ओरिगामी

Submitted by अवल on 23 January, 2013 - 01:32

आपल्याला माहिती, येत असलेल्या ओरिगामीच्या वस्तू इथे टाकूयात.
जमलं तर त्यांची कृती ही.
लिहून/ चित्रातून/ व्हिडिओची लिंक देऊन.
सुरुवातीला चुकून हा वाहता धागा झाला होता. त्यामुळे काहींच्या कलाकृती वाहून गेल्या, क्षमस्व __/\__ कृपया आपल्या कलाकृती टाकाल?
काहींनी मस्त लिंक्सही दिल्या होत्या, त्याही पुन्हा द्याल?
तसदीबद्दल दिलगीर !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान .... एकसे बढकर एक.
--------------------------------------------------------------------
थोडी गंमत
जुन्या काळातल्या प्रेमिकांची ओरिगामी :
(संदर्भ : जुने हिन्दी, मराठी चित्रपट)

PB4.JPG

@ पिंगू , ३D ओरीगामीचा हंस मस्त जमलायं, सध्या मॉड्युलर ओरीगामीचं वेड लागलयं, ते गेलं की ३D शिकायला घेणार आहे Happy

प्राजक्ता, मस्तच!
इब्लिस : "कहाँ उड चली..." मस्त
रेसिप्यापण लिहा सगळ्यांनी जमेल तसे.
पिंगू, सही ! अन सांगितलयस किती छान Happy
सावली छाने बाप्पा
वा वा मजा येतेय एक एक बघून.
इब्लिस >>> मला हाताने वस्तू बनविणे आवडते. या सगळ्या लहानपणी केलेल्या उचापती आहेत, <<< सेम हियर म्हणूनच तर काढला या धागा.
उल्हासजी Happy कित्ती दिवसांनी. कसे आहात ?

@ सावली, सुंदर केला आहेस गणेश Happy

@ माधवी, मी सध्या मेलबर्नला आहे, तिथे ओरीगमी चौरस कागद मिळाले रंगीबेरंगी, पुण्यातही मी आणले होते, नाहीतर मोठ्या शीटस आणून आपण कापायचे चौरस.

मी सध्या ह्या २ साईटस वरचं करून बघत्ये -

http://origamimaniacs.blogspot.com.au/search/label/Home

http://www.origamiinstruction.com/

कॉलेजमध्ये असताना , एकदा ट्रेनने घरी येताना समोर लहान मुलगा बसला होता .त्याला साधी होडी करून दिली , पण नांगरहोडी आणि राजाराणीची होडी काही केल्या जमेना .बंबहोडी आठवत होती पण काही केल्या जमेना .... जाम वाईट वाटलं.

वा प्राजक्ता, मस्त आहेत लिंक्स. धन्यवाद !
माधवी, हो. डिंक, पिना, टाचण्या, इ. इ. काहीच नसते फक्त कागद, कागद आणि कागदच Happy

भारी कलाकार आहात सगळे. कृती टाका की.
अवल, बेडकाची कृती शक्य तितक्या लवकर टाकशील का ? तातडीने बनवायचा आहे.

किती छान दिसतंय सगळं..>>> +१
अवल धन्यवाद हा धागा काढल्याबद्दल.
मी सध्या इथे शिकतेयः http://www.origami-instructions.com/
रूणुझुणू, इथे पण आहे एक उड्या मारणारा बेडूक. आणखी बरेच प्राणी आहेत. http://www.origami-instructions.com/origami-frog.html

भिंत कुठे आहे?
डोके आपटावे म्हणतो?

एवड्या कष्टाने केलेल्या वस्तू अन पोष्टी वाहून की हो गेल्या :भोकाड पसरलेला भावला:

अवल, मी इथून ओरिगामिच्या रेसिप्या शिकते. Wink
http://www.origami-fun.com

रूणू, तुझ्यासाठी बेडकाची पाकृ पण आहे इथे.

अवल, धागा वाहता झालाय. मला गणेशा सोडून एकपण वस्तू दिसली नाही. Sad

आरारारा....आधीच्या पोस्टी कुठे गेल्या ? अवल, बांध घाल.

साती, बेडकाची पाकृ...ईईईईईईईई Proud
नलिनीने दिलेल्या धाग्यावरून बघून आत्ताच एक बेडूक बनवला. झकास झालाय, पण ते शेवटचं हवा भरायचं प्रकरण काही जमेना. असो, ओरिगामीचं एवढं क्लिष्ट काम पहिल्यांदाच केलंय. मजा आली.

अर्रर्र् हा वाहता झाला धागा? सो सॉरी. थांबा, अ‍ॅडमिनना विनंती केलीय.

तो पर्यंत कृपया नवीन टाकू नका कोणी.

इब्लिस , प्राजक्ता, पिंगू, आणि इतरांनी नंतर आपल्या पोस्टी प्लिज पुन्हा टाका. मी आपल्याला विपु करेन.

धन्यवाद अ‍ॅडमिन Happy
वाहण्याचा ओघ थांबला. चला आता पुन्हा ओतायला लागू Happy
ह्या काही आधीच्या कलाकृती
सुरुवात इथून झाली :
deepac73 | 16 January, 2013 - 11:52
लहानपणी आम्ही तिळगुळ द्यायला कागदाचे बॉक्स बनवायचो, कसे ते मी विसरले. कोणाला माहीत आहे का? तो असा दिसायचा
160120131409_0.jpgअवल | 22 January, 2013 - 14:48
दिपा,
व्हिडिओचि लिंक टाकते

इब्लिस | 19 January, 2013 - 15:23
तो तिळगुळाचा डब्बा मला येतो. पण संक्रान्त झाली आता..

अवल | 22 January, 2013 - 15:16
दिपा, मिळाली कुठे कृती - मीच काढली चित्र स्मित
बरं ही घे लिंक. बघ आता जमतय का? : http://arati21.blogspot.in/2013/01/blog-post_22.html
इब्लीसजी मग कागदाचा फुगा पण येत असणार, बरोब्बर याच्या उलट, त्रिकोणी घडीचा स्मित

इब्लिस यांजकडून

nackless 1_0.jpg1_15.jpg अवल कडून

sasa.jpgbanduk.jpgDSC_0709 copy.jpg
आता आधी टाकलेल्यांनी परत आणि बाकीच्यांनी नवे टाका बरं Happy

हा आमचा ओरिगामी बेडूक.

Jumpy frog origami.JPG

कागदी बेडूक बनवायच्या आदल्या दिवशी शाळेतून हे प्रकरण घरी आलं होतं Lol
दुसर्‍या दिवशी बाटली (आतील बेडकासह) परत शाळेत पाठवल्यामुळे नाराज झालेला लेक कागदी बेडूक पाहून थोडा ठीक झाला.

Frog from school.JPG

तुला फोटु पाहून काटा आला......माझ्या हातावर "सरप्राइssssझ" म्हणून बाटली ठेवली तेव्हा माझं काय झालं असेल विचार कर Lol

त्याने डान्सटीचरला मस्का लावून पकडला होता.

"सरप्राइssssझ" >> असलं सरप्राईज.. Uhoh मला तर हार्टअ‍ॅटॅकच येइल.. नशीब तुला आर्टअ‍ॅटॅक आला आणी कागदी बेडुन बनला Lol

किती छान धागा.
ओरीगामी लहानापासुन वृद्धांपर्यत आवडणारी आजार विसरायला लावणारी अनिल अवचट पार्किन्सन्स मित्रमंडळात ओरीगामी शिकवायला आले होते अर्धातास सलग बसु न शकणारे पेशंट दिड दोन तास रमले. सर्वानी टोप्या, मुगुट, पक्षी, विमान, मासा असे अनेक प्रकार केले.मला फोटो टाकता येत नाहीत.अवल मदत हवी.

Pages