हिरा कसा पाठवाल ?

Submitted by चीकू on 12 October, 2011 - 10:27

राम आणि श्याम दोन वेगवेगळ्या शहरांमधे राहात आहेत. रामकडे एक हिरा आहे जो त्याला श्यामला पाठवायचा आहे. काही कारणामुळे तो स्वतः श्यामच्या घरी जाऊ शकत नाही आणि श्यामही त्याच्या घरी हिरा न्यायला येऊ शकत नाही. हिरा पोस्टाने पाठवणे हा एकच मार्ग आहे. पण त्या देशातले पोस्ट खाते एकदम चोर आहे. ते प्रत्येक पार्सल उघडून त्यातील गोष्टी चोरतात. पण समजा वस्तू पेटीत ठेवून कुलूप लावले असल्यास ते उघडण्याच्या फंदात पडत नाहीत. राम आणि श्याम दोघांकडे भरपूर पेट्या आणि अनेक वेगवेगळ्या आकारांची पेटीच्या कडीत अडकवता येतील अशी कुलपे आहेत. प्रत्येक कुलपाला एकच त्याची त्याची वेगळी किल्ली आहे. तर याचा उपयोग करून राम श्यामला हिरा कसा पाठवेल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रामने हिरा पेटीत बंद करून त्याला कुलूप लावून श्यामकडे पाठवावा. या कुलुपाची चावी रामकडेच असेल. श्याम त्याच पेटीला स्वतःचे कुलूप लावून चावी स्वतःकडेच ठेवेल आणि ती पेटी दोन कुलुपांसकट श्यामकडे पाठवून देईल. श्याम स्वत:चे कुलुप काढून घेईल आणि पेटी पुन्हा रामकडे पाठवेल.

एवढे कशाला, जर पोस्ट खाते चावी पण चोरणार असेल तर
दुसर्या एन्व्हलप मधुन चावी पाठवुच नये, श्यामला कुलुप तोडायला सांगावे.
आता जर तुम्ही म्हणाल की श्यामला कुलुप तोडता येइल हे ग्रुहितक आहे
तर एका पेटीला २ कुलुपे लावता येतिल हे जास्त मोठे ग्रुहितक आहे कारण बर्याच पेट्यान्च्या हुक मध्ये
एक कुलुप जातानाच मारामारी असते (अनुभवावरुन).

हो एकाच टपालातून पेटी आणि चाव्या पाठवल्या की पोस्ट खात्याचे फावलेच की..त्यापेक्षा निलीमा म्हणातात तसे चावी वेगळी पाठवावी कारण नुसती पेटी किंवा नुसती चावी चोरून काहीच उपयोग होणार नाही पोस्टाचा

सॉरी आनंदयात्री
तुम्ही चांगले उत्तर लिहिले, बॅन्किन्ग लॉकरवर आधारित. प्रश्नामध्ये या कन्डिशन्स दिल्या नव्हत्या म्हणुन काही इतर उपाय Happy

जागोमोहनप्यारे | 12 October, 2011 - 07:59 नवीन
त्यांच्याकडे भरपूर पेट्या व कुलुपे आहेत.. त्यामुळे अशी पेटी मिळू शकेल.
>>
हो जामोप्या पण भरपुर कुल्पे आहेत तर ८ नम्बरच्या कॉम्बिनेशनचे कुलुप पण मिळउ शकेल आणि कॉम्बिनेशन फोनवरुन सांगता येइल नाही काय?

राम आणि श्यामला एकमेकांकडे जाता येत नसेल पण दुसरी कोणी विश्वासू व्यक्ती असेलच त्यांच्याबरोबर पाठवावा. पोस्टाची भानगडच नको!

आनंदयात्री...उत्तर बरोबर आहे Happy

निलिमा - किल्ली वेगळी पाठवली तरी पोस्ट खाते ती चोरेल. इथे पेटीचे कुलूप श्यामने तोडायचे नाही/ ती कुलपे तोडता येत नाही हे ग्रुहीत धरले आहे. सुरवातीला तसा खुलासा न केल्याबद्दल क्षमस्व.

ते आनंदयात्री यांचे उत्तर नक्की काय आहे तेच कळत नाहीये, खुप कन्फ्युजिन्ग वाटते आहे. Sad
बाकी सगळे ते बरोबर आहे म्हणत आहेत, नक्की कळाले आहे का कोणाला ? Uhoh

महेश, रामने श्यामला कुलूपबंद पेटी पाठवली.
श्यामने त्या पेटीचे कुलूप न उघडता तिला स्वतःचे कुलूप लावले, चावी स्वतःकडे ठेवली आणि पेटी परत रामकडे पाठवून दिली.
रामने स्वतःकडची चावी वापरून स्वतःचं कुलूप काढून घेतलं आणि पेटी परत श्यामकडे पाठवून दिली.

अहो त्यांची नावे लिहिण्यात गडबड झाली आहे निट बघा.
>>श्याम त्याच पेटीला स्वतःचे कुलूप लावून चावी स्वतःकडेच ठेवेल आणि ती पेटी दोन कुलुपांसकट श्यामकडे पाठवून देईल. श्याम स्वत:चे कुलुप काढून घेईल आणि पेटी पुन्हा रामकडे पाठवेल.

श्याम पेटी श्यामकडे पाठवून देईल येथपासुन क्रम चुकला आहे त्यामुळे मला आधी कळाले नाही.

श्यामने त्या पेटीचे कुलूप न उघडता तिला स्वतःचे कुलूप लावले, चावी स्वतःकडे ठेवली आणि पेटी परत रामकडे पाठवून दिली.
रामने स्वतःकडची चावी वापरून स्वतःचं कुलूप काढून घेतलं आणि पेटी परत श्यामकडे पाठवून दिली.>>> कुलूप चाव्याचं समजलं. हिरा कसा पाठवला Proud

prafullashimpi | 13 October, 2011 - 04:16 नवीन
सर्वोत्क्रुष्ट प्रतिसाद

अरे त्या पोस्ट खात्याला, बांबुचे फटके मारा, साल्यांना XXXXX चो-या करतात ते

>>> बरोबर नुसती चावी पण चोरतात म्हणजे कमालेय.

Pages