कोटबो

नको असलेले मित्र

Submitted by कटप्पा on 6 December, 2020 - 00:20

मंडळी प्रश्न सिरीयस आहे.
आमचे एक मित्र आहेत. आम्ही राहायला दुसऱ्या शहरात होतो आणि ठरवले की जॉब चेंज करून या दुसऱ्या शहरात जाऊ.. तिथे हे मित्र होते..
आम्हा नवरा बायकोने जॉब स्विच केला आणि त्या शहरात शिफ्ट झालो. या मित्र दांपत्याने आमचे स्वागत केले. कंपनी अकोमोडेशन देत होती तरी पहिले १५ दिवस त्यांनी आपल्या घरी राहायची सोय केली. आम्हीदेखील आनंदाने राहिलो. मात्र त्यांना खर्च नको म्हणून ग्रोसरी वगैरेआणली, बाहेरून जेवण वगैरे मागवले तर बिल आम्ही देऊ लागलो.

शब्दखुणा: 

काही मराठी लोकांना साऊथ इंडियन सिनेमे का आवडतात?

Submitted by कटप्पा on 9 April, 2019 - 11:37

पुण्यात होतो तेंव्हा काही तेलगू तामिळ मित्र झाले होते, हाफीसात पण त्यांच्याच भाषेत बोलायला सुरू करायचे. मराठी असलो आम्ही आणि एखादा नॉन मराठी आला तर आम्ही हिंदी बोलतो.
हे गुलते गाणी ऐकणार तर फक्त त्यांची, चित्रपट बघणार तर फक्त त्यांची.
एकाला विचारले मराठी चित्रपट बघतो का, म्हणे नो बॉस, माई हिंदी बी नई देखता, सिर्फ तामिळ देखता हु.
त्या दुसऱ्या धाग्यावर मी विषय काढला तर चढले माझ्यावर. इतका काय साऊथ इंडियन चित्रपट कौतुक?
तद्दन फालतू हिरो, भिकार कथा, अविश्वसनीय मारामाऱ्या... नक्की काय आवडते.
माझं आवाहन आहे, नका बघू असले चित्रपट.. मराठी बघा. परत परत बघा.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कोटबो