देव मराठी गझल कविता Kiran Kiran.. Kiran...

देव

Submitted by उद्दाम हसेन on 28 April, 2013 - 03:56

कुण्या माणसाचा असा देव झाला
स्वत:चीच छाया विटाळे स्वत:ला

दरारा जरी सांगतो मी कुळाचा
छतातून आभाळ येते घराला

इथे रोज बाजार भरतो बुळ्यांचा
लुटारूंस देतो मुभा लूटण्याला

तिची हाक होती जरी ऐकली ना
तिचा खोल हुंकार घुमला कळाला

नगर कोपते वीज जाते म्हणूनी
(जिचा जन्म अंधारवाड्यात झाला)*

सती धाडणारे बदलले कशाने
सजगता हवी डाव उधळावयाला

तुझा देव लाचार नाही गुलामा
(हवे बंड का, अर्थ ध्यानात आला)**

*( वीज पिकते त्या धरणक्षेत्रात ज्यांच्या जमिनी बुडाल्या त्यांच्या नशिबात मात्र अंधारच असतो)

Subscribe to RSS - देव मराठी गझल कविता Kiran Kiran.. Kiran...