काव्यलेखन

आभाळात आले किती .... काळे काळे ढग

Submitted by पुरंदरे शशांक on 29 April, 2013 - 00:35

आभाळात आले किती .... काळे काळे ढग

आभाळात आले किती .... काळे काळे ढग
येना बाहेर लवकर आई ....बघ वर बघ

आरडाओरडा कित्ती यांचा .... गडाडगुडूम
वीज कशी मधूनच .....जाते सणाणून

वारे कसे घोंघावती .... आवाज करून
पाला पाचोळ्याने गेले .... आभाळ भरून

टपटप टपटप आले आई .... थेंब हे वरून
भिजू मस्त पावसात ..... गोल गोल फिरून

गाणे गाऊ पावसाचे ..... हात उंचावून
ये ना आई लगेच बाहेर .... काम दे सोडून

गौरीच्या कवितेचा अनुवाद

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

Gauri.jpg

वसुंधरा

मीही एक वसुंधरा
आर्त आणि मेघश्यामल
माझ्या मिलनाला येतो
पहिला पाऊस...
मंजुळ.. अव्याहत
...थबथबणारा... कोसळणारा

सुगंध त्याचा सामावून जातो
माझ्या रक्तात..
गडद ठसा उमटतो
खोलवर माझ्या मनात...
....
मोहरलेल्या माझ्या अंगांगावर
पिवळ्या फुलांचे रान उठते
त्याच्या अगदी...पहिल्याच स्पर्शाने!!!!
अनुवाद (यशवंत काकड)

मुळ कविता अशी आहे:

प्रकार: 

देव

Submitted by उद्दाम हसेन on 28 April, 2013 - 03:56

कुण्या माणसाचा असा देव झाला
स्वत:चीच छाया विटाळे स्वत:ला

दरारा जरी सांगतो मी कुळाचा
छतातून आभाळ येते घराला

इथे रोज बाजार भरतो बुळ्यांचा
लुटारूंस देतो मुभा लूटण्याला

तिची हाक होती जरी ऐकली ना
तिचा खोल हुंकार घुमला कळाला

नगर कोपते वीज जाते म्हणूनी
(जिचा जन्म अंधारवाड्यात झाला)*

सती धाडणारे बदलले कशाने
सजगता हवी डाव उधळावयाला

तुझा देव लाचार नाही गुलामा
(हवे बंड का, अर्थ ध्यानात आला)**

*( वीज पिकते त्या धरणक्षेत्रात ज्यांच्या जमिनी बुडाल्या त्यांच्या नशिबात मात्र अंधारच असतो)

मी गझलांचा कर्दनकाळ

Submitted by वैवकु रीटर्न्स on 28 April, 2013 - 01:30

मी पर्यायी अंगुलिमाळ
मी गझलांचा कर्दनकाळ

प्रतिसादातुन मी वाचाळ
गझलांमधुनी खूप रटाळ

मी "मी"चे कीर्तन करतो
विठ्ठल मागे बडवी टाळ

गझल आवडो वा नाही
तू नुसते माझ्यावर भाळ

"पर्यायी- संग्रहा"स्तवे
शिजवत आहे माझी डाळ

गझला चाळिसच्या माझ्या
मी अकलेने नन्हा बाळ

'तिन्हिसांजा' मी वापरतो
तुम्ही वापरा 'संध्याकाळ'

पिंडबिंड पाहुन माझा
खच्चुन घाबरतात टवाळ

माबो मज तू किती पिटाळ
इथेच टाकिन गझलगुर्‍हाळ

इथेच टाकिन गझलगुर्‍हाळ.......मी गझलांचा कर्दनकाळ

तुझ्याशिवाय...

Submitted by Sangeeta Kulkarni on 27 April, 2013 - 14:09

तुझ्याशिवाय...

जगणं काय
जगण्याचं स्वप्नसुद्धा
पाहू शकत
नाही तुझ्याशिवाय...

श्वासाशिवाय काय
एकही क्षण
जगू शकत
नाही तुझ्याशिवाय...

तुझ्यावर रूसणे
जमलेच नाही
दुस-या कुणात
मन रमलेच नाही...

रातराणी उमलावी
तशी उमलते
मनापासुन दरवळते...

चिंब भिजल्यावर
गालावरचे थेंब गालावरच राहतात
क्षणभर का होईना
गुरुत्वाकर्षण विसरतात....

प्रेम नसावे कापरासारखे
भुर्रकन उडून जाण्यासारखे
प्रेम असावे कस्तूरीसारखे
आयुष्यभर जवळ राहणारे

जवळच राहणारे...

तुझ्या अंगणातील प्राजक्त मी!

Submitted by कर्दनकाळ on 27 April, 2013 - 13:36

तुझ्या अंगणातील प्राजक्त मी!
पुजारी तुझा एक संन्यस्त मी!!

न पैसा, प्रसिद्धी, न सत्ता हवी!
कधीचाच झालो अनासक्त मी!!

तुझी बंधने गैरलागू मला.....
विसरलास तू काय? स्वायत्त मी!

धुरा सर्व माझी तुझ्यावर अता!
तुझा एक आहे परमभक्त मी!!

करा क्षूद्र कावे हवे ते तुम्ही!
कधीही न होणार उध्वस्त मी!!

गझल...विश्व माझे असे जाहले!
जणू त्यातला मुख्य विश्वस्त मी!!

तुझ्या आडवाटा, तुला माहिती!
असे एक सामान्य नेमस्त मी!!

असे काय त्यांनी दिलासे दिले......
मनातून संपूर्ण आश्वस्त मी!

उसळतात ओठांवरी शेर या....
अरे, शायरीतील अभ्यस्त मी!

तुझी गौरकांती, तुझा लालिमा!

एक कविता

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

ओझी नकोनकोशी व्हायला लागली की वाटत
रानात रमलेल...रानात गमलेल एक रानफुल व्हाव!
आपल्याच हलक्या भारावर डोल डोल डोलणार!!!

घुसमट नकोनकोशी व्हायला लागली की वाटत
चहुबाजुने झाकोळलेल...वीजांनी कडाडलेल मेघ व्हाव!
फुटुन वाहून गेल की मग निळशार आकाश मिळव!

सखेसोबती नकोनकोसे व्हायला लागले की वाटत
आपल्यातच रंगलेल...आतबाहेरुन दरवळ्लेल फुल व्हाव
झडून गेल मी मग मातितच त्याच निर्माल्य व्हाव!

यशवंत

प्रकार: 

पाऊस आला पाऊस आला

Submitted by पुरंदरे शशांक on 27 April, 2013 - 06:02

पाऊस आला पाऊस आला

गडगड गडगड कोण गरजले
लखलख लखलख कसे चमकले

टपटप टपटप थेंब टपोरे
रस्ते अंगण ओले सारे

सुगंध भारी कुठून आला
अरे हा तर वळिव पडला

तडतड तडतड गारा पडल्या
मजेत वेचू खाऊया चला

गाणे गाऊन नाचू या चला
पाऊस आला पाऊस आला

वाटतो आहे जगाला तो मिठाई!

Submitted by कर्दनकाळ on 26 April, 2013 - 23:57

वाटतो आहे जगाला तो मिठाई!
कोणती तो जिंकला आहे लढाई?

मी कशी करणार कोणावर चढाई?
चालली माझ्यासवे माझी लढाई!

वेळ आली योग्य की, घडतात गोष्टी!
ही तुझी नाही बरी रे हातघाई!!

अस्मितेची चाड प्रत्येकास असते!
अस्मिता टिकवायला लागे धिटाई!!

बोलतो मी बोल माझ्या विठ्ठलाचे.....
मी कशी गझले तुझी मारू बढाई?

गझल लिहितो, ज्याप्रमाणे श्वास घेतो!
श्वास घेण्याला कुठे असते मनाई?

मी जरी खुर्चीत मोठ्या आज आहे;
तोच मी रे, काल जो होता शिपाई!

बालपण, तारुण्यही घाईत गेले....
आज वार्धक्यातही करतोस घाई?

नेहमी वाटायचे निवृत्त व्हावे!
आज निवृत्तीतला ना वेळ जाई!!

रोज आलेला दिवस पाहून वाटे....

ओघ !

Submitted by परब्रम्ह on 26 April, 2013 - 14:39

कोण कुठे असते,
सरिते समान येते,
आपल्याच ओघा-ओघानं,
आधी मनास भिजविते,
सर्वांगाला स्पर्श करित,
ह्रुदय चींब करते,
त्या ओघाच्या आकलना आधिच,
सर्वस्व वाटुन जाते,
जाता-जाता आठवणींचे,
अंशिक थेंब ठेवुन निघते,
तु सुखि रहा असे आवर्जुन,
ह्रुदय तोडुन जाते,
भार हे थेंबांचे आता
सागराहुन मोठे,
सरितेने निर्मिलेल्या ह्या,
सागर मीलनात आता,
त्याची सरिता नसते.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन