गुलाम अली

गुलाम अली फॅन क्लब

Submitted by विहम on 21 August, 2016 - 03:13

गुलाम अली

गुलाम अली या नावाने सुरु केलेल्या धाग्याला प्रस्तावनेची गरजच नाही. :-) 

गुलाम अली यांनी गायलेल्या गझला आणि त्याचा संग्रह माबो वर सापडला नाही. सगळ्या गझला आणि त्यांच्या लिंक एका जागी असल्यास शोधायला आणि ऐकायला बरे पडते. शिवाय आपल्याला कधी कधी त्यांच्या सर्वच गझला माहित नसतात, त्या माहित व्हाव्या म्हणून हा धागा.

माझी गुलाम अली प्लेलिस्ट :-

१. चुपके चुपके

२.  आवारगी

३. हम को किस के गम ने मारा

४. दिलमें ईक लहर सी उठी है अभी

५. अपनी धुन में रहता हूँ

६.  रास्ते याद नहीं

७. हम तेरे शहर में आए है

८. इतनी मुद्दत बाद मिले हो

विषय: 
शब्दखुणा: 

फासले ऐसे भी होंगे

Submitted by अमेलिया on 1 December, 2012 - 23:33

वेळ रात्रीची . जेव्हा सगळं जग निद्रेच्या उंबरठ्यावर डोलत असतं तेव्हाची असावी बहुतेक. दिवसभर सिलिकॉन व्हँलीच्या वाटा तुडवून आम्ही आमच्या पार्किंग लॉटमध्ये शिरत असतो. बाहेरच्या थंड हवेच्या अस्तरात लपेटलेली रात्र हलकेच चढत असते. इतक्यात गुलाम अलींच्या मधाळ स्वरात पुढची गझल सुरु होते. त्या सुरांचा अंमल हलके हलके चांदण्याबरोबर पसरू लागतो. अनेक वार ऐकूनही पुन्हा एकदा भोवतालच्या जगाचं भान हरपतं आणि एक अनोखी दुनिया जागी होऊ लागते ...
' फ़ासले ऐसेभी होंगे यह कभी सोचा न था ।
सामने बैठा था मेरे और वोह मेरा न था.....।'

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गुलाम अली