आटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे

Submitted by जागोमोहनप्यारे on 28 July, 2011 - 23:27

आटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे

आटपाट नगरातील ही सत्यकहाणी.

गावातील कोर्टात एक जज मॅडम होत्या. त्यांचा नवरा गेल्यामुळे त्या एकट्याच होत्या. साधारण ४० एक वय असावं.

कोर्टाशेजारीच पोलिस स्टेशनची इमारत. तिथल्या चुलबुल पाम्डेवर त्यांचं मन फिदा झालं आणि त्या दोघानी लग्न केलं.

लग्न केलं आणि गोंधळ झाला. कारण चुलबुल आधी विवाहीत असून दोन मुलांचा बाप आहे. त्याचं म्हणणं, मी दोन्ही बायकाना व्यवस्थीत करीन.

आणखी एक तिढा. बाई मुसलमान, तर बुवा हिंदु. बाईनी हिंदु धर्मानुसार कुंकू बांगड्या वापरायला सुरुवात केली.

गावचे बार असोसिएशन खवळले. त्यानी बाईंवर बहिष्कार घातला आणि कोर्टाचं कामकाज बंद केलं. त्यांचं म्हणणं, दुसरे लग्न बेकायदेशीर आहे, हे माहीत असूनही जजबाईनी विवाहिताशी लग्न केले, आता त्याना न्यायदान करायचा नैतिक अधिकार नाही..

पण मग असे असेल, तर बाईवर बहिष्कार कसा? चुलबुल पांडेवर मात्र कोणताच बहिष्कार नाही.

गाव मात्र सारी कहाणी बघत बसले आहे.

यात नेमके दोषी कोण?
१. बाई-- हे लग्न करायला नको होते. आणि धर्म बदलायला नको होता.
२. बुवा-- निदान धर्म तरी बदलायचा, म्हणजे दुसरा विवाहही चालला असता.
३. बार कौन्सिल-- खाजगी गोष्टीचे भाम्डवल करुन फक्त स्त्रीवर बहिष्कार टाकायला नको होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

३. बार कौन्सिल-- खाजगी गोष्टीचे भाम्डवल करुन फक्त स्त्रीवर बहिष्कार टाकायला नको होता.

अच्छा, म्हणजे तीन पर्याय दिले आहेत त्यातलाच एक निवडायचा का? मला तर तीनपेक्षा वेगळंच म्हणायचं आहे.

बाई - नीट चौकशी केल्याशिवाय लग्न करायचे नव्हते. आणि त्याच्या लग्नाबद्द्ल माहित असुन जर चुलबुलशी लग्न केलं असेल तर तीचीच चुक. she deserves the punishment.

बुवा - एक लग्न झालं असताना आणि मुलबाळं असताना, फसवुन दुसरं लग्न केलं त्यामुळे चांगले फटके द्यायला हवेत. दुसर्‍या लग्नासाठी धर्म बदलत असेल तर फारच निर्लज्जपणा. मग तर... काय बरं? सरळ पहिली आणि दुसरीने असल्या माणसाला disown करायचं.

बार कौन्सिल - खाजगी गोष्टीचे भाम्डवल करुन फक्त स्त्रीवर बहिष्कार टाकायला नको होता.>> हे म्हणणंच चूक आहे. 'बाकौ' ने बरोबरच केले. जी जज बाई न्याय देणार तीच जर कायदा पाळत नसेल तर ती का आणि कसा न्याय देणार दुसर्‍याला? 'बाकौ' ला बुवाशी देणंघेणं नाही. तो सामान्य माणुस आहे. त्याच्यावर पोलिस कारवाई करु शकतात. 'बाकौ' नाही.

कदाचित मला म्हणायचं आहे ते नीट मांडता आलेलं नाही. मला जामोंनी दिलेले तीनही पर्याय पटले नाहीत एवढं नक्की.

बुवाचे लग्न झाले आहे ही गोष्ट दोघानाही माहीत होती.. 'त्या' फसवणुकीचा इथे मुद्दाआनाही. मुद्दा आहे, शिक्षा फक्त बाईला का? बुवाना का नाही? ते पर्याय फक्त नमुना म्हणून आहेत. अजुन कुणी दोषी एखाद्याला वातत असेल ( उदा पोलिस स्टेशन व कोर्ट शेजारी शेजारी बांधनारा वगैरे) तर ते स्वातंत्र जो तो प्रतिसाददाता घेऊ शकतो