वाघ आणि सिंह : बिग फाईट

Submitted by सांजसंध्या on 10 April, 2011 - 12:32

समजा वाघ आणि सिंह यांची लढाई झाली तर कोण जिंकेल ?
का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

कोल्हा !
दोघ भांडुन मरतील, लबाड कोल्हा राजा होईल.
बायदवे तुमचे डोळे खुप सुंदर आहेत. ( ही काँप्लिमेंट आहे)

Mr. GANU......jinkel......tyache pratisad vaachun...vaagh..sinh dokyala haat laun parat jaatil

बुकीकडून ज्याला पैसे मिळणार नाहीत तो.. Proud

बायदवे - शोले पिक्चर मधे "तुम्हारी आँखें बहोत सुंदर हैं, बसंती" असा डायलॉग आहे का कुठे? एकदम शूटिंगची आठवण झाली.. Biggrin

शोले | 10 April, 2011 - 13:27 नवीन

बायदवे तुमचे डोळे खुप सुंदर आहेत. ( ही काँप्लिमेंट आहे)

>>>>> Rofl The worst flirting i had ever seen Rofl

समजा वाघ आणि सिंह यांची लढाई झाली तर कोण जिंकेल ?

>>> यात काही पीजे असणार नाही असं गृहीत धरत आहे .

लढाई कुठं होतेय अन कोण कोणत्या स्पेसीज चे आहे यावर बरेच काही अवलंबुन आहे .

पण नॉरमल केस मधे वाघ जिंकेल संदर्भः http://indrajit.wordpress.com/2006/03/11/lion-vs-tiger-clash-of-the-titans/

सध्या मायबोलीवर एवढ्या फाईटस चालू असताना वाघ सिंहची लुटुपुटूची लढाई कोणाला हवीय... Proud

( ही काँप्लिमेंट आहे) >> ही स्टाईल आवडली.. Rofl

सोप्पय . वाघ जिंकणार.

कारण, वाघ आपल्या बायकोला भाव देत नाही, आणि सिंह बायकोच्या इशार्‍यावर नाचतो Wink

गिरीजा वाघ जिंकणे शक्य नाही..कारण सिंहाला भरगच्च आयाळ असते आणि सर्वसामान्यपणे मांसाहारी प्राणी शिकार करताना मानेभोवती दात रोवून मारण्याचा प्रयत्न करतात. वाघ तर भक्ष्याची मान मोडतोच. पण या दोन्ही गोष्टी त्याला सिंहाच्या बाबतीत शक्य होणार नाहीत. गांभिर्याने सांगायचे झाले तर ही गोष्ट होणार नाही कधीच पण अगदीच त्यांना चिथवून दिले तर (काही माबोकर त्यात अत्यंत प्रविण आहेत असे समजते) तर दोघेही प्राणांतिक जखमा होऊन मृत्यू पावतील.

पवार साहेब.
मॅच त्यांनीच अ‍ॅरेंज केली असेल नव्हे? Light 1

>डोळे सुंदर
Lol बेस्ट फ्लर्ट अ‍ॅवॉर्ड गोज टु.

महाग्रुंचे शंभर रुपये नाहीतर ग्रँड सॅलुट मिळेल तो जिंकण्याची शक्यता जास्त. शेवटी काही झाले तरी बारमतीकर निकाल फिरवु शकतात असे ऐकिवात आहे

शिवसेना आणि MGM भांडण्याकरता तरी कशाला एकत्र येतील? Happy असो.

जंगलात समजा खरंच वाघ-सिंहात लढाई झाली तर हरीण वगैरे प्राणी जिंकतील. कारण त्यांना खाणारे एक तोंड कमी होईल. Happy

असे ऐकले होते की एका राजाने खरोखरच वाघ व सिंह यांना समोरासमोर आणून त्यांच्यात युद्ध होते का हे पाहिले.

अनुभव असा की सिंहाकडे नुसते पाहूनच वाघ थरथर कापून निघून गेला. याचे कारण सिंहाच्या नजरेत अत्यंत बेदरकार व हिंसक झलक असते असे काही जण म्हणतात.

पुण्यातील पेशवे पार्कमध्ये एकदा चुकून एक सिंह पिंजर्‍यातून सुटून बाहेर आला. आल्यावर त्याने तळ्यात एक डुबकी घेतली. पब्लिकची धावाधाव झाली. तळ्यातूनच सिंहाने गर्जना केली. ती गर्जना ऐकून माकड, हरीण वगैरे प्राण्यांचे सोडाच, पण पिंजर्‍यातील वाघ थरथरा कापत होते अशी बातमी केसरीत आलेली होती.

याचमुळे बहुधा सिंह जंगलचा राजा मानला जात असावा.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफिकीर

छान सुरूवात ..

यू ट्यूब वर लायन वर्सेस टायगर असा सर्च देऊन पहा. मध्यंतरी डिस्कवरी वर गेंडा वि हत्ती, पाणघोडा वि. आणखी कोण अशा फाईटस दाखवल्या जायच्या. त्यातच सिंह वाघ अशी फाईट दाखवलेली. त्यात सिंह जिंकेल असं दाखवलंय. नेटवरच्या एका व्हिडिओत देखील सिंह जिंकताना दाखवला आहे. पण पूर्ण वाढ झालेला बंगाल टायगर हे शिकारी प्राण्यांतलं सर्वात शक्तिशाली आणि धूर्त जनावर आहे. कॅट फॅमिली असल्याने लवचिकता आणि चपळता अंमळ जास्तच. ब-याचशा व्हिडिओत सिंह पळून जातांना दाखवले आहेत. एका व्हिडिओत तर सिंहाच्या कबिल्यात शिरून वाघाने त्यांना हुसकावून लावल्याचं दिसतंय..

नेटवर बरीच माहीती आहे..

आणखी एक

जंगलात जर फाईट झाली तर गवताचा फायदा घेण्यात वाघासारखं तरबेज जनावर नाही. बिबळ्या वाघ हा ढाण्या वाघापेक्षा निम्माच असेल.. पण गावात शिरला कि घरमालकाच्या बाजेखालचं कुत्र अलगद काढून नेऊन त्याचा पडशा पाडतो तरी त्या मालकाला पत्ताही लागत नाही. कुत्र्याला तर भुंकायलाही वेळ मिळत नाही. इतक्या सावध आणि कॅल्क्युलेटेड हालचाली मार्जार कुळातल्या प्राण्यांनाच शक्य असतात. सिंहाचं शरीर थोडंस वेगळं आहे. आपल्यापेक्षा शक्तिशाली जनावर असल्यास सिंह खाली लोळण घेऊन पुन्हा उसळी मारण्याचे डावपेच आखतो. पण त्याने लोळण घेतली असतानाच वाघाने त्याचा गळा धरल्यास हा डाव अंगाशी येऊ शकतो..

ईथले प्रतिसाद वाचुन वाघ आणि सिंह दोन्हीही पुन्हा पुन्हा आत्महत्या करतील ( सरकार मधल्या डॉयलॉग सारखं - 'तु मरा तो भी सरकार तुझे जिंदा करके वापिस मारेगा ' स्टाईल)

आणि मग ह्या दोघांना लढवणारे आत्महत्या करतील आणि मग अश्या बातम्या वाचणारे आत्महत्या करतील आणि मग ................

बायदवे तुमचे डोळे खुप सुंदर आहेत. ( ही काँप्लिमेंट आहे)>>> हे वाचून किती जण सांजसंध्याची विपू बघायला पळाले? खरं सांगा... Proud

वाघ आणि सिंहाच्या लढाईत त्यांच्यापैकी कुणीही जिंकणार नाही... कारण दोघेही तितकेच ताकदवान आहेत...

मला वाटले काहीतरी खेळ असेल म्हणून लंचब्रेकमधे उघडले तर हे भलतेच निघाले Uhoh
ठमे मी तुझा प्रतिसाद पाहुन संध्याचा फोटु बघितला Happy आधी लक्षातच आले नाही Uhoh

वाघ आणी सिंहाची जर खरेच लढाई झाली तर त्यात सिंह जिंकेल... पुर्वी राजे महाराजे यांच्या मनोरंजनासाठी साठमारी नावाचा एक खेळ होत असे. त्यात दोन हत्ती, किंवा वाघ सिंह अस्वल वगैरेंच्यात मोकळ्या मैदानात लढाई होत असे... नॅशनल जिऑग्राफीक वर जंगलात झालेली खरी खुरी लढाई दाखवतात पण त्यात ती प्राणांतीक वगैरे होत नाही.. वाघाने केलेली शिकार सिंह आक्रमण करुन ताब्यात घेतो आणी वाघ पळुन जातो... Happy त्यांचे वजन त्यांची शिकारीची आयुधे आणी ताकद याचे मॉडेल करुन अभासकानी त्यांची आभासी लढाई करुन पाहीली त्यात सिंहच वरचढ ठरला...
अर्थात प्रत्येक वन्य प्राणीमात्रात लढाईची आणी स्वसंरक्षणाची एक कला उपजत असते आणी अनुभवाने ती समृद्ध होत असते... त्यामुळे अश्या लढाईत हे मुद्दे सुद्दा महत्वाचे ठरतात...
बायदवे तुमचे डोळे खुप सुंदर आहेत.>>>> मि नक्की मायबोलीवरच आहे ना?? Lol

कधीपासून वाचतोय, वाघ कॅट फॅमिलीतला आहे, मार्जार कुळातला आहे. सिंह काय माकडापासून बनलाय कॉय ?

पवार साहेब.
मॅच त्यांनीच अ‍ॅरेंज केली असेल नव्हे >>> Proud

बायदवे तुमचे डोळे खुप सुंदर आहेत.>>
तुम्हारे पांव बहोत हसीन है - डायलोग आठवला!

सांजसंध्या निशब्द आहे सध्या.. Rofl

आणि आमट्या.. माकडाच्या कुळातला प्राणी विषाणूबरोबरची लढाई हरतोच आहे की!

वाघ - सिंहात .. "सिंह".. ! (राशीचा अभिमान, दुसरे काही नाही :खोखो:)

पवार साहेब. >> Biggrin Proud

रच्याकने, मिथुनने गुंडा पिक्चरम्ध्ये बंगाली वाघाला हरवलय काहीही हत्यार (बंदुक, चाकु) न वापरता...तसच चिता का आणि कोणत्यातरी पटात सिंहालापण लोळवलय.

कधीपासून वाचतोय, वाघ कॅट फॅमिलीतला आहे, मार्जार कुळातला आहे. सिंह काय माकडापासून बनलाय कॉय ?

बागडबमबम बम बागडबमबम बम बाजे घुंगरू..

http://www.rblewis.net/technology/EDU506/WebQuests/lionvscat/lionvscat.html

हे घ्या.. वाचा !!

( मांजर जर वाघाची मावशी तर सिंह काय सावत्र नवरा ?

Is lian a cat ?,

Lion, also known as the domestic cat or house cat to distinguish it from other felines, a small carnivorous species of nocturnal mammal that is often valued by humans for its companionship and its ability to hunt vermin

Pages