्षाही  EQ ला जास्त महत्व आहे असे वाचण्यात ऐकण्यात आले होते. त्यासाठी मी एक इंग्रजीमधे पुस्तक आणले वाचले पण ते जास्तकाही कळले नाही. 
                                 अॅकेडमिक रेकॉर्ड एकदम एक्सलंट असतानाही मला करिअर मधे पाहीजे तसे यश मिळाले नाही असे मला दिड तपानंतरही वाटते. कुठे मुलाखतीला गेल्यावर मला खुप टेंशन येते.भीती वाटते.
आणि मग रिजेक्शन.....
लहानपणी आम्ही नातवंडे जमलो की आजीच्या पोतडीतून एकएक किस्से, गंमतीजमती गाणी आणि छान छान कोडी निघत असत.आजी गेली अन ते सार संपलं,
आज काही काहीच त्यातली कोडी मला आठवताहेत. तुम्हालाही काही माहिती असतील तर मला लिहाल?
एक दोन त्यातली आठवताहेत ती इथे लिहीतेय, उत्तरे सोपी आहेत,पहा!
 १.  कुट कुट काडी पोटात नाडी
     राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी
 २. एवढस कार्टं घर कसं राखतं
 ३. पांढरं पातेल पिवळा भात
     न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ
