काल्पनिक लघुकथा

कॉफी विथ रिझन

Submitted by एविता on 8 July, 2020 - 02:15

"मी नाव विसरले त्या पुस्तकाचं.. खरेदी कशी टाळावी.. किंवा खरेदी कशी वाईट सवय आहे असंच काहीसं होतं त्याचं नाव.."मी क्रॉसवर्डच्या सेल्समनला सांगत होते.

" मी तुझ्या बाजूलाच हातातलं मासिक चाळत तू त्या सेल्समनला काय विचारत होतीस ते ऐकत होतो. मला ठाऊक होतं त्या पुस्तकाचं नाव पण मी बोललो असतो तर तू "आलाय मोठा शहाणा", किंवा, "ही तरुण मुलं मुलींवर इम्प्रेशन मारायची संधी सोडतच नाहीत", किंवा "आगाऊ कुठला", वगैरे वगैरे वाक्यं मनात म्हणत कपाळावर आठ्या चढवशील असं वाटलं म्हणून मी गप्प बसलो. शिवाय तुम्हा दोघांच्या चालत्या बसमध्ये चढताना पडलो असतो किंवा कंडक्टरनं उतरवलं असतं तर?"

प्राक्तनाचे ओझे .... ( संपूर्ण काल्पनिक लघुकथा )

Submitted by किंकर on 10 January, 2020 - 13:12

प्राक्तनाचे ओझे .... ( संपूर्ण काल्पनिक लघुकथा )

कुठून सुरु करू माझी गोष्ट ? आज १० जानेवारी २०२० म्हणजे आता त्या घटनेला चार दशके आणि चार वर्षे होऊन देखील तो दिवस मला लख्ख आठवतोय .....

"जा रे, दिपकच्या आई कडून एक वाटी साखर घेऊ ये " आजी ने फर्मान सोडले. मला नेमके न आवडणारे काम माझ्या समोर आले . खरे तर दिपकची आई मला कधीच रागवत नसे. पण कोणाकडे जाऊन काही मागून आणायचे म्हटले कि माझ्या अंगावर काटा येत असे.

Subscribe to RSS - काल्पनिक लघुकथा