नातीगोती

ती वेळ चुकीची होती

Submitted by मनोजकुमार देशमुख on 1 May, 2020 - 09:25

तू असे पाहिले जाताना आस हकेची होती
निशब्द न बोललो काही ती वेळ चुकीची होती

हातात घेतले हात ओठांची भेट ती बाकी
माघार तिने का घ्यावी ती वेळ चुकीची होती

यंदाही चुकला त्याचा तो अंदाज पावसाचा
करपून पीक ते गेले ती वेळ चुकीची होती

का वांझ जमीन जहाली गळफास लावला त्याने
मिळाला विमा सरकारी ती वेळ चुकीची होती

सरणात प्रेत ते माझे कोणीच भोवती नाही
का मेघ असे बरसावे ती वेळ चुकीची होती

जालीय अस्तित्व अर्थात आयडी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 25 April, 2020 - 23:56

आंतरजालावर मिपा, मायबोली, उपक्रम, मनोगत, ऐसी अक्षरे या सारखे काही संवादी संकेतस्थळे असतात. या आभासी मंचावर अनेक लोक आपल्या विचारांची, भावनांची अभिव्यक्ती मांडत राहतात. विषय कुठलेही वर्ज्य नाहीत, व्यक्त होणे सुसंस्कृत असावे एवढीच अपेक्षा. सभासद लिहू वाचू शकतात. सभासद नसलेले फक्त वाचु शकतात. सभासदाचा बायोडेटा त्याच्या अकाउंटवर ठेवता येतो. काही लोक तो फक्त आपल्या आयडी पुरता मर्यादित ठेवतात. खर्‍या नावाने लिहिणारे, पारदर्शी माहिती ठेवणारे फार थोडे. स्त्री की पुरुष,वय,रहिवास,व्यवसाय नोकरी इत्यादी व्यावहारिक माहिती. काही लोक देतात काही नाही.पारदर्शक नसण्याची अनेक कारणे असू शकतात.

मीनाकुमारी की बेटी?

Submitted by शशिकांत ओक on 24 April, 2020 - 15:09

image

मीनाकुमारी की बेटी?

एकदा लाहोरच्या गल्लीतील एका फुटपाथवर एक चोपडे एकाच्या नजरेस पडले. घरी आल्यावर ते फाटके पुस्तक चाळून 'काहीच्या बाही लोक लिहितात' असे मनात म्हणत ते पुस्तक रद्दीत टाकून दिले. रद्दी विकताना ते पुस्तक वाचायची इच्छा झाली म्हणून तो वाचायला लागला. खरे कि खोटे याची शहानिशा करण्यासाठी त्याने शोध घ्यायला सुरवात केली. नंतर जे समोर आले ते तो सादर करत आहे.

शब्दखुणा: 

फक्त स्त्रियांसाठी - तुम्हाला मूल हवं होतं / आहे का ?

Submitted by राधानिशा on 17 April, 2020 - 13:21

ह्या धाग्यातले प्रश्न फक्त स्त्रियांचे या विषयावरचे विचार जाणून घेण्यासाठी आहेत . आई , बहीण , पत्नी , नातेवाईक स्त्रिया किंवा एकूण जग पाहून आलेल्या अनुभवातून स्त्रियांच्या विचारभूमिकेचे एक्सपर्ट समजणाऱ्या किंवा खरोखरच एक्सपर्ट असलेल्या पुरुष सदस्यांनी प्रतिसाद नाही दिलेत तर मी आभारी राहीन .. फक्त मायबोलीवर सक्रिय असलेल्या स्त्री सदस्यांचे विचार जाणून घेण्याची इच्छा आहे .

शब्दखुणा: 

माझी शोभा ताई

Submitted by डी मृणालिनी on 5 April, 2020 - 13:10

सचिन ,ममा , विश्वास दादा ,मोहम्मद दादा सर्वांची व्यक्तिरेखा रेखाटून झाली. एका व्यक्तीची राहिली होती. तिची व्यक्तिरेखा रेखाटणं म्हणजे माझ्यासारख्या धसमुसळ्या मुलीने पट्टीशिवाय सरळ रेषा आखणं ! साक्षात ब्रह्मदेवालाही जी गोष्ट शक्य नाही ,ती मी करण्याचं धाडस करते आहे. आमची शोभाताई . श्रवणयंत्राला कुलूप लावून अखंडपणे वाक् यंत्र चालू ठेवणारी ,क्षणात हसून क्षणात गंभीर होणारी , आपल्या हट्टपणाने सर्वांचं पित्त असंतुलित करणारी मात्र तरीही आम्हा सर्वांच्या हृदयाची अधिकारिणी असलेली अशी ही ताई. काळेभोर टपोरे दाक्षिणी ललनेसारखे डोळे तिने ज्याच्यावर रोखले ,त्याच्या पापाची रांजणे भरलीच समजा .

शब्दखुणा: 

माझे बाबा

Submitted by डी मृणालिनी on 5 April, 2020 - 13:07

माझे बाबा म्हणजे माझे आजोबा . श्री . आनंद देसाई , नावाप्रमाणेच आनंदी . यांच्याकडे बघून कोणाला सुधीर जोशींचा 'आनंदी आनंद गडे ' हा नाच आठवला नाही तरच नवल ! ऐन तारुण्यातच कॉर्पोरेट विश्वाचा उंबरठा ओलांडल्यामुळे ३ रुपये ५० पैशाचं केळं ५० रुपयाला विकण्याचीही ताकद त्यांच्या अंगी आहे .मानेमागून डोकावणारी पांढरी शुभ्र केस जणू या अंगीकृत गुणांचं आ,णि अनुभवांचं दर्शनच घडवीत असतात. कोणतंही स्थळ ,काळ आणि विषयाचे बंधन नसलेले माझे बाबा जगातल्या कोणत्याही विषयावर कितीही वेळ बोलू शकतात . आजची युवा पिढी google वरून ज्ञान डाउनलोड करून ते आपल्या मेंदूत अपलोड करते. मात्र बाबा यापैकी काहीच करत नाहीत.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - नातीगोती