नातीगोती

मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: परीकथेच्या सवे

Submitted by मार्गी on 17 September, 2019 - 14:27

आत्मा

Submitted by Yogita Maayboli on 17 September, 2019 - 01:59

आयुष्याच्या सुरवातीपासून ते शेवट पर्यंत जी गोष्ट आपल्याला सदैव साथ देते ती म्हणजे आपला आत्मा.... Your soul . "Nothing can replace your own Soul"

जी माणसे आपल्या अवतीभोवती आहेत ती एका नात्याने, किंवा काही कारणांनी , काही उद्देशाने आपल्याशी जोडलेली आहेत.

स्वप्न --- नशीब

Submitted by Yogita Maayboli on 13 September, 2019 - 08:54

स्वप्न खरंच कधी खरी होतात का .....कि ती फक्त झोपेत बघण्यासाठी असतात.....

लोक बोलतात स्वतःची स्वप्न स्वतः पूर्ण करायची असतात...पण खरंच स्वप्न हे फक्त स्वतःच्या कृती मुळे पूर्ण होतात का.....

त्यात इतरांचा हस्तक्षेप पण असतोच कि....

खरंच.... पण स्वप्न फक्त स्वप्नातच कुर्वळायची असतात.....अस्तित्वात ती खरी होतीलच असे नाही.....

आणि जर एखाद्याचे सर्व स्वप्न पूर्ण होत असतील तर तो /ती नशीबवान तरी असेल नाहीतर सर्वांचा प्रिय तरी असेल ..

राहिल्या त्या काही आठवणी (कोकण) - १

Submitted by 'सिद्धि' on 13 September, 2019 - 06:27

कोकण म्हणजे ओल्या मतीचा गंध,
कोकण म्हणजे हळुवार मनाचा बंध,
कोकण म्हणजे कोवळी पहाट स्वच्छंद,
माझ्या मनातील कोकण म्हणजे... एक लहर बेधुंद ॥

शब्दखुणा: 

मुक्तविहारी

Submitted by सामो on 10 September, 2019 - 09:43

संघर्षाचीही सवय होऊन जाते इतकी की अचानक तो आयुष्यातून निघून गेल्यानंतर पोकळी जाणवते. तिला जर कोणी हे ६ महिन्यापूर्वी सांगितले असते तर नवल वाटले असते, तडजोड फक्त अंगवळणीच पडत नाही तर आयुष्याचा ती अविभाज्य हिस्सा बनून जाते. यु मिस एडजस्टमेन्ट. मिळालेल्या स्वातंत्र्याचे काय करायचे हा प्रश्न पडतो. पर्याय आ वासून चोहो बाजूंनी खाऊ पहातात. सकाळ उजाडते ती फक्त आपल्यासाठी, स्वतः:साठी याबद्दल गुन्हेगारीची भावना निर्माण होते. चहा आणि विविधभारतीवरील बातम्या घ्या ना किंवा एक फनकार, फौजीभाईयोकी सिफारीश, रंग एक रूप अनेक , हवामहेल ..... . वाह! खरं तर हे असे विना कटकट विना झगडा ऐकायला मिळणं हे वैभव.

या वळणावर...

Submitted by 'सिद्धि' on 21 August, 2019 - 07:34

" कोणाला ही उशीर झाला की, हल्ली खुप धास्ती वाटत राहते. पण हाच थोडा उशीर हा, थोडा करता-करता थोडा जास्तच व्हायला लागला की वाटतं, एवढा उशीर पण होऊ नये, की आयुष्याची संध्याकाळ समोर येऊन ठेपलेली असेल.
जस नकार पचवण कठीण असतं, तसच उशीर पचवण थोडं कठीण झालं आहे हल्ली. तरीही मी खुप भाग्यवान आहे. कारण त्या एका संध्याकाळी भेटलेला तो, आयुष्याची संध्याकाळ येई पर्यंत वाट बघण्याच बळ देऊन गेला. आणि हे वाट बघणं कस सुसह्य होऊन गेलं. अशी मी नेहमीच त्याची वाट बघत बसते. कधी मनातचं, तर कधी प्रत्यक्षात. आणि मला ते आवडत ही."

शब्दखुणा: 

जोडीदार 'गेल्या'नंतर.....

Submitted by साद on 19 August, 2019 - 03:20

बहुसंख्य भारतीय लग्न करतात आणि वैवाहिक जीवन जगतात. आता लग्न म्हणजे तडजोड आलीच. प्रेम, संवाद, वाद, कलह हेही या जीवनाचे पैलू. जे लोक विवाह दीर्घकाळ यशस्वी करतात त्यांच्या बाबतीत एक बाब जाणवेल. ती म्हणजे - जोडीदाराच्या नसलेल्या पण स्वतःच्या असलेल्या एखाद्या आत्यंतिक आवडीला मुरड घालणे. हे पती-पत्नीत दोघांकडून होत असते. यात खाणे- 'पिणे', छंद, अस्तिकता- नास्तिकता, खर्च / काटकसर ….असे अनेक मुद्दे असू शकतात. पण आपले वैवाहिक जीवन यशस्वी करायचे या उद्देशाने असे लोक यांसारख्या छोट्यामोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कधीमधी जोडीदाराला न आवडणारी आपली एखादी आवड चोरून देखील पुरी करतात !

एक रात्र मंतरलेली... भाग 4(अंतिम) finale

Submitted by छोटी on 19 July, 2019 - 05:48

#कथा

#एकरात्रमंतरलेली
©अर्चना चौधरी
एक रात्र मंतरलेली भाग 3

.......... शेवटी

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 19 July, 2019 - 03:07

.......... शेवटी

- स्वच्छंदी

तू मला भेटायला ये...शेवटी

पण खरे सांगायला ये...शेवटी

नाव घेउन कोण मज बिलगायचे ?

तू तरी बिलगायला ये...शेवटी

घाव तू जमतील तितके दे मला

पण जखम बांधायला ये...शेवटी

जिंदगीचा साज सुंदर जाहला

ये प्रिये, उतरायला ये...शेवटी

तो म्हणाला की,"कुणी नाही तुझे."

चल गड्या मोजायला ये...शेवटी

Pages

Subscribe to RSS - नातीगोती