काव्यलेखन

पत्ता

Submitted by उद्दाम हसेन on 24 April, 2013 - 11:43

त्या घराचा पत्ता मजला ठावुक नाही
ती गेली तो रस्ता येतो सांगत काही

धूळ दिसते पुसतो लादी संगमरवरी
जागोजागी तिचाच चेहरा उमटत राही

घर पत्त्यांचे, विखुरलेले, वेचून घेतो
एक पत्ता उभा एकटा, आधाराचा पत्ता नाही

या झाडावर उन्हात फुलली वेल एकदा
हात कुणाचा कुणी सोडला उमजत नाही

- Kiran..

केवढा घेतोस मोठा घास बाळा!

Submitted by कर्दनकाळ on 24 April, 2013 - 11:18

केवढा घेतोस मोठा घास बाळा!
काय वय, अन् काय हा भलताच चाळा!!

जिंदगी आ वासुनी बघते तुझीही......
लावतो तुझियाच तू प्रगतीस टाळा!

वांझ शब्दांचीच आहे रोषणाई!
गझल कोठे? फक्त गझलांचा धुराळा!!

कोणती नस तोडली गेली कळेना.....
कैक लोकांना किती आला उमाळा!

ह्या दिलाशांची, खुलाशांचीच भीती!
बेगडी जग, बेगडी त्यांचा जिव्हाळा!!

पिंड माझा अन् तुझा आहे निराळा!
व्हायचो तुजसम न मी नामानिराळा!!

झाकुनी एकास दुस-या दाखवावे!
सारखा वाटे उन्हाळा, पावसाळा!!

पावसानेही किती अंगांग पोळे!
त्या उन्हापेक्षा सवाई पावसाळा!!

वाटते बरसात हल्ली जीवघेणी!
दे मला तू आज त्यापेक्षा उन्हाळा!!

तेच ते अन् तेच ते...!

Submitted by बागेश्री on 24 April, 2013 - 09:04

तेच डोळे,
तीच उघड-झाप,
तीच झोप
सकाळ तीच!

तेच घर
तीच बाग,
तेच अंगण
ऊनही तेच!

तेच ठिपके
रांगोळी तीच,
त्याच पायर्‍या
पावलं तीच!

तेच शरीर
रस्ता तोच,
तीच चाल
पोहोचण्याचं ठिकाण.... तेच!

चेहर्‍यांवरचे तेच चेहरे
ओळखीचे सारे,
खोटे पहारे,
तीच लगट अन तेच इशारे!

परतीची वाट तीच
ठरलेली कामंही तीच..
मागे पडणारा आज तोच
काल तोच
रोज........
तोच!

अंगावरली तीच कातडी,
बोटांनाही नखे तीच
जपलेले पंचद्रिये
त्यांनाही ठरलेली कामं तीच!

दिसामाजी मात्र चढत जाणार्‍या सुरकुत्या,
लोंबणारी त्वचा..
थिजलेली दु:खं
अन् मुरलेली सुखं!
ह्यात नाविन्य मला गवसत नाही, अन्
तू म्हणतोस,

शब्दखुणा: 

आपली नसतात मुले

Submitted by अमितकरकरे on 24 April, 2013 - 08:45

Your children are not your children
They are the sons and daughters of life’s longing for itself
They come through you but not from you
And though they are with you yet they belong not to you
You may give them your love but not your thoughts
For they have their own thoughts
You may house their bodies but not their souls
For their souls dwell in the house of tomorrow
Which you cannot visit not even in your dreams
You may strive to be like them but seek not to make them like you
For life goes not backward nor tarries with yesterday
~ Khalil Gibran

शब्दखुणा: 

रीती

Submitted by विजय दिनकर पाटील on 24 April, 2013 - 07:13

ही कविता ऐकायची असल्यास प्रत्यक्ष भेटा अथवा येत्या काही महीन्यात प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाची वाट पहा.

खास....

Submitted by Sangeeta Kulkarni on 23 April, 2013 - 14:32

खास....

जगात ... क्षणोक्षणी आपल्याला
खूप माणसं भेटतात..

पण काहीच माणसं
मनात घर करतात..

एखादीच व्यक्ती
संपूर्ण आयुष्याला
व्यापून टाकते..

पण.. ती सगळ्या जगापेक्षा
जरा जास्तच खास असते..

शब्दखुणा: 

जखम

Submitted by समीर चव्हाण on 23 April, 2013 - 10:19

ती यायची नेमाने, सकाळी-सकाळी
कोण कुठली, कुठून यायची
किती पायपीट करून
थांगपत्ता नाही
यायची वाडा झाडायला
बदल्यात शिळंपाकंवरचा हक्क बजावयाला

लहान मुलांनाही सौंदर्यबोध असतो
गोरंपान रुपडं वर ठसठशीत कुंकू
सुरकतलेला देह नव्वारीत बांधून
मोठं अप्रूप वाटायचं
नशीब थट्टेखोर म्हणतात ते काही खोटं नाही

जिन्याखाली असायचा तिचा ऐवज
एक खराटा, थाळी, आणि पेला
कुणी तिला शिवायचं नाही
अन्न-पाणी वरून घालायचं
का ते कुणाच्याही बापाला ठाऊक नाही

कधी-कधी चार-आठाण्यांसाठी करायची घिसघिस
वाटायचं उरलंसुरलं का होईना
रोज खाऊन तर जायची इथून
मग कुणासाठी हा आतड्याचा पीळ

शब्दखुणा: 

हरेक गोष्टीमधे जरासा समास ठेवा!

Submitted by कर्दनकाळ on 23 April, 2013 - 06:50

हरेक गोष्टीमधे जरासा समास ठेवा!
जगा, जगू द्या, जिण्यात थोडी मिठास ठेवा!!

बनू नये मांडलीक कोणी कधी कुणाचे!
विचार, आचार, यांत माफक मिजास ठेवा!!

गमावलेली असोत स्वप्ने, हवी सबूरी.....
खुबीखुबीने अखंड चालू तपास ठेवा!

खुशाल संसारही जगाचा कुणी करावा!
बरोबरीने स्वत:स राखीव श्वास ठेवा!!

असो कितीही बिकट जरी वाट नागमोडी;
जरा विसावून, रोज जारी प्रवास ठेवा!

अनेक यात्रेकरू पुढे जायचे उद्याला......
पुढे जरी पोचलात, मागे सुवास ठेवा!

भले किती पायपीट आहे करावयाची;
अवश्य दिवसा करा, निशेला निवास ठेवा!

पडो कितीही घरे जरी काळजास तुमच्या;
जगात मिरवावयास मुखडा झकास ठेवा!

काल कशी ग आपण गंमत केली

Submitted by जयदीप. on 23 April, 2013 - 04:50

काल कशी ग आपण गंमत केली
वाघोबाची गोष्ट ऐकत
डेडाच्या कुशीत जोजो केली

काल कशी ग आपण गंमत केली
छोटा भीम बघत बघत
डेडाबरोबर मंमं केली

काल कशी ग आपण गंमत केली
डेडाला चहा दिलास
खेळताना भातुकली

काल कशी ग आपण गंमत केली
गार्डनमध्ये आडवी तिडवी
खेळलो घसरगुंडी

उद्या विसरणार नाहीस ना
काल कशी ग 
आपण गंमत केली.........

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन