कर्मयोग

**कर्मयोग्याचे गुज**

Submitted by निखिल मोडक on 28 October, 2020 - 14:56

चन्द्र चांदणीस सांगे
सखे दूर देख
किती शांत तेथे
उभे खाली रुख

तापती तपाने
जसे थोर योगी
तसे भास्कराच्या
तपाने उजळती

खोल ठाव घेती
अंतरीचा धरेच्या
तयाचेनी योगे
उंच आकाशी जाती

सांडूनी फलाशा
कर्मास करिती
कर्मयोगी जसे नित्य
कर्मास पूजती

नसे सावलीचाही
तया मोह काही
जी दिसे लपे नित्य
उदयी नी अस्ती

दिलासे सावलीने त्या
कितीका विसावा
परी तया ठायी न्यून
अहंकाराची न वस्ती

तोडी कर्मबंध

Submitted by पुरंदरे शशांक on 23 August, 2019 - 01:06

तोडी कर्मबंध

सांगे गीतेमाजी । योगेश्वर स्वये ।
कर्मयोग सोये । आवर्जून ।।

स्वधर्म आचरा । फलाशारहित ।
साधाल स्वहित । आपेआप ।।

ऐसे सांगे वर्म । स्वये जगन्नाथ ।
करीता सारथ्य । पार्थासाठी ।।

न सांडिता कर्मे । पार्था उपदेसी ।
टाकी मीपणासी । पूर्णपणे ।।

सोडिता मी माझे । तुटे कर्मबंध ।
संसार संबंध । नाश पावे ।।

संसारी असता । होशील तू मुक्त ।
न हो आसक्त । कदाकाळी ।।

कर्मयोग सोपा । करुनी श्रीहरी ।
भाविका उद्धरी । गीतामिषे ।।

..............................................

Subscribe to RSS - कर्मयोग