लव्ह इन क्युबेक - १

Submitted by 'सिद्धि' on 23 December, 2019 - 01:18

( ऑनलाईन चॅट, डेट , प्रेम आणि यातुन निर्माण होणारे प्रॉब्लेम्स यावर आधारीत, पण अगदी हलक्या-फुलक्या शब्दात मांडलेली ही एक छोटेखानी प्रेम कथा आहे. वाचकांना वाचनास सोयीस्कर जावे आणि सरमीसळ होऊ नये यासाठी कथा एकदाच सरसकट न टाकता , ४ भागांमध्ये विभागली आहे. चौथा भाग अंतिम असेल.
तुमच्या सुचनांचे नेहमीप्रमाने स्वागत आहे. )

*****

ट्रिंग...ट्रिंग...ट्रिंग...
फोन ची बेल वाजत होती.
" एवढ्या सकाळी कोण असावे ? जाऊदे फोन बंद करून ठेवतो. आज तरी कोणाचा डिस्टर्ब नको.
ऐन डिसेंबर, बाहेर मस्त पाऊस, आहाहा ! सोने को और क्या चाहिए ? तसा पण विकेंड आहे. मस्त ताणून देण्याचा मूड...."
पण फोन हातात घेऊन Switch off करण्याच्या आतच डिस्प्ले वरती आलेला आयराचा फोटो पाहुन माझी इच्छा होईना. मी क्षणाचाही विलंब न करता फोन उचलून कानाला लावला.

" हैलो ब्युटी. हाय "
" सिद . meet me, it's urgent ! "
" ए हैलो ! काय urgent ? आणि गुड मॉर्निंग वगैरे काही म्हणण्याची पद्धत आहे की नाही?"
" तू झोपलेला आहेस, म्हणजे मॉर्निंग झाली का ? It's afternoon dear. आणि हो , काहितरी सिरीअस आहे. एवढ समजू शकतो ना ? ये लवकर ! "

कुणच काय..... तर तिचा आवाज थोडा चिडका वाटत होता. आणि लवकर ये ही माझ्यासाठी आज्ञाच होती. चार शब्द ऐकून घेण्यापेक्षा मी ही, 'हो येतो' म्हणालो. 'आज तसही विकेंड असल्याने मेड येणार नाही. चला स्पॉन्सर मिळाली. पोटा-पाण्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. मस्त इंडियन रेस्टॉरंट मध्ये जाऊन इंडियन फुड enjoy करायला मिळेल. बाकी urgent काय असेल ते बघू नंतर '. या विचारात मी ही झटपट तयार होऊन निघलो देखील.

०००००

ल्ड क्यूबेक मधील Spice of India नुसत नाव ऐकून तोंडाला पाणी (?) भजा सारखा नुसता आकार बाकी टेस्टचे काही गन नाही, चपट गोल आकाराचे वडे.... बेसनामध्ये बटाटा की बटाटया मध्ये बेसन काही थांगपत्ता लागायचा नाही. दिसायला पांढराशुभ्र रंग, म्हणून डोसे. आम्ही ते डोसे ढोसायचो. बाकी तांदळामध्ये उडदाची डाळ घालतात की मूगाची, हे ज्ञान पाजळवत बसण्यात कोणाला वेळ नसायचा. तेवढच जरा नावात इंडियन म्हणून आम्ही बापडे उठ-सुठ पळायचो. दिसायला तरी इंडियन पदार्थांची रेलचेल होती. म्हणून तेवढ नेत्रसुख त्यामुळे माझेही आवडते हॉटेल (?) म्हणायला हरकत नाही.

' आईचा नेहमीचा उपदेश.... कुठेही हात हलवत (रिकाम्या हाती) जाऊ नये , म्हणुन सोबत ऑर्किडची पांढरीशुभ्र फुलं घेऊन मी हॉटेल मध्ये एन्ट्री केली. पण आज माझा अंदाज मात्र सपशेल चुकला होता. मला आयरा एकटीच अपेक्षित होती, पण तीच्या बरोबर माझी जाई,जुई,चाफा म्हणजेच माझं क्रश जाई होती. माझ्या वाढलेल्या दाढी वरून हात फिरवत मी स्वतःच्याच डोक्यात एक टपली मारली. काय वेंधळेट आहे मी ! ना परफ्यूम, ना प्रॉपर शेवींग, आलो तसाच उठून . काश ! जाई येणार आहे, हे मला आधीच माहित झालं असतं तर ? शिटटट , स्वतःला कोसत, बळेच स्माईल देत मी टेबलाजवळ पोहोचलो. पण मी दिलेल्या स्माईल ला कोणाची काहीच रिॲक्शन आली नाही. खरंच काही तरी गंभीर प्रकरण आहे तर ! मी स्वतःच्याच विचारात....

फुलांचा गुच्छ टेबलवर ठेवून मी बसणार तेवढ्यात जाई च्या हुंदक्यांची सुरुवात झाली. काय झालं ते कळेना ! ती एकसारखी फुलांचा गुच्छ बघून रडत होती. आणि आयरा तिचं सांत्वन करत होती, " जाई कुल डाऊन, काम डाऊन " वगैरे वगैरे वगैरे.... काय झालं विचारुन मी ही formality केली. पण काही समजेना... ही फुलं तर जाईला आवडतात, तीला आवडतात म्हणून मलाही आवडला लागली आहेत. मग ही फुलांकडे बघुन का बर रडत असावी ? माझे मलाच प्रश्न चालू होते. बिच्चारी फुलं, मला त्यांची दया येत होती. ही आपली गळा काढून-काढून एका सुरात रडत होती. एका क्षणासाठी तर मला असं वाटायला लागलं होतं की, जणू काय मी शोकसभेला आलो आहे.

दोन वर्षांपूर्वी भारतात असतानाचा एक प्रसंग मला आठवला. एक दुरचे मामा वारले होते. मी आई बरोबर मामींना भेटायला गेलो होतो. आईचाच आग्रह. तेव्हा मामी मामांच्या फोटोकडे बघुन जसं रडत होती, तसं आता जाई या फुलांकडे बघुन रडतं होती'. काय बोलावं सुचेना. बाकी आजूबाजूने दरवळणारे खमंग वास स्वस्थ बसू देत नव्हते. ही रडारड संपल्यावर काय काय ओर्डर करावी हाही विचार मनात येऊन गेला. तरीही जाई बद्दल माझ्या मनात आधी पासून सॉफ्टकॉर्नर होताच. नक्की काय झालं असावं हे जाणून घेण देखील तेवढेच गरजेचे होत. शेवटी कसनुसं जाईच्या जवळ सरकत (तेवढीच जवळीक) मी प्रश्न केला. काय झालं जाई ? मी काही मदत करु का?
पण व्यर्थ ची माझी बडबड. काही उत्तर नाही.

मी आयराकडे बघत नजरेनेच प्रश्न केला. ती देखील काही बोलायला तयार नाही.

" फुलं आवडली नाही ना तुला ? वेटरला सांगतो घेऊन जायला ! " म्हणत मी वेटरला हात केला. आता मात्र माझा पारा चढला होता, आणि हे माझ्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्ट दाखवत होते. वेटर आमच्या दिशेने येत होता.
ईतक्यात जाईने, " नाही सिद्ध्या, राहुदे ती फुलं, मला आवडतात . " म्हणत ती फुलं उचलुन स्वतःजवळ ठेवली. आणि कसेबसे स्वत:ला सावरुन तीने डोळे पुसले.

' मी परत प्रश्नार्थक नजरेने एकदा जाई, एकदा आयरा दोघींकडे पाहु लागलो. '
आता काही खाण्याचा मूड तर अजीबात नाही . " अरे मला काहीच सांगायचे नाही तर बोलावल का ? " म्हणत मी उठणार एवढ्यात ऑर्डर आली. आयराने मला खुनेनेच बसायला सांगतले . आणि जाईने घडला प्रकार सांगायला सुरुवात केली.....

(क्रमश)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन्या ऽ , Cuty , अज्ञानी - धन्यवाद.

अज्ञानी - मी आणि टायपो यांच घनिष्ठ नात आहे. Lol Lol Lol
लेखन आल की टायपो येतातच. आणि माझ्या ते सहज लक्षातही येत नाही. काही करेक्ट केलेत. अजुन असतील तर, शब्द सांगीतलेत तर बर होईल.

असं वातावरण निर्माण करून सोडून नका देत जाऊ.. किमान काहीतरी सॉलिड असलं पाहिजे ना प्रत्येक भागात.. यात फक्त सिद्धूला जाई आवडते, आयरा त्या दोघांची कॉमन फ्रेंड आहे, आणि काहीतरी कारण असल्यामुळे जाई रडते आहे इतकंच स्पष्ट होतंय.. शैली मात्र झकास. लवकर पुढचा भाग टाका आता

Swamini , अजिंक्य - tnx

अजिंक्य पुढचा भाग अगदी म्हणजे अगदी रेडी आहे.... पण नेहमीप्रमाने थोडे टायपो आहेत. Lol Lol Lol
तेवढे क्लिअर करते आणि तोही टाकतेच आहे. नक्की वाचा.

ऐन डिसेंबर, बाहेर मस्त पाऊस, आहाहा ! सोने को और क्या चाहिए ? >>>>>>>कोणत्या देशातील कथा आहे. भारतातील असेल तर बहुदा भारतात डिसेंबर मध्ये थंडी पडते.

चैनई असेल.. Happy
चांगली आहे शैली. पुभाप्र.

अनघा धन्यवाद.

ऐन डिसेंबर, बाहेर मस्त पाऊस, आहाहा ! सोने को और क्या चाहिए ? >>>>>>>कोणत्या देशातील कथा आहे. भारतातील असेल तर बहुदा भारतात डिसेंबर मध्ये थंडी पडते.

Submitted by Ajnabi on 23 December, 2019 - 14:08
- थँक्स अजिंक्य.
बरोबर आहे. कॅनडामध्येच क्युबेक सिटी आहे. बाकीचे डीटेल्स पुढच्या भागात देते.

आम्च्या गावातली histoire d'amour पण हे खटकल
ऐन डिसेंबर, बाहेर मस्त पाऊस, आहाहा >> डिसेंबर मध्ये इथे खूप म्हन्जे खूपच स्नो आणी quelque fois स्नो स्तोर्म (tempette de neige).
mais ca va ..चालु द्या..

@ deeps - धन्यवाद
गेल्या वर्षीच old quebec ला जाऊन आले.
हॉटेल मनोइर दे ला तेर्रासे अस काही तरी आहे तिथे उतरलो होतो आम्ही. नवर्‍याच्या water harvesting project च्या निमीत्ताने.... गॅर्रिसन क्लबच्या अपोसिट, मला जास्त काही माहीत नाही, ठिकानाची नाव लक्षात ठेवन महाकठीण आहे.
तुरळक बर्फाचा पाऊस होता....quelque fois स्नो स्तोर्म अस तेच ते काहीतरी. मस्त मजा आली.

@ 1987, किल्ली - धन्यवाद.

भारी चाललीये कथा!
(अशीच लव इन व्हेनिस कथा लिहावी म्हणतो...)

वाचतेय.
जमल तर थोडे मोठे भाग टाकत चला.