एकवीस दिवस राहिले का जगबुडीला ?

Submitted by किंकर on 1 December, 2012 - 21:48

आज एक डिसेंबर .आणखी एक महिना संपला आणि नवीन सुरु झाला. तसा सगळा नेहमीचाच खेळ. अगदी लाडक्या किशोरकुमारचे ते रेडिओ सिलोनने अजरामर केलेले गाणे 'खुश है जमाना आज पहिली तारीख है' प्रथम गुणगुणून मग ऐकून झाले. बघता बघता शेवटचा महिना आला देखील असे स्वतः ला बजावून झाले. आता आज काहीतरी कागदावर उतरवावे म्हणजे मग मनास थोडे बरे वाटेल असा स्वसंवाद झाला.
पण आज काहीतरी चित्ररुपात मांडावे म्हणून रंग ब्रश कॅनव्हास उलगडून बसावे आणि मनातील कल्पनाच धूसर व्हावी तसेच काहीसे झाले.विचार चक्राची मालिका दृष्यमान न होताच वेगाने उलगडत जाणाऱ्या चित्रफीती प्रमाणे सरकत गेली.आणि मग आठवण झाली एकवीस डिसेंबरची. अरे खरच एकवीस दिवस राहिले का जगबुडीला ? असा प्रश्नही डोळ्या समोर आला.आंतरजालावर एक फेरफटका मारून एकवीस डिसेंबर बाबत काय चाललेय ते पाहावे म्हणून चक्कर टाकली तर एकूण सगळे पाहून चक्करच आली, कारण राहिलेल्या एकवीस दिवसात वाचून, विचार करून,काही ठरवणे केवळ अशक्य होते.
अर्थात या येवू घातलेल्या जगबुडीचा फायदा घेत काहीजणांनी केलेला धंदा मात्र खरोखर जगाला बुडवेल असा वाटला. खरोखर काही दुर्दैवी घडणार असेल तर या व्यवसायातून मिळवलेला फायदा उपभोगायला ते संधी साधू तरी वाचतील का ? पण तरीही मृत्युच्या भीतीपोटी आपण धावाधाव करणार हेच खरे. संपूर्ण पृथ्वीतलावर तुकड्यां मध्ये विखरून पडणारी 'अंतरीक्ष प्रयोगशाळा' (sky lab)असो किंवा स्वाइन फ्लू सारखी साथ असो आपली धावपळ सुरूच राहते.
मग माझे मलाच जाणवले कि आपण कसे जगावे ? कशात आनंद घ्यावा ? आपल्या उदासीनतेची करणे काय ? या स्वतःच सोडवायच्या प्रश्नांची उकल आपण स्वतः न करता दुसऱ्यावर त्याची जबाबदारी ढकलली कि त्यातून जगबुडीची भीती घालत आपल्याला बुडवणारे धंदे करणाऱ्या मंडळीचे फावणारच. दुसरे काय ?
मायन संस्कृती द्वारे तयार झालेली दिनदर्शिका २१.१२ .२०१२ ला संपत आहे म्हणजेच त्या दिवशी जग संपत आहे असे नक्कीच नाही. आपले गणिती ज्ञान पणास लावून ती दिन दर्शिका बनवणाऱ्या त्या गणित तज्ञाची किंमत त्या काळातील पुढारी लोकांनी न ठेवल्यानेच ( अर्थात संस्कृती कोणतीही असो किंवा कितीही जुनी असो, पुढारी सगळीकडे सारखेच हे त्या गणित तज्ञाला न सुटलेले कोडे असेल ) त्याने ते दिन दर्शिकेचे काम थांबविले असेल असे मला नेहमी वाटते.
म्हणजेच पुढील कित्येक शतके उपयुक्त ठरणारी दिन दर्शिका बनवून देखील, त्या कामाचा उचित सन्मान होत नाही हे जेंव्हा त्या दिन दर्शिका कर्त्याच्या लक्षात आले, तेंव्हाच त्याच्या दृष्टीने जगबुडी झाली होती, त्याने काम थांबवले तो संपला त्याबरोबरच त्याचे साठी जगच संपले हेच खरे.थोडक्यात काय तर मायन संस्कृतीत दिन दर्शिकेचे काम २१.१२.२०१२ पर्यंत येवून थांबले, जग नाही थांबले, हे जग या विश्वाच्या अफाट पसाऱ्याचा भाग म्हणून अव्याहतपणे, अनंत काळ पर्यंत टिकून राहणार आहे, फक्त तुमचे किंवा तुमच्या जगण्याचे प्रयोजन संपले कि ती तुमची खरी जगबुडी आहे हे मात्र तुम्ही अगदी २१.१२.२०१२ पर्यंत नव्हे तर नेहमीच लक्षात ठेवा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माचुपिचुच्या देवा याला माफ कर. हरणाचा नैवेद्य घे, अन २१ तारखेला जग बुडव. पण मला वाचव Wink
-तो वानर युद्ध करतो Wink
असंबद्ध गप्पाच्या बाफ वरून डायरेक्ट इथे आलेला )इब्लिस(

अगदी लाडक्या किशोरकुमारचे ते रेडिओ सिलोनने अजरामर केलेले गाणे 'खुश है जमाना आज पहिली तारीख है'
>>>>>>>>>>>>>
हायला...हे गाणे किशोरकुमारचे होते.... मला वाटायचे ते जाहिरातीत लागायचे त्यांचेच ओरिजिनल आहे.. Sad

जगण्याचं प्रयोजन संपलं असं ठामपणे कधी साम्गता येतं का हो सगळ्यांना?
>>>>>>>>>
अगदी अगदी
मला तर कोणी विचारले की काय चालू आहे तर मी त्याला बोलतो, "बस जगतोय...!!"
याचा अर्थ काही करत असेन वा नसेन, जगत मात्र प्रामाणिकपणे आहे... Happy

अर्थात या येवू घातलेल्या जगबुडीचा फायदा घेत काहीजणांनी केलेला धंदा मात्र खरोखर जगाला बुडवेल असा वाटला. खरोखर काही दुर्दैवी घडणार असेल तर या व्यवसायातून मिळवलेला फायदा उपभोगायला ते संधी साधू तरी वाचतील का ?
------- संधी साधू लोकांना जग बुडणार नाही हे पक्के माहित असते... केवळ परिस्थितीचा फायदा घेणे हा यांचा लोभी स्वभाव असतो. असे लोभी सर्व क्षेत्रात असतात.

प्रत्येक मिळालेल्या दिवसाचा आनंद घ्या... मृत्युला घाबरणे सोडले तर आयुष्याचा खरा आनंद घेता येतो.

२१ डिसेंबरला जग बुडणार नाही आहे.

अर्थात या येवू घातलेल्या जगबुडीचा फायदा घेत काहीजणांनी केलेला धंदा मात्र खरोखर जगाला बुडवेल असा वाटला. खरोखर काही दुर्दैवी घडणार असेल तर या व्यवसायातून मिळवलेला फायदा उपभोगायला ते संधी साधू तरी वाचतील का ?>>>> आमच्या इथे सर्व्हावल किट्स पण मिळायला लागल्या.

१८

मी आजच स्विमिंग चा क्लास लावतोय............ १५ दिवसात शिकेल बहुतेक........
.
.
मित्रांनो मला शुभेच्छा द्या........:)

Proud

जग काही बुडत नाही मात्र मानव आणि इतर प्राणी यांच्या वागण्यात ( Behavior ) बदल येतील अस आंतरजालात नोंदवल आहे. हे किती खात्रीच आहे हे सांगता येणार नाही. विद्वानांनी अभ्यास करावा असा फोर्थ डायमेंन्शन हा ही विषय आंतरजालावर याच बरोबर चर्चीला जातोय.

इकडे तर वेगळच आहे की ता-यांमधून १६ वर्ष रिडियेशन होणार आहे, त्यात फक्त पुण्यवान लोक वाचणार आहे.

ता-यांमधून १६ वर्ष रिडियेशन होणार आहे, त्यात फक्त पुण्यवान लोक वाचणार आहे. <<<< अरे बापरे......
.
.म्हणजे आता मला स्विमिंग सोबत रेडियेशन सुट पण विकत घ्यावा लागणार ???? Uhoh

इकडे तर वेगळच आहे की ता-यांमधून १६ वर्ष रिडियेशन होणार आहे, त्यात फक्त पुण्यवान लोक वाचणार आहे.
तार्‍याला कस कळणार कोण पुण्यवान ते ? लोक काहिही अशास्त्रीय कंड्या पिकवतात.

इकडे तर वेगळच आहे की ता-यांमधून १६ वर्ष रिडियेशन होणार आहे, त्यात फक्त पुण्यवान लोक वाचणार आहे.
>>
हुश्य ग बाई! Wink

अखी,
दूध पावडर, अन वाल, गवार सारख्या भाज्या वाळवून साठवून ठेव म्हणावं. भाज्या अन दुधाचा प्रॉब्लेमच होईल नाही?

पापी लोकांनी स्वतःची घरंदारं नीट लावून ठेवा, शेजार्‍यांच्या उसन्या घेतलेल्या वस्तू परत करा. म्हणजे मग पुण्यवान आर्किऑलॉजिस्ट्सना नंतर उत्खननं करायला सोपं जाईल. कित्ती कित्ती थेसेस होतील बै इत्क्या सगळ्या डेटावर! :अगदी कल्पनेनेच रोमांच उठलेली बाहुली:

आपापल्या अंड्यात राहा सुरक्षित राहा...

शुभरात्री शब्बाखैर टाटा बायबाय गोड गोड नाईट ड्रीम्ज अनलिमिटेड...!!!

अंड्या आजकाल फेबुवर स्टेटस टाकण्याऐवजी माबोवरच फेसाळायला लाग्लाय असं दिसिंग.
माबोवरील तमाम आत्या, काकी मवश्यांनी याला चतुर्भुज करून टाकण्याचे मनावर घ्यावे.
हो, १८च दिवस राहिलेत Wink बिच्चारा तसाच नको राहून जायला नं?

Pages