रिप्लेसमेंट

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 7 May, 2018 - 14:18

"इथं मिसळ खूप छान मिळते"
मी पहिला घास खाल्ल्यावरच म्हणालो. तिने काहीच प्रतिक्रिया नाही दिली.
नुसतीच हसली, पण हे हसणं वेगळंच होत, आता तीच ते 'वेड' हसणं कुठंतरी गायबच झालेलं होत,
छान दिसते ती हसल्यावर...
मी तिच्या हातावर हात ठेवला तसा तिने झटकन हात खाली घेतला आणि पर्स मध्ये काहीतरी शोधायला लागली,
ते पर्स मध्ये शोधणं हे निम्मीत्त होत!
खरतर आजही सुंदर दिसतीये ती..
तिला स्वतःहून कधी मेकअप करण्याची आवडही नव्हती आणि कधी गरजही नव्हती !!
तिला मी आता आयुष्यात नको होतो आणि ते सरळ दिसतही होत, भेटायला उशीरा येणं, माझे कॉल्स टाळणं.
हे सगळं तिला मला न दुखावता संपवायचं होत,
तिचा निर्विकार चेहरा मलाही नव्हता बघायचा..

"मला देखील गरज नाहीये आता तुझी", हे मी बोलणं गरजेचंच होत...
आणि तेवढ्यात तिने पर्समधून एक रिंग काढून टेबलवर ठेवली आणि ती उठून गेली...
त्या टेबलवर ठेवलेल्या रिंगची जागा आता दुसऱ्याच रिंगने घेतलेली होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कळल नाही दुसरी रिंग कोणती ते.
पोलिस एव्हीडन्स म्हणुन सर्कल करतात ती तर रिंग नाही ना? क्राईम स्टोरी असेल तर..

अनघा,
<<<< १ ल्या प्रतिसादात लिहीली की २री रिंग..>>> म्हणजे काय? कळलं नाही.

मला वाटते कि डोळ्यात पाणी आल्यामुळे नाही आपल्याला धुसर दिसते किंवा डबल दिसते.. तसे काहि...

अंजली बरोबर बोललीस तेच कारण आहे त्या रिंगची जागा दुसर्या रिंगने घेतलिये लेखकाने कीती कळण्यासारंख लिहीलंय

त्या रिंगची जागा दुसर्या रिंगने घेतलिये> >>>>>> हो ह्यातुन कळतंय.
पण टेबलावर ठेवलेल्या रिंगची जागा असं लिहिल्याने उगीच डोकं भलत्या दिशेला धावत होतं.