Couple Goals & मी !

Submitted by Silent Banker on 8 February, 2020 - 00:10

परवा ऑफिस कन्टीनमध्ये बोलता बोलता ऑफिस मधील सहकाऱ्याने प्रश्न विचारला "What are your couple goals this year ?". फेब्रुवारी महिना नुकताच संपला होता अणि महिन्याचे व्यावसायिक ध्येय(target) पूर्ण झा ल्याच्या आनंदात होतो। मार्चमध्ये पुढे काय वाढून ठेवले आहे अणि महिन्याचे उद्दिष्ट कसे पूर्ण करायचे याची जुळ णी मनात चालू होती. क्षणभर या प्रश्राने बावचळलो। "Couple Goals" हे काय नवे पिल्लू आहे असा विचार करत , " अजून असे काही ठरलेले नाही " असे उत्तर देऊन सुटका करुन घेतली। मनात मात्र विचार घोळत होता की आता नात्यांचे "Relationship" झालेल्या काळ ा त ती सुखी करण्यासाठी "Goals" (उद्दिष्टे ) ही निश्चित केली जाणार अणि तुमचे नाते यशस्वी की अपयशी हे आता या "Goals" च्या फुटपट्टीवर मोजले जाणार। सगळेच अद्धभुत अणि थोड़े अंगावर येणारे।

ऑफिस मधील काम आ ट पून टॅक्सी मधुन घरी परत जात असताना वाटेत २-३ मोठया जाहिरात फलकांनी (" Signage Boards") लक्ष वेधून घेतले। ती जाहिरात (ad) एका फाइनेंस कंपनीची होती। " आपल्या प्रिय व्यक्तीला " लक्ज़री कार " भेट म्हणून देऊन आपले "Couple Goals" साध्य (achieve)करा त्याला नवीन आयाम ( redefine) द्या व ते करण्यासाठी आम्ही "अर्था"तच तुमच्या सोबत आहोत।"

गम्मत म्हणजे टॅक्सी मध्ये रेडिओवर मस्त गाणे लागले होते गाजलेल्या मराठी चित्रपटातले ("मुंबई पुणे मुंबई 2") गाण्याचे बोल होते

" सा द ही प्रीतीची ऐकुनी प्रतिसाद दे

रं ग हे नवे नवे बहरू दे या जीवनी साथ दे।"

माझ्या मनातल्या गोंधळाला समर्पक गोष्टी आजूबाजूला होत्या आपले नाते खुलवताना आयुष्य हे " रंगभूमी" असावी का "रणभूमी" हा सवाल करणारी परिस्थिती होती।

एक बाजूला उद्दिष्ट समोर ठेउन त्याची पूर्तता करून आयुष्याला आणि नात्याला अर्थ देण्याची धडपड होती तर दुसरीकडे एकमेकांना समजून घेऊन नाते खुलवण्यासाठी केलेला प्रयत्न होता।

एकीकडे काहीतरी मिळविण्यातला आनंद होता तर दुसरीकडे एकमेकांच्या साथीने आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठीची धडपड होती।

काय बरोबर आणि काय चूक । मनातील अस्वस्थता आणखीच वाढत होती। एकदाचा छडा लाऊन टाकावा म्हणुन "Couple Goals" म्हणजे काय आणि ती कशी ठरवायची हे तपासले तेव्हा लक्षात आले की हे म्हणजे "सुखी संसाराची गुपिते " किंवा " यशस्वी वैवाहिक जीवनासाठीचा मूलमंत्र " असल्या वर्गवारीत बसू शकेल अशी " नाते " यशस्वी करण्यासाठीची ( की टिकविण्यासाठीची ?) " सूची " आहे। "विश्वास , परस्परांचा आदर , मनमोकळा संवाद , एकमेकांची काळजी" या चतुष्पादांच्या खांद्यावर उभे राहुन नाते मजबूत करताना " सत्व" राखत वादविवादाचे विसंवादात रूपांतर होऊ न देण्याची " लवचिकता "दाखवत, प्रसंगी "तडजोड" नामक मलमपट्टी करत एकमेकांचे मित्र होउन आनंदी राहणे म्हणजेच " Couple Goals".

हे कळल्यानंतर मन उगाचच भूतकाळात गेले। माझ्या लहानपणी आमच्या सांगलीमध्ये एक प्रसिद्ध उद्योजक लग्नामध्ये "वधु-वरांना " आशीर्वाद देताना " त्यांच्या कंपनीचे प्रोडक्ट आणि " सुखी संसाराची सुत्रे " या विषयावरचे त्यांनी लिहलेले एक छोटे पुस्तक " भेट म्हणून द्यायचे अणि वधुला आशीर्वाद देताना " अखंड सौभाग्यवती हो" या अत्यंत अशक्यप्राय वचनाऐवजी "सदा आनंदवर्धिनी रहा " असा व्यावहारिक आशीर्वाद द्यायचे। या "आनंदवर्धिनी" या शब्दामध्ये मोठी मौज आहे। "Multiplier Effect" हे जे काय असते ना तसे "जीवनाचा रसरशित आनंद घेत अणि तो सर्वांना देत सर्व परिवाराचे आयुष्य तु आनंदी ,सुखी कर" असा आशीर्वाद देणारे अणि घेणारे आता थोड़े कमी झाले आहेत हे नक्की।

वैज्ञानिक प्रगति अणि भौतिक सुखे याने मानवी जीवन खरेच खुप सुखी बनविले। प्रगतीच्या संधि अणि तंत्रज्ञानाची भरारी यामुळे जगण्याची प्रक्रिया अधिक आरामदायी झाली। पण प्रत्येक सुन्दर गोष्टीला कुठे तरी एक कारुण्याची छटा असते असे म्हणतात तशी या वर वर दॄष्ट लागावी अश्या दिसणाऱ्या सुंदर आयुष्याला एक कारुण्याची किनार आहे. " एकमेका सहाय्य करुँ। अवघे धरु सुपंथ। " असे म्हणत चालणारे "participative" समाजजीवन कुठेतरी मागे पडून " जीवो जीवस्य जीवनम :" ( one living is food for another) हा जंगलाचा कायदा आता कॉन्क्रीट च्या जंगलात देखील चांगलाच रुळला आहे. भौतिक प्रगती अणि सुखी जीवन याची अशी काही जबरदस्त सांगड घालण्यात आली आहे की " शहरे " ही " लोकांनी एकत्र येऊन सहजीवन उपभोगण्याची जागा न राहता " द्रव्योपासकांचा अड्डा " बनली आहेत। " संवाद हरवत चाललेला असताना वास्तविकता (Reality) अणि स्वप्ने ( dreams) यांच्यातील दरी बुजविताना होणारी दमछाक विसंवाद वाढवत आहे। गगनचुम्बी उंच इमारतीत आपल्या ऑफिस मजल्यावर "लिफ्ट "मधून जाताना केल्या जाणाऱ्या "Hello, How are you ?" मधल्या औपचारिकतेमुळे त्याला " कसे काय बरे आहात ना ?" मधील आपुलकीचा स्पर्श होताना दिसत नाही. रोजच्या जगण्यासाठीचा संघर्ष माणसाला "रणभूमी " वरील लढवय्या बनवत असून "रंगभूमीवरील " आविष्कार निर्मितीसाठी त्याच्याकडे अंमळ वेळच नाही आहे।

पाश्चिमात्य संस्कृतिचे अनुकरण करताना विज्ञाननिष्ठा , व्यावसायिकता या सारख्या चांगल्या गोष्टी आपल्या आचरणात आल्या , पण "ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला। वाण नाही पण गुण लागला ." या न्यायाने चंगळवाद , भोगवाद या सारख्या आगन्तुकानी देखील आपले बस्तान बसविले। "मद्य अणि मदिराक्षी "यांची जणू सुसंगत जडून "रस"बोधाची पारायणे हाच सुखासाठीचा उतारा आहे ही समजूत दॄढ होऊ लागली। "व्यक्तिस्वात्रंत ", "आधुनिकता " म्हणजे " कुत्र्यामांजरासारखे चारचौघात शरीराचे भोग उपभोग घेणें" हे "Public Display of Affection" (PDA). च्या गोंडस नावाखाली सर्वमान्य झाले। आयुष्यात " रोज काहीतरी नवीन केले तरच थ्रील आहे " या अचाट हट्टापायी " रोज नवीन गाड़ी किंवा बाहुली पाहिजे " म्हणणाऱ्या लहान मुलांनी " उद्या मोठे झाल्यावर रोज नविन बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड " मागितली तर चूक कुणाची। अश्या गोंधळात नाती ती टिकतील तरी कशी !

अश्या या गोंधळाच्या वातावरणात "दुनिया झुकती है ,झुकानेवाला चाहिये। " च्या धर्तीवर " यहाँ सब कुछ बिकता हैं , बेचनेवाला चाहिये " हे तत्त्व कोळून प्यालेल्या "Ad guru"नी परत आम्हाला आमचीच मूल्ये शिकविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या काढल्या। " Mother's Day", " Father's Day", आपण मोठ्या उत्साहाने साजरा करू लागलो अणि भौतिक सुब्बतेसाठी जीवाचें रान करताना नात्यांवर येणारा ताण हलका करण्यासाठी मग " Couple Goals" आले। सहजीवनातून नाते फूलविण्याऐवजी लक्ष्याधारित आनंद मिळविल्याकडे वाटचाल चालू झाली। मग त्या लक्ष्याधारित आनंद निर्मितीच्या यादीत कधी " लक्ज़री कार " आहे तर कधी " फॉरेन ट्रिप " आहे।

नुकताच जागतिक महिला दिन साजरा झाला। त्या दिवसाच्या उत्सवाची थीम होती "Balance for Better. "

खरच हाच "balance" जर आपण आपल्या जगण्यात आणला तर आयुष्य अणि नाती "better" झाल्याशिवाय राहणार नाहीत।

विले पार्ले आले अणि टैक्सीवाल्याला पैसे देऊन घरी पोचलो , माझ्या " २०१९ च्या couple Goal" सहित। ते अर्थातच आहे " Balance for Better."

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

व्यक्तिस्वात्रंत ", "आधुनिकता " म्हणजे " कुत्र्यामांजरासारखे चारचौघात शरीराचे भोग उपभोग घेणें" हे "Public Display of Affection" (PDA). च्या गोंडस नावाखाली सर्वमान्य झाले।>>अगदी अगदी. आणि हे जर खटकलं तर लगेच तुम्हाला 'antique piece' मानलं जातं.
हाही लेख आवडला.

Thanks