गौरीच्या कवितेचा अनुवाद

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

Gauri.jpg

वसुंधरा

मीही एक वसुंधरा
आर्त आणि मेघश्यामल
माझ्या मिलनाला येतो
पहिला पाऊस...
मंजुळ.. अव्याहत
...थबथबणारा... कोसळणारा

सुगंध त्याचा सामावून जातो
माझ्या रक्तात..
गडद ठसा उमटतो
खोलवर माझ्या मनात...
....
मोहरलेल्या माझ्या अंगांगावर
पिवळ्या फुलांचे रान उठते
त्याच्या अगदी...पहिल्याच स्पर्शाने!!!!
अनुवाद (यशवंत काकड)

मुळ कविता अशी आहे:

"Earth":
I am earth
Vast deep and black and I receive
The first rain
Sweet generous
Lashing throbbing
It’s smell forever in my blood
Its imprint deep within my quick
Yellow daisies burst out
On my breast and thigh
At its very touch
—Poems on a Last Love

प्रकार: 

सुंदर कविता बी, अन प्रचिसुद्धा, पण गौरीबद्दल अधिक परिचयात्मक माहिती द्या ना..