कूटप्रश्न

ती जाते तेंव्हा...

Submitted by मुग्धमानसी on 14 June, 2013 - 03:30

ती जाते तेंव्हा मागे काय रहातं?

ती जाते तेंव्हा... निश्चल होऊन थिजून रहातो चार भिंतींत गुदमरलेला तिचा वावर...
घुसमटलेला... तरिही दरवळणारा... चुरगाळल्यावर सुगंध देणार्‍या बकुळीच्या फुलांसारखा.
दरवाजांच्या, कपाटांच्या मुठींना चिकटून बसलेले तिचे काही ओले-सुके स्पर्श किलकिल्या केविलवाण्या नजरेने तिला शोधत रहातात.
भांड्य़ांना, डब्यांना वाट्या-चमच्यांना मिठी मारुन बसलेला तिचा तिखटामिठाचा आंबटगोड दरवळ... स्वतःलाच हूंगत माग काढत रहातो तिच्या हरवलेल्या अस्तित्वाचा.
उंबर्‍यावरल्या रांगोळीची पांढरी रेघन्-रेघ आतूरल्या नजेरेने तिच्या वाटेकडे पहात रहाते... तुळस भरल्या घरी मावळून जाते...

लंडनचे भिकारी आणि स्लमडॉग मिलेनिअर

Submitted by अंड्या on 2 June, 2013 - 04:41

आता जब तक है जान बघतोय.. लंडनचे चकचकीत पॉश रस्ते आणि त्यावर गिटार वाजवत गाणे म्हणत पैसे गोळा करणारा शाहरुख.. येणारी जाणारी पब्लिक निव्वळ त्याला पैसेच देत नव्हती तर टाळ्या वगैरे ही देत होती.. मागेही शाहरुखच्या एका चित्रपटात असाच सीन होता, फरक इतकाच की त्यावेळी तो गाणार्‍या भिकार्‍याला टाळी देऊन पुढे गेला.. या उलट आपल्या कडे ट्रेनमधील गाणारे भिकारी निव्वळ इरिटेट करतात, अन पैसे मागायला पायाला येऊन हात लावतात तेव्हा कसली किळस वाटते म्हणून सांगू..

या भांडायला.....

Submitted by मी मधुरा on 4 May, 2013 - 05:08

स्ट्रेस रिलीज करण्याचा मार्ग.....
खरतर अत्यंत मस्त मार्ग....
भांडणे...
खटकत त्या गोष्टींवर..

मग चला, वाद घालूया...
या धाग्यावर.....कुठल्याही विषयावर....मनसोक्त!

{ सूचना:
१. या धाग्यावरची भांडणे हि व्यक्तिगतरित्या घेऊ नयेत.
२. हा फक्त मन मोकळ करण्याचा मार्ग असून कोणाचा अपमान करण्याचा हेतू नसल्याने शिव्यांचा वापर करू नये.
३. येथील भांडणे लटकी समजली जावीत.
(गामा_पैलवान यांनी सुचवल्या प्रमाणे.....) }

हिंदी शब्दकोडं - प्राणी आणि पक्षी

Submitted by मामी on 28 April, 2013 - 13:44

साहित्य : कर्तव्याची जाणीव (१ किलो), चिकाटी (५ किलो), भरपूर वेळ (काढता येईल तितका), होडी आणि वल्ही (मी दोन वल्ही वापरलीयेत.)

सध्या आमच्याकडे पाचवीचा अभ्यास सुरू झाला आहे. गृहकार्यात हिंदी टीचरनं प्राणी आणि पक्ष्यांची हिंदी नावं गुंफून एक शब्दकोडं बनवायला सांगितलं होतं.

प्रखर उजेड देणारा दिवा

Submitted by गजानन on 13 April, 2013 - 14:40

समजा, दोन काचेचे कंदिल आहेत. त्यातल्या एकाची काच काजळीने पूर्ण माखली आहे. (एकही प्रकाशकण बाहेर येऊ शकणार नाही असा) अगदी जाड थर. नंतर समोरून दिसेल असा एक लहान गोल आतून कोरून त्या गोलातली काजळी काळजीपूर्वक स्वच्छ केली आहे.

दुसर्‍या कंदिलाच्या काचेला याचप्रकारे (एक लहानसा गोल वगळता) पण चकचकीत मुलामा दिला आहे. आता दोन्ही कंदिल (सारख्याच एककाचा प्रकाश देणार्‍या वातीने) प्रज्ज्वलीत केले. दोन्हींपैकी कोणत्या कंदिलाच्या गोलातून बाहेर पडणारा प्रकाश जास्त प्रखर असेल? का?

पुण्यात पुकारलेला बंद!

Submitted by मी मधुरा on 6 April, 2013 - 10:43

१ तारखेपासून पुण्यात बंद पुकारण्यात आला आहे. हे नुसते एल.बी.टी. विरोधात नाही, तर व्यापाऱ्यांना हे दाखवून द्यायचे आहे कि सर्वसामान्य माणूस त्या लोकांवर अवलंबून आहे. हि कुटनीती आहे, असे माझे मत आहे.

प्रांत/गाव: 

१ फेब्रुवारीपासून गुलमोहरात झालेले बदल

Submitted by बेफ़िकीर on 15 January, 2013 - 14:47

दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेरापासून गुलमोहर लेखनात बदल करण्यात येत आहेत.

लेखक, कवी, मधले, पलीकडचे, रसिक, कळप, छायाचित्रकार, पाककृतीकार, मुलाखतकार व खालील सदस्यः

आंबा (या दोन अक्षरांपुढील आकडा कारवाई केलेल्या आकड्याच्या पुढचा धरावा)

गाय वासरू छाप गोमुत्र

भारतीय

डँबिस (भारतीय व डँबिस हे दोन भिन्न सदस्य असून भारतीय हे डँबिसचे विशेषण मानले जाऊ नये)

गा मा (हे हवे ते बोलून 'आपले नम्र' असतात अश्या तक्रारी आलेल्या आहेत)

देवपूरकर

या सर्वांनी या बदलांची नोंद घ्यावी.

==========================

'पुणे ५२' - चित्रबोध शब्दशोध स्पर्धा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 8 January, 2013 - 00:27

'विश्व नेमकं कसं निर्माण झालं?', 'विश्वात आपण एकटेच आहोत का?'पासून अगदी, 'खून झाला तेव्हा घरात कुणीच नव्हतं, मुख्य दार आतून बंद आहे. एसी चालू असल्याने खिडकीही बंद आहे. मग खून केला कुणी आणि कसा?', '...एका दारावरचा पहारेकरी नेहमी खरं बोलतो आणि एका दारावरचा नेहमी खोटं. केवळ एकच प्रश्न विचारून तुम्ही योग्य दार कसं शोधाल?' अशी माणसाला पडणारी असंख्य कोडी, अनेक रंजक प्रश्न. आणि त्या कोड्यांची बरोबर उत्तरं गवसली की मिळणारा आनंद.

तिच्या घुसमटीवर उत्तर काय ?

Submitted by सखी अबोली on 5 November, 2012 - 06:51

हा विषय थोडा बोल्ड वाटला नेहमीच्या आयडीने मांडण्यासाठी. खरच का बरं मोकळेपणे लिहीता येऊ नये ? असा विषय समजण्यासाठी खरं तर स्त्रीच असावं लागतं. पुरुष कदाचित साजून घेऊ शकेल पण समजू शकेलच असं नाही.

नुकत्याच निधन पावलेल्या एका सुपरस्टारबद्दल चर्चा चालली होती. तेव्हा ऑफीसातल्या एका तथाकथित आगाऊ सहका-याने त्याच्या अभिनेत्री पत्नीबद्दल नको त्या कमेण्टस पास केल्या. डबे खाताना आमची त्याबद्दल चर्चा झाली. त्या अभिनेत्रीचीची जखम कुणाला दिसते का ? तिचं सेक्सी असणं / दिसणं इतकंच पुरुषांसाठी बस होतं. तिचे कुणाबरोबर काय संबंध होते आणि त्यामुळं तो कसा निराश झाला, दारू पिऊ लागला वगैरे.

क्लूलेस - ८

Submitted by गजानन on 26 October, 2012 - 13:21

क्लूलेस - ८ च्या चर्चेसाठी हा धागा.

खालील दुव्यावरून या खेळाला सुरुवात करता येईल.

http://ahvan.in/ahvan/ahvan12/klueless8/specter/justclicktogo.asp

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कूटप्रश्न