भावनिक बुध्दयांक

Submitted by बाटेल बामन on 10 February, 2011 - 13:06

भावनिक बुध्दयांक......
कुठे लिहावे ते समजेना म्हणुन या पानावर देत आहे. अयोग्य असेल तर सांगावे.
.
.
माबोकरांनो मला भावनिक बुध्दयांका(EQ) बद्दल जाणुन घ्यायचे आहे. पेपरमधे व इतर चर्चेत अ‍ॅकेड्मीक हुशारीपेक्षाही EQ ला जास्त महत्व आहे असे वाचण्यात ऐकण्यात आले होते. त्यासाठी मी एक इंग्रजीमधे पुस्तक आणले वाचले पण ते जास्तकाही कळले नाही.

अ‍ॅकेडमिक रेकॉर्ड एकदम एक्सलंट असतानाही मला करिअर मधे पाहीजे तसे यश मिळाले नाही असे मला दिड तपानंतरही वाटते. कुठे मुलाखतीला गेल्यावर मला खुप टेंशन येते.भीती वाटते.
आणि मग रिजेक्शन.....
तसेच मला परिस्थीतीचे योग्य(अचुक) विश्लेषण करता येत नाही. त्यामुळे वस्र्ट कंडीशनमधे मी हमेशा भरडला जातो. नेहमी एका स्वप्नमयी दुनियेत वावरत असतो.

माझा नेहमी भ्रमनिरास होतो.
ह्या वयातही मला मी स्वत:ला उमगला नाही.
हे सर्व का होते आहे?

कदाचित माझ्या स्वतःबद्दल महान कल्पना असल्यामुळे? कारण मी कधीही स्वतःला सर्वसामान्य समजले नाही. पण या व्यवहारीक जगात मला काहीही स्पेशल मिळाले नाही.

तर मला भावनिक बुध्दयांक कसा वाढवावा ही माहिती दिली तर आपला आभारी राहील.
तसेच पर्सनॅलिटी इव्ह्याल्युशन साठी काय करु शकतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे तुम्हाला फक्त मतं मिळतील. मानसोपचार तज्ञांना भेटा. मानसोपचार म्हंटलं ह्याचा अर्थ तुमचं मानसिक संतुलन वगैरे ढळलय असं मी आजिबात म्हणत नाही. तुम्हाला खुप जास्त त्रास होत असेल तर कृपया ही गोष्ट लाईटली घेऊ नका.

वैद्य म्हणतात त्याप्रमाणे तज्ञांचा सल्ला घेणेच योग्य. EQ च नव्हे तर IQ ला पण काही फारसा अर्थ नसतो.
असे म्हंटल्या जाते की IQ tests are best at evaluating how well you are at solving IQ tests.

मंगेश, माझ्या मते तुम्हाला ईक्यू टेस्टींगपेक्षा समुपदेशनाची (कौन्सेलिंग) गरज आहे.
वैद्यबुवांना अनुमोदन.

मला भेटा अथवा लिहा.

नाही नाही, मी समुपदेशनाचे काम करीत नाही. पण माझ्यामुळे बर्‍याच लोकांना फ्रस्ट्रेशनम्धून बाहेर यायला मदत झाली आहे.

कदाचित माझ्याकडे बघितल्यावरच त्यांना स्वतःची अवस्था माझ्यापेक्षा खूप चांगली आहे असं वाटत असेल.

हल्ली माझा मानसोपचारतज्ञ एका चांगल्या सायक्रिअ‍ॅट्रीस्टच्या शोधात आहे. माझ्यासाठी नव्हे तर त्याच्यासाठी.

आता जरा सिरियस नोटवर..... मला संपर्कामधून मेल करा.

ठाणे येथील IPL BY DR. ANAND NADKARNI, येथे फोन करा. तेथेच तुम्हाला योग्य माहिति मिळेल, अन्यथा मला वि.पु. पाठवा.

"नजर आकाशात, पाय जमिनीवर, चित्त सदगुरुंच्या पायाशी"
या त्रीसूत्री चा अवलंब करा, आहे त्या मनस्थितीतून बाहेर याल, शुभेच्छा ! Happy
आणि हो, मी हे फक्त सहानुभूती दर्शवण्यासाठी सांगत नाहिये, मला अनुभव आहे !

मन्गेश, तुमच्या प्रश्नान्मधेच तुम्हीच बरीचशी उत्तरे देऊन टाकली आहेत, आता प्रश्न फक्त उरतो तो इम्प्लोमेन्टेशनचा! Happy
या फेजमधुन जवळपास प्रत्येक व्यक्ती कोणत्यानाकोणत्या वयात जातच अस्ते, फेज कमीकाळ वा दीर्घकाळ कशीही असू शकते.
यातुन बाहेर पडण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे, स्वतः बद्दलच्या कल्पना नीटपणे वस्तुनिष्ठतेवर तपासुन मगच पुन्हा कायम करणे, त्याचबरोबर स्वतःतील तृटी समजुन घेऊन पहिल्यान्दा त्या मान्य (अ‍ॅक्सेप्ट) करणे, व त्यावर न्युनगण्ड न बाळगता सुधरवायला सुरुवात करणे. इथेच ग्यानबाची मेख अस्ते की लोकान्ना हल्ली सगळे कसे इन्स्टन्ट हवे अस्ते, तर असे सुधारणे ही देखिल एक दीर्घकाल चालणारी प्रक्रिया आहे हे मनाला पटवावे.
हे सर्व करत असताना, न्युनगण्डाला थारा देऊ नये.
स्वप्नाळूपणा/आदर्शवाद वाईट नाहीतच, किम्बहुना जीवनाला महत्वपूर्ण आकर्षक आकार देण्याचेच काम ते करत असतात, मात्र त्यान्च्या सपुर्णतया आहारी जाणे अयोग्य.
आयुष्यात "अभिमान" बाळगण्यासारखे काय काय आहे ते शोधा, नसेल तर मिळवा, असेल तर घासुनपुसुन स्मृतिन्मध्ये मान्डा, व त्या अभिमान बाळगण्यासारख्या बाबीन्भोवती आयुष्य वीणा.
माझ्यामते तर, जर माझ्याकडे अभिमान बाळगण्यासारखे काहीच नसेल, तर जीवन नीरस-बेचव-व्यर्थ आहे. अभिमान कशाचाही बाळगू शकता, अभिमान बाळगण्याची प्रत्येक बाब तुम्हास स्वतःसच अवगत असावयास हवी असेही नाही, अन त्यामुळेच सचिन तेन्डुलकरने शतकी विक्रम केले की आमची छाती देखिल एखाद इन्चाने फुगते! भले नसेना का आयुष्यात ब्याट हातात घेतलेली! Happy
जगण्याचे कारण सापडले तर तुम्हास वर पडले तसे प्रश्न पडूच शकत नाहीत, तेव्हा कारण शोधा, व अंमलात आणा! Happy त्यात कधी यश येईल वा अपयश, पण कारणाकरता जगण्याचे समाधानापुढे अपयश म्हणजे किस झाडकी पत्ती अस्ते! Happy

वर लिहीलेले माझ्या अनुभुतीतुन/अनुभवातुन आलेले सार आहे (झक्कीन्च्या लिन्क मधुन ढापले नाहीये Proud मात्र त्या लिन्कचा देखिल अभ्यास करतोय)

झकीकाकु,
धन्यवाद लिंकबद्दल, पण मला इंग्लिश कळत नाही. त्यामुळे वाचली नाही.
तुमचे नाव आवडले मला काकु.

इथे तुम्हाला फक्त मतं मिळतील. मानसोपचार तज्ञांना भेटा >>>
वैद्यबुवा लिहायला चुकलात थोडे. असे हवे होते ते - ------ इथे तुम्हाला फक्त मतं मिळतील. ती एकल्यावर मानसोपचार तज्ञांना भेटायला लागेल

मायबोलीवर येउन तुम्हि रोज पोस्टी टाका. आणी इतरांच्या वाचा म्हणजे मग तुम्हाला जे वाटते आहे की "पर्सनॅलिटी इव्ह्याल्युशन साठी काय करु शकतो." ते आपोआपच निघुन जाइल इथले एकेक नमुने उर्फ दिवे पाहुन

झकीकाकु,>>> कुठे दिसला असा काकू आयडी? नुसता झक्की आयडी आहे. आणि ते काकू नसून काका आहेत. म्हणजे म्हणायचं असेल तर. नुसतं झक्की म्हटलंत तरी त्यांना राग येत नाही.

कुठे दिसला असा काकू आयडी? नुसता झक्की आयडी आहे. आणि ते काकू नसून काका आहेत.>>>>
झक्की नावावरुन मला तसे वाटले. काही हरकत नाही. काका म्हणायला मी मुळीच काकू करणार नाही. Happy

>>>>> इथे तुम्हाला फक्त मतं मिळतील. ती एकल्यावर मानसोपचार तज्ञांना भेटायला लागेल>>>
तो गणू देखिल एक सान्गायचे विसरला...... की लिम्ब्याचे मतं/प्रतिसाद ऑलरेडी आलेलेच आहे, तेव्हा मानसोपचार तज्ञान्ची अपॉईण्टमेण्ट ठरवुन टाकायला आता उशीर नको! Proud

मायबोलीवरचे काही बीबी वरचे प्ररिसाद बघितले तर एकंदरच भावनिक, बौद्दिक, अध्यात्मिक सगळेच अंक समजतील तुम्हाला..

मंगेश,

पुर्वी फक्त आय. क्यु. तपासला जाई व त्या वरुन माणसाची बुध्दीमत्ता मोजली जाई. मी साधरण ८ वर्षांपुर्वी इमोशनल इंटेलिजन्स हे पुस्तक वाचले आणि वाचताना आश्चर्य वाटले की आयुष्यात मिळणार्‍या व्यावसायीक यशाचा जास्त संबंध भावनीक बुध्यांकाशी आहे.

मग या विषयावर वाचन करताना एकुण आठ प्रकाराचे बुध्यांक असतात असे समजले.

लेक्चर न मारता इतकेच म्हणावे लागेल की या विषयावर आपण सखोल वाचन, चिंतन आणि मनन आत्मपरिक्षण केल्यास नक्की समजेल असा हा विषय आहे.

काही वेळा आपले दोष आपण मान्य करत नाही हा मानवी स्वभाव असतो. या करता एक किंवा एका पेक्षा जास्त मेंटर्स असणे जास्त फायद्याचे आहे.

आपण पुण्याचे रहिवासी असल्यास आपल्याशी वैयक्तिक भेटीत बोलायला आवडेल. हा माझा व्यवसाय नाही. मी ही काही काळ या अवस्थेतुन गेल्यामुळे मला सहानभुती आहे.

नितीनजी,
धन्यवाद !
आपल्याला भेटायला मलाही नक्की आवडेल.
Happy

पण माणुस जर जिथका कठोर तिथका त्याचा भावनिक बुध्यांक चांगला अस समजायचं का ?

अनिलजी आपल्यालाही भेटायला आवडेल मला.

आपल्या अवती भवती असणारी माणस म्हणजे आपले जवळचे लांबचे नातेवाईक, मित्र, सहकारी आणि अपरिचीत परंतु संपर्क टाळणे शक्य नसलेली माणस आपल्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहे.

यांच्याशी संवाद साधणे व आपल्याला अपेक्षीत गोष्टी त्यांना करायला प्रोत्साहीत करणे तसेच त्यांना अपेक्षीत असलेल्या गोष्टी आपण करणे ( आपली फालतु प्रिन्सीपल्स बाजुला ठेवुन ) याच कौशल्य म्हणजे भावनीक बुध्यांक म्हणता येईल.

डॅनियल गोलमन याने साधारण २० वर्षांपुर्वी यावर पुस्तक लिहुन एका नविन विषयाला सुरवात केली ( अस माझ मत आहे ) त्याने दिलेले एक उदाहरण मोठे चपखल आहे.

आपण जेव्हा एखाद्याशी संवाद साधतो तेव्हा गृहीत धरतो की आपल्याला मिळणारा प्रतिसाद हा सकारात्मक असायला हवा. जेव्हा असा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही तेव्हा आपल मन खट्टु होत आणि पुनश्च त्या विषयावर त्या व्यक्तीशी संवाद आपण टाळतो. असा प्रतिसाद जेव्हा दहा व्यक्तींकडुन मिळतो तेव्हा बोलायचा तो विषय आपण त्यागतो.

या उलट जर दहा जणांकडुन आपल्याला नुसताच नकारात्मक प्रतिसाद नाही तर निर्भत्सना झाली, हेटाळणी झाली तर अश्या व्यक्तींशी संपर्क आपल्याला नकोसा होतो.

अश्या वेळी याच्या मागे या व्यक्तीने आपल्याला किती चांगला प्रतिसाद दिला होता हे आपण विसरुन त्या एका प्रसंगाच्या कटु आठवणी जपुन पुढे त्या व्यक्तीशी आपण संवाद करायला कचरतो, टाळतो.

ज्याचा भावनीक बुध्यांक चांगला आहे ती व्यक्ती मात्र आपला मुद्दा बरोबर असल्यास पुन्हा पुन्हा वेगळ्या मार्गाने प्रयत्न करुन आपला मुद्दा समोरच्याला पटवुन द्यायचा प्रयत्न करते. त्या व्यक्तीचा स्वभाव तुसडा आहे हे जाणुन त्याला माफ करते. त्याचा अपमान करण्याची संधी शोधत नाही कारण अश्याने ती व्यक्ती कायम तुटण्याचा धोका रहातो.

डॅनियल गोलमन याने अनेक इन्शुरन्स एजंट याचे अवलोकन करुन निर्भत्सना झाली तरी पुन्हा त्या व्यक्तीशी चांगलेच वागुन पुन्हा संधी मिळताच आपला मुद्दा पटविणार्‍या आणि व्यावसायीक रित्या यशस्वी होणार्‍या एजंटचा उल्लेख केला आहे.

अश्या एजंटचा भावनीक बुध्यांक जास्त आहे असे डॅनियल गोलमन म्हणतो. अर्थातच एखादा ग्राह़क जास्त सवलती मागत असल्यास त्याला कठोरपणे पण चांगल्या शब्दात नाकारणे हा सुध्दा भाग आलाच.

परंतु सर्वच वेळेला कठोरपणा आवश्यक नसतो. याउलट घाईघाईने प्रतिसाद देण्याऐवजी विचारकरुन प्रसंगी ती वेळ टाळुन, योग्य शब्दात दिलेला नकार सुध्दा संबंध टिकवुन धरण्यास यशस्वी होतो.

आपण जो नोकरी किंवा व्यवसाय करतो यातले तांत्रिक ज्ञान फक्त ३०% असते असे म्हणले जाते याउलट ७०% ज्ञान मात्र हे तांत्रिक ज्ञान कसे वापरायचे त्याच बरोबर ते ज्ञान समजाउन कसे सांगायचे, ते वापरण्यास लोकांना कसे उद्युक्त करायचे याबाबत असल्यास व्यावसायीक यशस्वीता साधली जाते.

या ध्याग्याच्या सुरवातीला मंगेश म्हणतो यात दीड तपाचे तांत्रिक ज्ञान असुनही ते प्रभावीपणे मांडता येत नाही इतके आत्मपरिक्षण या अभ्यासाच्या सुरवातीला असणे चांगले.

बर्‍याच वेळा आपण योग्य ठिकाणी अर्ज करत नाही. तरीही अर्जाची छाननी नीट न झाल्यामुळे आपल्याला मुलाखतीला बोलावले जाते. मग भलतेच प्रश्न मुलाखतीला घेणारा माणुस मुद्दाम विचारतो असा आपला समज होतो. बर्‍याच वेळा मुलाखत घेणार्‍याची कौशल्ये उत्तम दर्ज्याची नसतात. योग्य उमेदवाराला अचुक उत्तरे देण्यास प्रोत्साहित करणे हे घ्येय बाजुला राहुन मी किती हुशार आहे. मी किती जबाबदारीने काम करतो याचे वर्णन मुलाखत घेणारा करत रहातो. त्याच्या म्हणण्याला हो म्हणणारा त्याच्या दृष्टिने योग्य उमेदवार ठरतो तर त्याच्या वागण्याने विचित्र भाव चेहर्‍यावर आणणारा उमेदवार मात्र अयोग्य ठरतो.

माझ्या मते अनेक कंपन्यात ही पध्दत एक प्रक्रिया म्हणुन केली जाते. त्यातुन होणारी उमेदवारांची निवड ही योग्य असतेच अस नाही.

अश्या अनेक घटना नोकरीच्या निमित्ताने घेणार्‍या मुलखतीत घडु शकतात. आपण मुलाखतीत यशस्वी होवो वा अयशस्वी. मुलाखतीचे मुल्यमापन करण्याची सवय लागण्यास आत्मविश्वास टिकुन रहातो.

सरते शेवटी, भावनीक बुध्यांक काही जणांना उपजत असतो हे खरे पण याचा अर्थ तो वाढवता येत नाही असे नाही. काही प्रमाणात हा बुध्यांक आपण वाढवु शकतो. आपल्यात हा कमी आहे आणि तो वाढायला हवा असा ध्यास घेतला की जगात काहिही अशक्य नाही.

माझा भावनिक (मानसिक) बुध्ध्यांक काढला तर उणे १००० वगैरे येईल.

नेहेमी चुकीचे निर्णय घेणे, घाबरणे, आपले म्हणणे बरोबर असूनहि योग्य रीतीने न मांडता येणे, (चुकीचे शब्द वापरणे, बोलताना आत्मविश्वासाचा अभाव), माणसांशी चांगले संबंध दृढ न करणे, या कारणांमुळे मी मागे राहिलो. हे माझे स्वभावदोष.

शिवाय माझा स्वभाव म्हणजे आज एका प्रकारचे काम, उद्या वेगळ्याच्याच मागे असे. अंगच्या एक दोन चांगल्या गुणांमुळे (थोडी बुद्धी, थोडा उत्साह) अशी कामे जमतहि! मला एकदम तज्ञ म्हणून बरेचदा मान्यता मिळाली आहे. पण मी तिथेच न रहाता, दुसरीकडेच जात असे. हे चांगले का वाईट?

आज विचार केला तर वाटते, मज्जा आली, डोके गंजले नाही, बर्‍याच गोष्टी समजू लागल्या - ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या असे जाणवले, पटले. त्यामुळे उगाच कुठलीहि गोष्ट गंभीरपणे न घेता मज्जेत रहावे - तेंव्हा कदाचित क्लेश झाले असतील, पण आज मात्र अत्यंत समाधानी, आनंदी आयुष्य चालले आहे.

आणि आता कशाहिबद्दल, कुणाहि बद्दल तक्रार नाही - आला क्षण, गेला क्षण!!

नेहेमी चुकीचे निर्णय घेणे, घाबरणे, आपले म्हणणे बरोबर असूनहि योग्य रीतीने न मांडता येणे, (चुकीचे शब्द वापरणे, बोलताना आत्मविश्वासाचा अभाव), माणसांशी चांगले संबंध दृढ न करणे, या कारणांमुळे मी मागे राहिलो. हे माझे स्वभावदोष.

शिवाय माझा स्वभाव म्हणजे आज एका प्रकारचे काम, उद्या वेगळ्याच्याच मागे असे. अंगच्या एक दोन चांगल्या गुणांमुळे (थोडी बुद्धी, थोडा उत्साह) अशी कामे जमतहि! मला एकदम तज्ञ म्हणून बरेचदा मान्यता मिळाली आहे. पण मी तिथेच न रहाता, दुसरीकडेच जात असे. हे चांगले का वाईट?
>>>>>>>>
झक्की हे तुमच्याबद्दल सांगताय का? Uhoh
हे सर्व मलाही तंतोतंत लागू होते.

आपण पुण्याचे रहिवासी असल्यास आपल्याशी वैयक्तिक भेटीत बोलायला आवडेल. हा माझा व्यवसाय नाही. मी ही काही काळ या अवस्थेतुन गेल्यामुळे मला सहानभुती आहे.

>>>>>>>>>>

नितीनचंद्र धन्यवाद

नक्कीच भेटु आपण.

नितीनचंद्र धन्यवाद
मंगेश,
नक्कीच भेटु आपण.
चांगल शिकायला मिळेल मला देखील !
Happy

मंगेशजी,

आपल्या स्वभावाच विश्लेषण अस करता येईल की माणसांशी कसा संवाद साधायचा किंवा आपले कार्य कसे साधायचे हे शास्त्र सोडले तर इतर विषयात आपण पारंगत असाल.

आपण जर अकाउंट्स साईडला असाल तर बघता बघता बॅलन्स शिट टॅली होईल इतर माणसे तोंडात बोट घालतील.

जर आपण इंजिनीयर असाल तर मशीन आपल्याशी संवाद साधेल व तांत्रिक दोष आपण हा हा म्हणता शोधाल.

थोडक्यात ३०% तांत्रीक विषय तुम्हाला अवघड नाही पण त्याजोडीला मानवी स्वभावाचे कंगोरे मात्र समजणे अंमळ जड जाते म्हणुन ७० % काम करताना त्रास होतो.

आपण जर पुणे निवासी नसाल आणि इंग्रजी वाचनाची आवड असेल तर सेव्हन हॅबिटस ऑफ इफेक्टीव्ह पिपल हे स्टिव्हन कोवई यांचे पुस्तक किमान २-४ वेळा वाचा. दुर्दैवाने याचा मराठी अनुवाद माझ्या मते उपलब्ध नाही.

यानंतर डॅनियल गोल्डमन यांचे इमोशन्ल इंटेलिजन्स हे सुध्दा वाचा.

यावर चिंतन, मनन, आत्मपरीक्षण केल्यास सुधारणा नक्कीच दिसतील.