वाटतो आहे जगाला तो मिठाई!

Submitted by कर्दनकाळ on 26 April, 2013 - 23:57

वाटतो आहे जगाला तो मिठाई!
कोणती तो जिंकला आहे लढाई?

मी कशी करणार कोणावर चढाई?
चालली माझ्यासवे माझी लढाई!

वेळ आली योग्य की, घडतात गोष्टी!
ही तुझी नाही बरी रे हातघाई!!

अस्मितेची चाड प्रत्येकास असते!
अस्मिता टिकवायला लागे धिटाई!!

बोलतो मी बोल माझ्या विठ्ठलाचे.....
मी कशी गझले तुझी मारू बढाई?

गझल लिहितो, ज्याप्रमाणे श्वास घेतो!
श्वास घेण्याला कुठे असते मनाई?

मी जरी खुर्चीत मोठ्या आज आहे;
तोच मी रे, काल जो होता शिपाई!

बालपण, तारुण्यही घाईत गेले....
आज वार्धक्यातही करतोस घाई?

नेहमी वाटायचे निवृत्त व्हावे!
आज निवृत्तीतला ना वेळ जाई!!

रोज आलेला दिवस पाहून वाटे....
चेहरा बदलून हा आला कसाई!

कोण तू? अन् कोण मी? हे जाणतो मी!
कर तुला जितकी हवी तितकी बुराई!!

मठ, न कंपू, वा कळप, काही न माझे!
मी सडा असलो तरी आहे सवाई!!

स्थान शिष्यांच्या अढळ हृदयात माझे!
हीच आयुष्यात केलेली कमाई!!

********************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा 'मी' म्हणजे तू/तो/ते/ती कुणीही असू शकते अरविंदराव!
'मी' म्हणजे स्वत: शायर हा फारच संकुचित अर्थ झाला!
इथला 'मी' हा प्रातिनिधिक मी आहे!..........हेच तर काव्यातील सौंदर्य असते!
************इति कर्दनकाळ

तिलकधारी आला आहे.

मी कशी करणार कोणावर चढाई?
चालली माझ्यासवे माझी लढाई!

मतल्यात दोन्ही वेळा 'ढा' आल्यावर पुढे वाट्टेल ते काफिये घेतले गेल्यामुळे तिलकधारी संतप्त झालेला आहे.

आता मतला बदलणे हे तिलकधारीला आणखीनच क्रोधीत करेल.

तिलकधारी निघत आहे.

तिलकधारी,
धन्यवाद चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल!
मतला वेगळा टाकला आहे! क्षमस्व!

स्थान शिष्यांच्या अढळ हृदयात माझे!
-- अढळ हृदय असं लिहिलंय. पण स्थानही अढळ असतं म्हणून तोही अर्थ लागला. आपल्याला कोणता अर्थ अपेक्षित आहे ते उलगडून सांगाल का?

प्रोफेसर, एक विचारू का?
>>वाटतो आहे जगाला तो मिठाई!
कोणती तो जिंकला आहे लढाई?
या मतल्यातून काय म्हणायचे आहे हो तुम्हाला? मोठा पानभर निबंध नको. पर्यायी शेर चालेल.
बाकी काही क्लियर कराय ऐवजी तुम्ही वाचकांनाच प्रश्न विचारता आहात म्हणून विचारलं.
आत्ताच माझ्या शेजारच्या बे मधे एक मुलगा engagement झाल्याबद्दल मिठाई वाटतोय. त्याला लागू पडेल ना हा शेर?

वाटतो आहे जगाला तो मिठाई!
कोणती तो जिंकला आहे लढाई?

कोणता शब्द कठिण आहे ज्याने शेर दुर्बोध वाटला आपल्याला!
आपापल्या पिंडाप्रमाणे जो तो त्याला पाहिजे तो अर्थ काढायला मोकळा आहे!

लढाई जिंकणे, मिठाई वाटणे या प्रतिमा आहेत या मतल्यात!

आत्ताच माझ्या शेजारच्या बे मधे एक मुलगा engagement झाल्याबद्दल मिठाई वाटतोय. त्याला लागू पडेल ना हा शेर?<<<<<<<<<<<<,हे तो मुलगाच ठरवू शकेल!
खूप हातपाय मारून /खूप मुली बघून/ पत्रिकेतले अडथळेही पार करून जर एकदाचे लग्न ठरले असेल तर त्या मुलाला एखदी लढाई जिंकल्याचाच आनंद होईल! मग त्याच्या लग्न ठरलेल्या गोष्टीला हा शेर लागू पडेल!

जीवनात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी झगडावे/लढावे लागते व जेव्हा जेव्हा ती गोष्ट त्याला प्रयत्नांती मिळते तेव्हा मिठाई वाटण्याइतका आनंद त्याला निश्चितच होतो!

मी कशी करणार कोणावर चढाई?
चालली माझ्यासवे माझी लढाई!
मतला तंत्रात चुकत होता पण दुसराच मतला का आणून बसवलात?

मी कशी करणार कोणावर चढाई?
तोच मी रे, काल जो होता शिपाई

मी जरी खुर्चीत मोठ्या आज आहे
चालली माझ्यासवे माझी लढाई!

असे चालले असते

क्षमस्व

दुसरा मतला लगेच ओठांवर आला म्हणून तो बसवला! पहिल्या मतल्यात भावनावेगात चूक झाली असल्याने व ती कनवाळू तिलकधारींनी वेळेत निदर्शनास आणून दिली असल्याने, दुसरा ओघाने आलेला मतला, इथे आणून बसवला!

टीप: कोणतीही गझल कायमची पूर्ण झाली असे नसते! तिच्यात कमी अधिक शायर केव्हाही करू शकतो या मताचे आम्ही आहोत! त्या न्यायाने आम्ही दुसरा मतला वर आणून बसवला! आपली काही हरकत मियाजी?

स्थान शिष्यांच्या अढळ हृदयात माझे!<<<<<
अढळ हे स्थान या नामाचे विशेषण आहे!
काव्यात वृत्तानुसार शब्दांची जागा बदलली तरी चालते!
समग्र ओळीचा अर्थ लक्षात घ्यायचा असतो!

अढळ हृदय असा अर्थ या ओळीचा लावणे हे सहृदयतेचे लक्षण नव्हे!

नाही, माझी कसली हरकत, मी तुमच्याच गझलेतील दोन शेरांची पुनर्मांडणी करून १ मतला व १ शेर बनवला यबद्दल मीच उलट आपली काही हरकत आहे का विचारावयास हवे होते.
मी अगोदरच क्षमस्व म्हटले आहे.

इमोशनल इंटेलिजन्स<<<<

Lol

आम्हास कर्दनकाळांविषयीचा आमचाच एक शेर स्मरला ..........

गझला चाळिसच्या माझ्या
मी अकलेने नन्हा बाळ

म्हणून हसू आले गैरसमज नसावा ...क्षमस्व !!!
Happy

emotional hangover चा अभ्यास केलात का? नसेल तर तो करावा! गरज आहे तुम्हाला त्याची!

आम्हास कर्दनकाळांविषयीचा आमचाच एक शेर स्मरला ..........
एवढ्यात विसरलास का खालील शेर जे खास तुझ्यावर आम्ही लिहिले होते?

स्मरणासाठी पुन्हा इथे देत आहोत......

यायचे केव्हा तुझ्या गझलेत वैभव वैभवा?
षंढ शब्दांचा तुझ्या, हा नाच थांबव वैभवा!

शब्दब्रम्हाचा तुला अद्याप नाही गंधही;
काय तुज कळणार गझलेतील मार्दव वैभवा?

आग पाखडतोस, चिल्लर शायरी करतोस तू!
आव शब्दांची तुझी तात्काळ थांबव वैभवा!!

साधना, आराधना करतोस का केव्हा तरी?
वेळ कोणाला? तुझे बघण्यास तांडव वैभवा!

खूप झाले कोडकौतुक वांझ शब्दांचे तुझ्या!
आज ना कोणी तुझी करणार आर्जव वैभवा!!

शब्द असते शस्त्र, त्याचा योग्य वापर पाहिजे;
शब्दक्रीडेची तुझी ही हाव घालव वैभवा!
......इति प्रा.सतीश देवपूरकर/कर्दनकाळ

खालील शेर जे खास तुझ्यावर आम्ही लिहिले होते?

>>साधना, आराधना करतोस का केव्हा तरी?
वेळ कोणाला? तुझे बघण्यास तांडव वैभवा!<<

शेर म्हटल्यावर ती एक दोन ओळींची स्वतंत्र आणि पूर्ण कविता असावयास हवी या निकषाला वरील द्विपदी कमी पडत आहे असे माझे वै. म. आहे.
क्षमस्व

बाप रे, नेमके त्याच शब्दामुळे माझे वरील मत झालंय
वैभव नावाच्या कोणीतरी एका व्यक्तीने साधना, आराधना करण्याचा किंवा वैभव नावाच्या एक व्यक्तीला कधीतरी साधना आराधना करतोस का विचारण्याचा आणि वैभव नावाच्या व्यक्तीचे "तांडव" बघण्यास वेळ नसण्याचा परस्परांशी संबंध नसावा असे माझे वै. म.

कशाचे तांडव? तांडव म्हणजे काय? या तांडवाला साधनेची आराधनेची का गरज भासते?
अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे आपल्याच मनास द्या! शेर आपोआप उलगडेल!

अच्छा म्हंजे थयथयाट.
वैभव नावाची व्यक्ती खूप काही लिहीत आहे, म्हंजे ती थयथयाट करत आहे म्हंजे तांडव करत आहे, आणि तुम्ही (सॉरी तुम्ही म्हंजे शायर) त्या वैभव नावाच्या व्यक्तीला सांगत आहे की चांगले लिहायचे असेल तर त्यासाठी साधना, आराधना पाहिजे. आणि ती तू कधीतरी करतोस तरी का? असे शायर वैभव नावाच्या व्यक्तीला विचारत आहे आणि वर हेही सांगत आहे की तुझा हा बिन साधना, आराधनेचा थयथयाट म्हंजे तांडव बघायला अजिब्बात टाइम नाही

Pages